12 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs
12 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (12 जून 2022)
‘एमआरएनए’लशींमुळे हृदयविकाराची जोखीम :
- करोनावरील ‘एमआरएनए’ लसीकरणानंतर हृदयविकाराची जोखीम वाढत असल्याचा अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाचा अभ्यास प्रतिष्ठित ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यामुळे लसीकरण नियमावलीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
- तथापि, भारतात तयार केलेल्या आणि प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या करोना लशी त्या प्रकारात मोडत नसल्या तरी भारतही ‘एमआरएनए’ लस तयार करीत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
- भारतात तयार झालेली कोव्हिशिल्ड ही लस प्रतिपिंडे तयार करणारी (रिप्लिकेटिंग व्हेक्टर व्हॅक्सिन), तर कोव्हॅक्सिन ही लस निष्क्रिय जंतूंचा वापर (इनअॅक्टिव्हेटेड पॅथोजन बेस्ड) करून तयार करण्यात आली आहे.
- परंतु भारत सध्या ‘एमआरएनए’ लस तयार करीत असून ‘लॅन्सेट’मधील अभ्यास त्या अनुषंगाने लक्षात घ्यावा, असे म्हटले जाते.
- ‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार एमआरएनए लसीकरणानंतर, विशेषत: 18 ते 25 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदयस्नायू दाह (मायोकार्डिटिस) किंवा हृदयावरणाचा दाह (पेरीकार्डिटिस) या व्याधींचा धोका वाढतो; परंतु हा धोका अगदी दुर्मीळ असतो, असेही या अभ्यासात स्पष्ट केले आहे.
Must Read (नक्की वाचा):
नॉर्वे अ-गट बुद्धिबळ स्पर्धात प्रज्ञानंदला अजिंक्यपद :
- भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नॉर्वे अ-गट खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
- प्रज्ञानंदने नऊ फेऱ्यांमध्ये एकूण 7.5 गुणांची कमाई केली.
- तर गेल्या महिन्यात चेसेबल मास्टर्स स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या प्रज्ञानंदला नॉर्वे अ-गट खुल्या स्पर्धेसाठी अग्रमानांकन लाभले होते.
- तसेच त्याने या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करताना नऊपैकी सहा सामने जिंकले आणि तीन सामने बरोबरीत सोडवले.
- प्रज्ञानंदने या स्पर्धेतील अखेरच्या फेरीत भारताच्याच व्ही. प्रणीतला पराभूत केले.
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धात महाराष्ट्राची सरशी :
- टेनिस, टेबल टेनिस आणि जलतरण क्रीडा प्रकारात मिळवलेल्या तीन सुवर्णपदकांच्या बळावर महाराष्ट्राने शनिवारी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत हरयाणाला मागे टाकले.
- महाराष्ट्राच्या खात्यावर 37 सुवर्ण, 33 रौप्य आणि 28 कांस्य अशी एकूण 98 पदके जमा आहेत.
- तर हरयाणाने 36 सुवर्ण, 33 रौप्य आणि 39 कांस्यपदकांसह 108 पदके कमावली आहेत.
- जलतरणात अपेक्षा फर्नाडिसने 200 मीटर मुलींच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवताना नवा विक्रम नोंदवला.
- चार बाय 100 मीटर रीलेमध्ये भक्ती वाडकर, अपेक्षा फर्नाडिस, संजिती साहा, आन्या वाला यांनी रौप्यपदक संपादन केले.
- याचप्रमाणे 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पलक जोशीने रुपेरी पदक जिंकले.
दिनविशेष :
- 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो.
- भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म इ.स. 499 मध्ये 12 जून रोजी झाला.
- गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 रोजी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
- 12 जून 1975 मध्ये अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना 6 वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.