16 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
16 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 ऑगस्ट 2018)
बरेली, कानपूर आणि आग्रा विमानतळाचेही नामांतर होणार :
- उत्तर प्रदेशातील मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय ठेवल्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारने बरेली, कानपूर आणि आग्रा विमानतळांचीही नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
- राज्य नागरी उड्डाण विभागाने केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्वावात बरेली विमानतळाचे नाव ‘नाथ नगरी’ असे बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. तर हे या शहराचे जुने नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नाथ संप्रदायाचे अनुयायी आहेत. त्यांनी यापूर्वी गोरखपूरमधील भारतीय हवाईदलाच्या सिविल टर्मिनलचे नाव बदलून ते महायोगी गोरखनाथ यांच्या नावावरून ठेवले आहे.
- तसेच कानपूरमधील चकेरी विमानतळाचे नाव स्वातंत्र्य सेनानी गणेश शंकर विद्यार्थी यांच्या नावावर ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
- त्याचबरोबर आग्रा विमानतळाचे नाव दीनदयाल उपाध्याय असे ठेवण्याचेही प्रस्तावात म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):
इस्रोचे ‘गगनयान’ अंतराळवीरांना घेऊन जाणार :
- तंत्रज्ञानाच्या आधारे अंतराळवीरासह अवकाशात उपग्रह पाठविण्याचे भारताचे उद्दिष्ट 2022 पर्यंत गगनयान मोहिमेद्वारे पूर्ण होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणावेळी जाहीर केले आहे.
- या पाश्र्वभूमीवर तसेच अंतराळवीर अवकाशात पाठविण्याबाबत अंतराळवीरांचे वास्तव्य, पर्यावरण नियंत्रण, जीवन रक्षा यंत्रणा, संकटावेळी बाहेर पडण्याची यंत्रणा, जीएसएलव्ही-3 अग्निप्रक्षेपक आदींबाबत बरीच प्रगती केली आहे.
- तर गगनयान मोहिमेपूर्वी जीएसएलव्ही-3 च्या आधारे दोन मानवविरहित मोहिमा हाती घेणार आहोत. गगनयान मोहिमेमुळे देशाचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र उच्चत्तम पातळीला पोहोचेल. तसेच प्रत्येक भारतीय युवकाला मोठी प्रेरणा मिळेल.
- तसेच प्रत्येकाच्या दृष्टीने ही अभिमानास्पद घटना असेल, असेही सिवन यांनी सांगितले.
- अवकाशयानातून तीन अंतराळवीर प्रवास करणार असून त्यांची निवड चर्चेद्वारे करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे तर अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असेल व या प्रकल्पासाठी 10 हजार कोटींच्या आसपास खर्च येणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन :
- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले.
- भारतीय क्रिकेट संघाच्या प्रतिकूल काळात अजित वाडेकर यांनी 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी त्यांनी केली होती.
- वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवून देणारे वाडेकर हे भारताचे पहिले कर्णधार होते.
ब्रिटीशांकडून स्वातंत्र्यदिनाची भेट परत केली बुद्ध मूर्ती :
- भारताच्या 72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ब्रिटीशांनी 12 व्या शतकातील चोरीला गेलेली ब्राँझची बुद्ध मूर्ती समारंभपूर्वक भारताला परत केली आहे.
- 1961 साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या बिहार नालंदा येथील संग्रहालयातून ही ब्राँझची बुद्ध मूर्ती चोरीला गेली होती.
- 1961 साली नालंदा येथील संग्रहालयातून एकूण 14 मूर्ती चोरीला गेल्या होत्या. त्यामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीचा समावेश होता.
‘पतंजलि’च्या ‘किंभो अॅप’चं पुनरागमन :
- योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलि समूहाचं Kimbho App पुनरागमनासाठी सज्ज आहे.
- चॅटिंगसाठी असलेलं हे अॅप नव्या फिचर्ससह 27 ऑगस्टपासून गुगलच्या प्ले-स्टोअरवर उपलब्ध होणार आहे.
- किंभो असे नाव असलेले हे अॅप्लिकेशन स्वदेशी मेसेजिंग अॅप आहे.
25 सप्टेंबरपासून आयुष्यमान भारत योजना होणार सुरु :
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयुष्मान योजनेचा शुभारंभ 25 सप्टेंबरला होणार असल्याचे जाहीर केले आहे.
- देशातील गरीब आणि सर्वसामान्यांना चांगले उपचार मिळावे. मोठ्या आजारांसाठी चांगल्या रुग्णालयात मोफत उपचार मिळावे, यासाठी पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.योजनेत पारदर्शकता राहावी आणि सर्वसामान्यांना या योजनेचा सहज लाभ घेता यावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या तंत्रज्ञानाची सध्या चाचपणी सुरु आहे.
- तसेच 25 सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीला देशभरात या योजनेचा शुभारंभ होणार आहे.
महिलांना सैन्यदलात बरोबरीचा अधिकार :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 72 व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त लष्करात काम करत असणाऱ्या महिलांना भेट दिली आहे.मोदी यांनी महिलांसाठी स्थायी कमिशनची घोषणा केली आहे. या माध्यमातून महिला सर्व पुरूषांप्रमाणे देशाची सेवा करू शकणार आहेत.
- शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे निवडलेल्या महिलांसाठी ही घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांना अधिक काळ सैन्य दलात काम करता येणार आहे.
- स्थायी कमिशन लागू झाल्यामुळे महिला उमेदवारांना अधिक काळ लष्करात काम करता येईल आणि त्यांना इतर सुविधाही मिळतील.
- शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे नियुक्त होणाऱ्या उमेदवार 14 वर्ष करू शकतात. तर स्थायी कमिशनमुळे महिलांना 20 वर्षांपर्यंत काम करता येईल आणि त्यात वाढही करता येईल.
दिनविशेष :
- 16 ऑगस्ट 1913 मध्ये स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.
- सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन 16 ऑगस्ट 1960 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
- 16 ऑगस्ट 19162 मध्ये आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.
- जपानला मागे टाकुन चीन ही 16 ऑगस्ट 2010 मध्ये जगातली दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा