13 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs
13 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 जून 2022)
जैतापूर प्रकल्पासंदर्भात फ्रान्सच्या प्रस्तावावर विचार :
- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाबरोबरच्या नागरी आण्विक भागीदारीबद्दल अनिश्चितता असताना फ्रान्सच्या सरकारी अणुऊर्जा कंपनी (इडीएफ)च्या लांबलेल्या कराराबद्दल आता आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
- जैतापूर येथील नियोजित अणुऊर्जा प्रकल्पात सहा इपीआर अणुभट्टय़ा पुरवण्याच्या प्रस्तावास भारताने तत्त्वत: मान्यता दिली होती.
- महाराष्ट्रातील जैतापूर येथे सहा इपीआर अणुभट्टय़ा उभारण्यास मदत करण्याबाबत फ्रान्सच्या सरकारी अणुऊर्जा कंपनीने दिलेल्या प्रस्तावाचे परीक्षण भारताचा अणुऊर्जा विभाग करीत आहे.
- गेल्याच महिन्यात इडीएफचे एक उच्चस्तरीय पथक भारतात आले होते.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमान्यूएल मॅक्रॉन यांच्यात मेमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेची ही फलश्रुती असल्याचे सूत्रांनी सांगितले
- फ्रान्सशी 2008 मध्ये झालेल्या व्यापक आण्विक करारानुसार जैतापूर येथे 1650 मेगावॅट इलेक्ट्रिक (एमडब्ल्यूइ) क्षमतेच्या सहा अणुभट्टय़ा उभारण्यास भारताने तत्वत: मान्यता दिली होती.
Must Read (नक्की वाचा):
विश्वचषक पॅरानेमबाजी स्पर्धात अवनीला दुसरे सुवर्ण :
- भारताची युवा पॅरानेमबाज अवनी लेखराने फ्रान्स येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा क्रीडा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.
- अवनीने महिलांच्या आर8 गटातील 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन एसएच1 गटात सुवर्ण कामगिरी केली.
- अवनीने 458.3 गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले.
- तर व्हेरॉनिका व्हादोव्हिकोव्हा आणि स्वीडनची अॅना नॉर्मन या अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवण्यात यशस्वी ठरल्या.
- लेखराने यापूर्वी महिलांच्या आर2 गटातील 10 मीटर एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.
युवा जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धात भारताला दोन रौप्यपदके :
- आकांक्षा व्यवहारे आणि विजय प्रजापती या भारताच्या वेटलिफ्टिंगपटूंनी चमकदार कामगिरी करताना रविवारी युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटात रौप्यपदकाची कमाई केली.
- मेक्सिको येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आकांक्षाने एकूण 127, तर विजयने 175 किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले.
- आकांक्षा आणि विजय हे अनुक्रमे औरंगाबाद आणि पतियाळा येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलंसमध्ये सराव करतात.
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धात महाराष्ट्र अग्रस्थानी कायम :
- महाराष्ट्राने रविवारी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली.
- जलतरणात अपेक्षा फर्नाडिसने दोन सुवर्णपदके जिंकत महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासह तिरंदाजीत साताऱ्याच्या आदिती स्वामीने सुवर्णवेध घेतला. टेबल टेनिसमध्ये दिया चितळेने सुवर्णपदक जिंकले.
- युवा खेळाडूंनी केलेल्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राने पदकतालिकेतील अग्रस्थान कायम राखले आहे.
- महाराष्ट्राच्या खात्यावर 41 सुवर्ण, 36 रौप्य आणि 29 कांस्य अशी एकूण 106 पदके जमा आहेत.
- दुसऱ्या स्थानावरील हरयाणाने महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक पदके मिळवली असली तरी सुवर्णपदकांमध्ये ते पिछाडीवर आहेत.
- हरयाणाने आतापर्यंत या स्पर्धेत 39 सुवर्ण, 34 रौप्य आणि 42 कांस्य अशी 115 पदके कमावली आहेत.
दिनविशेष :
- प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म 13 जून 1831 मध्ये झाला होता.
- कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म 13 जून 1879 मध्ये झाला.
- सन 1983 मध्ये पायोनियर 10 हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.