15 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 मे 2019)
सीमेवर तैनात होणार एअर डिफेन्स युनिट :
- पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान बरोबर झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराची सीमारेषेजवळ एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याची योजना आहे.
- पाकिस्तानने पुन्हा हवाई हल्ल्याचा प्रयत्न केल्यास तो उधळून लावण्याच्या रणनिती यामागे आहे.
- हवाई सुरक्षा यंत्रणा उभी केल्यानंतर पाकिस्तानचा हवाई हल्ल्याचा प्रयत्न सीमारेषेजवळच उधळून लावता येईल असे एएनआयने लष्करातील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
- तसेच लष्कर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर एअर डिफेन्स युनिट तैनातीच्या निर्णयाप्रत आले आहे.
- जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमध्ये ज्या ठिकाणी एअर डिफेन्स युनिट आहेत. त्या ठिकाणांचा लष्कराने आढावा घेतल्यानंतर एअर डिफेन्स युनिट सीमा रेषेच्या आणखी जवळ तैनात करण्याची गरज जाणवली.
- भारतीय लष्कराच्या या एअर डिफेन्स सिस्टिममध्ये स्वदेशी बनावटीचे आकाश क्षेपणास्त्र, रशियाच्या क्वाड्राटचा समावेश होतो.
- तर लष्कराला लवकरच डीआरडीओ आणि इस्त्रायलची संयुक्त निर्मिती असलेली एमआर-सॅम एअर डिफेन्स सिस्टिमही मिळणार आहे.
इन्फोसिस फाउंडेशनची नोंदणी गृह मंत्रालयाकडून रद्द :
- केंद्रीय गृह मंत्रालयाने बंगळुरूस्थित स्वयंसेवी संस्था इन्फोसिस फाऊंडेशनची नोंदणी रद्द केली आहे.
- विदेशी देणग्या प्राप्त करताना नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरुन फाऊंडेशनवर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं.
- मात्र, इन्फोसिस फाऊंडेशनकडूनच गृह मंत्रालयाकडे नोंदणी रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती, त्यानंतरच नोंदणी रद्द करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
- विदेशी देणग्या मिळविण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांना विदेशी योगदान (नियमन) कायद्यान्वये नोंदणी करणे आवश्यक आहे.
- तसेच एफसीआरए या लघु नावाने हा कायदा परिचित आहे.
- तर 2016 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार इन्फोसिस फाऊंडेशन ‘एफसीआरए’च्या कक्षेत येत नाही.
चांदोबा 50 मीटर्सच्यावर झाला पातळ :
- चंद्र स्थिरपणे लहान होत असल्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर सुरकुत्या पडत असून, तो कंप पावत आहे, असे ‘नासा’च्या लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटरने घेतलेल्या छायाचित्रांच्या विश्लेषणाचे म्हणणे आहे.
- चंद्राचा आतील भाग थंड होत असल्यामुळे चंद्र आकसत चालला आहे. चंद्र गेल्या कित्येक शेकडो दशलक्ष वर्षांत 50 मीटर्सच्याही वर पातळ झाला आहे व त्याच्या परिणामी चंद्राच्या पृष्ठभागावर कंप निर्माण होत आहेत, असे अभ्यासात
आढळले. - तसेच चंद्राच्या पृष्ठभागाचा पापुद्रा ठिसूळ असल्यामुळे त्याच्यावर सुरकुत्या पडल्या की चंद्र आकसत चालला की त्या तुटतात. त्यातून पापुद्र्याचा एक विभाग शेजारच्या भागात घुसतो. याला ‘थ्रस्ट फॉल्टस्’ म्हणतात. यात जुन्या खडकांना तरुण खडकांच्या वर ढकलले जाते.
- तर फॉल्ट स्कार्प्स चंद्राच्या पृष्ठभागावरून पाहिल्यास छोट्या पायऱ्यांच्या आकाराच्या उंच कडांसारखे दिसतात. ते दहा-दहा मीटर्स उंच आणि कित्येक किलोमीटर्स लांब पसरलेले असतात.
इराणला भारत करणार मदत :
- अमेरिकेकडून इराणची कोंडी करण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणकडून निर्यात करण्यात येणाऱ्या धातूवर निर्बंध घातले होते. त्यानंतर इराणकडून कच्चे तेल विकत घेणाऱ्या देशांना देण्यात आलेली सूटही पूर्णत: बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता इराणला केवळ भारताकडूनच अखेरच्या आशा आहेत.
- तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद झारीफ यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.
- तर या भेटीदरम्यान भारत आणि इराण यांच्यातील परस्पर द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यात आली. तसेच अफगाणिस्तानसह भारतीय उपखंडातील परिस्थितीवरही एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासहित सहा राष्ट्रांना दिलेली सूट बंद केल्यानंतर झारीफ आणि स्वराज यांच्यात झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
दिनविशेष :
- 15 मे : भारतीय वृक्ष दिन
- 15 मे : जागतिक कुटुंब दिन
- जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी 15 मे 1718 मध्ये घेतले.
- रॉबर्ट वॉल्पोल 15 मे 1730 मध्ये युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
- 15 मे 1811 मध्ये पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.
- सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्या बेलीज बीड्सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी 15 मे 1836 मध्ये सर्वप्रथम निरीक्षण केले.
- मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात 15 मे 1935 मध्ये झाली.
- 15 मे 1940 मध्ये दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा