Current Affairs (चालू घडामोडी)

13 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

13 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 मे 2019)

खासगी कारचालकांना भाडं घ्यायला मान्यता :

  • जर तुमच्याकडे स्वतःची कार असेल तर आता त्याद्वारे तुमची अतिरिक्त कमाई सुरू होऊ शकते. कारण, सरकार परिवहन कायद्यात मोठा बदल करण्याचा विचार करत आहे. दिलेल्या एका बातमीनुसार, ‘व्हेइकल पूलिंग’ योजनेचा केंद्र सरकार विचार करत आहे.
  • देशभरात खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे, परिणामी ट्रॅफिक आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस मोठी होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारडून खासगी गाड्यांचा वापर
    कमर्शियल (व्यावसायिक) कारणासाठी करता यावा म्हणून परमिट जारी करण्याचा विचार सुरू आहे.
  • तसेच नीति आयोगाने यासाठी एक पॉलिसी तयार केली आहे. मात्र, ही सेवा सुरू करण्यासाठी कार मालकांना काही नियम आणि अटींची पूर्तता करावी लागेल. खासगी कारचालक दिवसाला 3 ते 4 फेऱ्याच कमर्शियल ट्रिपच्या करू शकतो, असा त्यात नियम असणार आहे.
  • तर प्रवाशांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी खासगी वाहनांसाठी नियमावली बनवली जाणार आहे. त्यासाठी खासगी वाहन चालकांना राज्य परिवहन विभागातील मान्यता प्राप्त समीक्षकाकडून KYC (know your customer)प्रक्रिया
    पूर्ण करावी लागेल. समीक्षकाकडे वाहनाचा पूर्ण तपशील असेल जेणेकरुन कार मालक एका दिवसात तीन किंवा चार पेक्षा अधिक फेऱ्या मारु शकणार नाही, आणि नियम तोडल्यास तातडीने त्यावर कारवाई करता येणं शक्य होईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 मे 2019)

संपूर्ण शरीराच्या स्कॅनिंगनंतरच मिळणार मुंबई विमानतळावर प्रवेश :

  • मुंबईविमानतळाच्या प्रवाशांना यापुढे विमानतळावर प्रवेश करताना फुल बॉडी स्कॅनर मधून प्रवेश करावा लागणार आहे. याबाबत प्रायोगिक तत्त्वावर ही प्रक्रिया राबविण्यासाठी विमानतळ प्रशासनाने अशा प्रकारची सुविधा पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर फुल बॉडी स्कॅनिंग ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. सुरक्षा तपासणीसाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आल्याने, त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती विमानतळ प्रशासनातर्फे देण्यात आली.
  • पूर्ण शरीराचे स्कॅनिंग करण्यासाठी लागणाऱ्या यंत्राचे उत्पादन करणार्या कंपन्यांनी 7 दिवसांत निविदा प्रक्रियेला प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) यांनी परिपत्रक काढून विमानतळावर पूर्ण शरीराची तपासणी करणार्या स्कॅनरचा वापर करण्याचे निर्देश दिले होते.
  • तसेच या स्कॅनरद्वारे शरीरात लपविलेल्या वस्तू, शरीरावर लपवून ठेवलेल्या वस्तू त्वरित उघडकीस येऊ शकतील. सध्या धातू तपासणी दरवाजामधून जाताना व हाती वापरण्याच्या यंत्राद्वारे केवळ धातूच्या वस्तुंचा शोध घेता येतो. मात्र, या नवीन स्कॅनरद्वारे धातू नसलेल्या वस्तूदेखील शोधण्यात यश मिळणार आहे.

पहिल्या क्लस्टर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सुहास पेडणेकर :

  • राज्यातील पहिले क्लस्टर विद्यापीठ असलेल्या डॉ. होमी जहांगीर भाभा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा मान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना मिळाला आहे.
  • तर नुकतीच या कुलगुरूंची निवड प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. या कुलगुरूपदाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे.
  • राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान म्हणजेच रुसाच्या माध्यमातून चार महाविद्यालयांचे मिळून एक विद्यापीठ स्थापन केले जात आहे.
  • त्यानुसार, डॉ. होमी जहांगीर भाभा विद्यापीठ मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कुलगुरूपदाच्या नियुक्तीमुळे कामकाजाला गती मिळणार आहे.
  • डॉ. होमी भाभा विद्यापीठामध्ये शासकीय विज्ञान संस्था, मुंबई हे मुख्य कॉलेज आणि सिडनहॅम कॉलेज, एलफिन्स्टन कॉलेज व शासकीय अध्यापक महाविद्यालय या चार संस्थांचा समावेश आहे.
  • डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांना ‘चॉइस बेस्ड क्रेडिट सीस्टिम’नुसार आंतरज्ञानशाखीय पद्धतीने आवडीचे अभ्यासक्रम निवडता येतील.
  • सिडनहॅम कॉलेजच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांला कला विषयासाठी एलफिन्स्टन कॉलेजात प्रवेश निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे, तसेच त्याला विज्ञान संस्थेत विज्ञान शाखेच्या विषयनिवडीचे स्वातंत्र्यही असणार आहे.
  • तसेच यामध्ये 65 क्रेडिट असलेला मुख्य विषय असेल, तर उर्वरित 35 क्रेडिट इतर विषयांमध्ये मिळविता येऊ शकणार आहेत.

अमेरिका देणार भारताला ‘थाड’ संरक्षण व्यवस्था :

  • रशियाच्या एस-400 ला पर्याय म्हणून अमेरिकेने भारताला टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स (टीएचएएडी) आणि पॅट्रियट अ‍ॅडव्हान्स कॅपॅबिलिटी (पीएसी-3) क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्था देण्याची तयारी दाखवली आहे.
  • तसेच अनेक वर्षांपासून रशियाशी सुरू असलेल्या वाटाघाटींनंतर ही व्यवस्था मिळवण्याच्या जवळ आम्ही असल्याचे भारताने म्हटले आहे.
  • 2016 मध्ये अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने केलेल्या कथित हस्तक्षेपाबद्दल त्याला शिक्षा करण्यासाठी म्हणून भारताने त्याच्याकडून वरील व्यवस्था विकत घेतल्यास त्याच्यावर निर्बंध लादले जाणार नाहीत हे आश्वासन अमेरिकेने मागे घेतले.
  • तर गेल्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीत भारत आणि अमेरिकेचे संरक्षण व परराष्ट्रमंत्री यांच्यात समोरासमोर झालेल्या चर्चेत अमेरिकेने रशियाच्या एस-400 व्यवस्थेसाठी निर्बंध माफ करण्याची तयारी दाखवली, असे समजते; परंतु गेल्या
    काही आठवड्यांत काही आश्वासने मागे घेण्यात आल्याचे दिसते. नाटोचा सदस्य टर्कीने स्वत:च एस-400 विकत घेऊ नयेत म्हणून ट्रम्प प्रशासन प्रयत्न करीत असताना हे घडले आहे.
  • थाड संरक्षण व्यवस्था विकत घेण्याची नेमकी रक्कम किती, हे निश्चित झालेले नाही; परंतु सीएनबीसीच्या वृत्तानुसार प्रत्येक एस-400 ची किंमत तीन अब्ज अमेरिकन डॉलर असू शकेल.सौदी अरेबियाने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेशी 44 थाड लाँचर्स आणि मिसाईल्स 15 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.

दिनविशेष :

  • 13 मे 1880 मध्ये थॉमस अल्वा एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.
  • अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन 13 मे 1939 मध्ये सुरु झाले.
  • फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिला रेस 13 मे 1950 मध्ये सिल्व्हरस्टोन येथे झाली.
  • 13 मे 1952 मध्ये भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
  • ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला 13 मे 1995 मध्ये बनली.
  • भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण येथे 13 मे 1998 मध्ये केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 मे 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago