10 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 मे 2022)
न्या. धुलिया, न्या. पारडीवाला यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ :
गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुधांशु धुलिया व गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जमशेद पारडीवाला यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.
सर्वोच्च न्यायालयाच्या विस्तारित इमारत परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी या दोन्ही न्यायमूर्तीना पदाची शपथ दिली.
न्या. धुलिया व न्या. पारडीवाला यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयाची 34 न्यायाधीशांची संपूर्ण क्षमता पुन्हा बहाल झाली आहे.
अर्थात, न्या. विनीत सरन हे 10 मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने ही क्षमता पुन्हा 33 वर येईल.
उत्तराखंडमधून पदोन्नत होणारे दुसरे न्यायाधीश असलेले न्या. धुलिया यांचा कार्यकाळ तीन वर्षांहून थोडा अधिक राहणार आहे.
आणखी दोन न्यायाधीशांच्या नियुक्तीसोबतच, सरन्यायाधीशांनी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या 11 न्यायमूर्तीना शपथ दिली असून, हा एक प्रकारचा विक्रम आहे.
शनिवारी रोजी अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या ‘असनी’ चक्रीवादळाने सोमवारी वेग घेतला आहे.
तर या चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळामध्ये झालं आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ सध्या अंदमान निकोबार बेटांपासून 270 किलोमीटर, पोर्टब्लेअरपासून 450 कि.मी., तर आंध्रप्रदेश व पुरीपासून 610 कि.मी. अंतरावर खोल समुद्रात आहे.
मंगळवारी हे चक्रीवादळ उत्तर आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर पोहोचणार आहे.
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा :
श्रीलंकेत सध्या सुरु असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे.
राजीनामा देण्यापूर्वी राजपक्षे यांनी जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
संकटग्रस्त सरकारचे नेतृत्व करणारे राष्ट्रापती गोटाबाया राजपक्षे यांना सध्याच्या राजकीय गोंधळाचे निराकरण आणि अंतरिम प्रशासन तयार करण्यासाठी महिंदाचा राजीनामा हवा होता.
अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावाने बांधणार चौक :
भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ अयोध्येत चौक बांधण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या प्रशासनाला यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशात पुढील 15 दिवसांत अयोध्येतील एका मोठ्या चौकाची ओळख करून दिवंगत लता मंगेशकर यांचे नाव देण्यात यावे, असे म्हटले आहे.
एवढेच नाही तर लताजींनी गायलेली भगवान राम आणि हनुमानाची गाणी आणि भजन शहरात ठीक ठिकाणी स्पीकरवर वाजवावेत.
रामजन्मभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील अयोध्येतील मुख्य चौकांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जातं आहे.
केंद्र सरकार देशद्रोह कायद्याचा फेरविचार करणार :
केंद्र सरकारने सोमवारी देशद्रोह कायद्यासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
देशद्रोह कायद्यातील तरतुदींचा पुनर्विचार आणि चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे केंद्राने म्हटले आहे.
जोपर्यंत सरकार चौकशी करत नाही तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी करू नये, अशी विनंती सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशद्रोहाच्या भारतीय दंड संहितेच्या कलम 124 अ च्या वैधतेची तपासणी आणि पुनर्विचार केला जाईल.
भारतात महिलांवर होणाऱ्या हिंसाचारात 30 टक्क्यांनी वाढ :
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभागाने एक धक्कादायक बाब समोर आणली आहे.
त्यांनी केलेल्या सर्वेक्षण अहवाल-5 (NFHS) नुसार, भारतात महिलांवर होणाऱ्या शाररिक हिंसाचारात 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी हा अहवाल जाहीर केला.
निराशाजनक बाब म्हणजे केवळ 14 टक्के महिलांनीच या हिंसाचाराविरोधात आवाज उठवला आहे.
महिलांवर हिंसाचार होणऱ्या घटनांमध्ये कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक लागतो.
त्यापाठोपाठ बिहार, तेलंगणा, मणिपूर आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो.
तर लक्षद्वीपमध्ये महिलांवरील घरगुती हिंसाचार होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे.
धोनीने रचला नवा विक्रम :
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 55 व्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सला धुळ चारली.
तर या सामन्यात चेन्नईचा तब्बल 91 धावांनी विजय झाला.
दरम्यान या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने अनोखा विक्रम रचला आहे.
तर हा विक्रम नोंदवत थेट विराट कोहलीच्या पंक्तीत स्थान मिळवलंय.
दिल्लीविरोधातील सामन्यात 40 वर्षीय महेंद्रसिंह धोनी 18 वे षटक सुरु असताना मैदानात आला. त्याच्या वाट्याला फक्त 8 चेंडू आले.
तर या आठ चेंडूंमध्ये त्याने 21 धावा केल्या. एक चौकार आणि दोन षटकार लगावत त्याने ही किमया साधली.
थॉमस चषक बॅडिमटन स्पर्धात भारतीय संघ बाद फेरीत :
भारतीय पुरुष संघाने सोमवारी कॅनडाला 5-0 अशी धूळ चारताना थॉमस चषक बॅडिमटन स्पर्धेच्या साखळी फेरीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
तर या कामगिरीसह त्यांना या स्पर्धेची बाद फेरी गाठण्यात यश आले.
भारतीय संघाने आपल्या पहिल्या लढतीत जर्मनीला 5-0 असे नमवले होते.
त्यामुळे भारताचे ‘क’ गटात अव्वल दोन संघांतील स्थान निश्चित आहे.
दिनविशेष :
लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी 10 मे 1824 मध्ये खुली करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव 10 मे 1907 रोजीलंडनमधे साजरा केला.
रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म 10 मे 1918 रोजी झाला होता.
10 मे 1993 रोजी संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.