17 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

17 August 2018 Current Affairs In Marathi

17 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 ऑगस्ट 2018)

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी कालवश:

  • भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा (16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट) राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
  • माजी पंतप्रधान वाजपेयींच्या जीवनाशी निगडीत काही प्रमुख गोष्टी-
  • 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे जन्म झालेल्या वाजपेयी यांचे शिक्षण उत्तर प्रदेशातील कानपूरमधील लक्ष्मीबाई महाविद्यालयातून एमए राज्यशास्त्रात पूर्ण केले.
  • अटलबिहारी यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी हे कवी आणि शिक्षक होते, मानवीमूल्य आणि राष्ट्रप्रेम हे वाजपेयींच्या कवितांमध्ये आले.
  • स्वातंत्र्याच्या काळात छोडो भारत चळवळीच्या माध्यमातून ते राजकारणाशी जोडले गेले.
  • वाजपेयी यांनी 1939 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) सदस्य म्हणून संघात प्रवेश केला.
  • माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी वाजपेयी यांचे भाषणकौशल्य पाहून ते एकेदिवशी नक्कीच भारताचे पंतप्रधान होतील असे म्हटले होते. Atal Bihari Vajpayee
  • वाजपेयींचे वक्तृत्व आणि संघटन कौशल्य हे जनसंघासाठी कायम महत्त्वाचे ठरले.
  • वाजपेयी यांना 1968 मध्ये दीनदयाळ उपाध्याय यांच्यानंतर जनसंघाचे प्रमुख म्हणून काम पाहावे लागले.
  • भारतात आणीबाणीच्या काळात (1975-1977) वाजपेयी आणि जयप्रकाश नारायण कारागृहात राहिले.
  • 1996 मध्ये ते पहिल्यांदा 13 दिवसांसाठी पंतप्रधान झाले, त्यानंतर 19 मार्च 1998 मध्ये 13 महिन्यांसाठी आणि त्यानंतर ते पाच वर्षांसाठी असे भारताचे तीनवेळा पंतप्रधान राहिले.
  • वाजपेयी हे संसदेचे चाळीस वर्षे सदस्य राहिले. लोकसभेत ते दहावेळा, तर राज्यसभेत दोन वेळा खासदार होते.
  • वाजपेयी यांना 2014 मध्ये भारतातील सर्वाच्च भारतरत्न या किताबाने गौरविण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 ऑगस्ट 2018)

एसबीआय ग्राहकांसाठी महत्त्वाची घोषणा:

  • स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्व डेबिट कार्ड धारकांना एटीएम-कम-डेबिट कार्ड बदलण्याची सुचना केली आहे.
  • सर्व ग्राहकांनी 31 डिसेंबर 2018 पूर्वी मॅगनेटीक स्ट्रीप असलेले कार्ड बदलवून इलेक्ट्रॉनिक चिप (इव्हीएम)कार्ड घ्यावे असे आवाहन एसबीआयकडून करण्यात आले आहे. जर कार्ड बदलवले नाही तर सुरक्षेच्या कारणांमुळे तुमचे कार्ड ब्लॉक केले जाईल असा इशारा एसबीआयने दिला आहे. SBI
  • एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन आणि वेबसाइटवर याबबात माहिती दिली आहे. यामध्ये मॅगनेटीक स्ट्रीप असलेले कार्ड 31 डिसेंबरनंतर ब्लॉक केले जातील, त्याऐवजी ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक चिप (इव्हीएम) कार्ड दिले जाईल असे सांगण्यात आले आहे. आरबीआयच्या आदेशानुसार हा बदल केला जात असल्याचेही एसबीआयकडून सांगण्यात आले आहे.
  • एटीएम कार्ड बदलण्यासाठी ग्राहक ऑनलाइन अर्ज करु शकतात अथवा बॅंकेच्या जवळच्या शाखेत जाऊनही कार्ड बदलण्यासाठी अर्ज करु शकतात. कार्ड बदलण्यासाठी एसबीआयकडून कोणतेही शूल्क आकारले जाणार नाही.
  • एकदा कार्ड ब्लॉक झाल्यानंतर ते कार्ड पुन्हा अनब्लॉक करता येणार नाही. त्यामुळे जुनं कार्ड बदलणं हा एकमेव पर्याय ग्राहकांकडे आहे असं एसबीआयने आपल्या संकेतस्थळावर म्हटलं आहे.

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या रचनेतील बदलांना मान्यता:

  • टेनिसविश्वातील धुरिणांनी 16 ऑगस्ट रोजी 118 वर्षे जुन्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या संरचनेत पायाभूत बदल करण्यास मान्यता दिली आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा 18 संघांमध्ये आणि एका आठवडय़ाच्या कालावधीत घेण्याच्या निर्णयावर सहमती झाली.
  • ओरलँडो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या वार्षिक बैठकीत 120 देशांच्या प्रतिनिधींपैकी 71.43 टक्के सदस्यांनी या बदलांना सहमती दर्शवली. हे प्रमाण बदलांसाठी लागणाऱ्या दोनतृतीयांश प्रमाणापेक्षा अधिक असल्याने निर्णयाला बहुमताने मंजुरी मिळाली. Davis Cup
  • बार्सिलोना फुटबॉलपटू गेरार्ड पिक या बैठकीसाठी स्पेनहून आला. त्याच्या नेतृत्वाखालील कॉसमॉस गटाने दिलेल्या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे अध्यक्ष डेव्हिड हॅगर्टी आणि जपानच्या हिरोशी मिकितानी यांनी अनुमोदन दिले.
  • सध्याच्या स्पर्धा रचनेत खेळाडूंना फेब्रुवारी, जुलै, सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये खेळावे लागते. त्यामुळे मोठे खेळाडू या स्पर्धेत त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळेच त्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • या नवीन संरचनेत सुटसुटीतपणा आणून पात्रता फेब्रुवारीत करुन राऊंड रॉबिन पद्धतीने सामने होऊन अंतिम फेरीत दोन एकेरी, एक दुहेरी सामना घेऊन सर्वोत्कृष्ट तीनमधून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.

दिनविशेष:

  • सन 1666 मध्ये शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.
  • श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म 17 ऑगस्ट 1888 मध्ये झाला.
  • 17 ऑगस्ट 1909 हा दिवस क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांचे स्मृतीदिन आहे.
  • ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1916 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 ऑगस्ट 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.