16 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

 16 January 2019 Current Affairs In Marathi

16 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 जानेवारी 2019)

आर्थिक दुर्बलांचे आरक्षण शैक्षणिक वर्षापासून लागू होणार:

  • आर्थिक दुर्बलांसाठीचे 10 टक्के आरक्षण याच शैक्षणिक वर्षापासून देशभरात लागू होणार आहे.
  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
  • तर यामुळे खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

चीनची ऐतिहासिक कामगिरी:

  • चीनने अंतराळात आणखी एक मैलाचा दगड रोवला आहे. चीनला चंद्रावर कापसाचे बियाणे उगविण्यात यश मिळाले आहे. चंद्रावर उगविण्यात आलेला हा जगातील पहिला जैविक घटक आहे.
  • चीनच्या महत्वकांक्षी ‘चांग ई-4’ मिशनसोबत कापसाबरोबर इतर बियाणे देखील पाठविण्यात आले होते. मात्र, यापैकी कापसाचे बियाणला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमेसाठी हे ऐतिहासिक यश मानले जात आहे. Chang Spacecraft
  • नवीन वर्षात 3 जानेवारी रोजी चीनने ‘चांग ई-4’ हे यान पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या बाजूवर उतरविण्याचा कारनामा करून दाखविला होता. या महत्वकांक्षी मोहिमेसोबत चंद्राच्या भूगर्भशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काही उपकरण पाठवून देण्यात आले होते. यानंतर लागलीच याठिकाणी पहिला जैवप्रयोग करण्यात आला.
  • ‘चांग ई -4’ या मोहिमेसोबत वैज्ञानिकांनी बकेट सारखा एक विशेष धातूचा डब्बा पाठवून दिला होता. यामध्ये माती, पाणी व हवेची व्यवस्था करण्यात आलेली होती.
  • तर कापूस, रेपसीड, बटाटा, अरबीडॉप्सिसच्या बियाणांबरोबर मधमाशांचे अंडे व किन्व पाठवून देण्यात आले होते. या घटकासोबत चंद्रावर करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये यश आले. इतर बियाणे वगळता फक्त कापूसाचे बियाणे उगविण्यास सुरूवात झाले आहे.

ओदिशामध्ये 1550 कोटींहून अधिक रकमेच्या प्रकल्पांचे उद्घाटन:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशामध्ये 1550 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या केंद्र सरकारच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. सदर प्रकल्प राज्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, असे या वेळी मोदी म्हणाले.
  • ओदिशातील संपर्कतेचा विस्तार करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असल्याचे स्पष्ट करून मोदी म्हणाले की, शिक्षण आणि संपर्कता यामुळे समाजाच्या सर्व स्तरांचा वेगाने विकास होईल.
  • शिक्षण, संपर्कता, पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील 1550 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना आपल्याला आनंद होत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
  • ओदिशा राज्यास तिसऱ्यांदा भेट देत असताना मोदी यांनी झारसुगुडा-विजयानगरम आणि संबलपूर-अंगूल या 813 कि.मी.च्या आणि 1085 कोटी खर्चाचा रेल्वेमार्ग विद्युतीकरण देशाला समर्पित केला.

ब्रिटनच्या संसदेला ‘ब्रेक्झिट’ करार अमान्य:

  • ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेलाब्रेक्झिटकरार हा ब्रिटिश संसदेतील खासदारांनी फेटाळून लावला आहे. 15 जानेवारी रोजी ब्रिटनच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात या संदर्भात मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत 423 मते ही कराराच्या विरोधात पडली तर 202 मते ही कराराच्या बाजूने असल्याचे दिसून आले. theresa-brexit
  • सुमारे अडीच वर्षांपूर्वी ब्रिटनच्या जनतेने युरोपियन युनियन सोडण्याचा कल दिला होता. त्यानुसार 29 मार्च 2019 रोजी युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडणार, असे निश्चित झाले होते. पण त्याआधीच ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला.
  • ब्रिटनने ‘लिस्बन‘ कराराचे 50वे कलम लागू करून ‘ब्रेक्झिट’च्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात केली. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनचे उर्वरित युरोपीय महासंघाशी सलोख्याचे संबंध टिकून राहावेत, यासाठी करार केला जात आहे.
  • ब्रुसेल्स परिषदेत युरोपियन युनियन नेत्यांनी ब्रेक्झिटला संमती दिली. युरोपियन युनियनच्या मान्यतेनंतर आता या कराराला ब्रिटनच्या संसदेची मंजुरी मिळणे अनिवार्य आहे.
  • परंतु, ब्रिटनमधील अनेक खासदारांनी या कराराला विरोध दर्शवल्याने ब्रेक्झिटचा प्रश्न आणखी चिघळण्याची लक्षणे दिसत आहेत. सध्या झालेल्या मतदानात तर हा करार फेटाळून लावण्यात आला आहे.

महिला बॉक्सिंग प्रशिक्षकपदी अली कमर यांची नियुक्ती:

  • भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगचे पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा बॉक्सिंगपटू महम्मद अली कमर यांची भारताच्या महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
  • शिवसिंग यांच्या जागी कमर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कमर हे अवघ्या 38 वर्षांचे असून ते वर्षभरापासून साहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
  • कमार यांनी 2002च्या मॅँचेस्टर राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला लाइट फ्लायवेट गटात सुवर्णपदक मिळवून दिले होते. ते भारताचे राष्ट्रकुलमधील पहिले सुवर्णपदक होते.
  • कोलकाताचे रहिवासी असलेल्या कमार यांच्यासोबत इटलीचे प्रशिक्षक राफेल बर्गमॅस्को यांच्यासह अन्य सात प्रशिक्षक आहेत.
  • तर अलीकडेच पुरुषांच्या प्रशिक्षकपदी गुरबक्ष सिंग संधू यांच्या जागी सी.ए. कुटप्पा यांची नियुक्ती करण्यात आली होती.

कोल्हापूरच्या अनुष्काला नेमबाजीत रौप्यपदक:

  • कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील हिने ‘खेलो इंडिया’मध्ये 17 वर्षांखालील दहा मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले. तिने 600 पैकी 569 गुणांची कमाई करीत अग्र आठ खेळाडूंमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले. Anushka Patil
  • या आठ जणींमध्ये अंतिम सामना झाला. यात अनुष्काने 234.7 गुण मिळवत महाराष्ट्राच्या खात्यात रौप्यपदकाची भर टाकली. तिने आतापर्यंत जर्मनी, जपान, झेक रिपब्लिक, इराणमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत चमकदार कामगिरी केली. नुकत्याच इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही तिने सुवर्णपदक मिळविले.
  • अनुष्का क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू आहे. छत्रपती संभाजीराजे नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात अजित पाटील, तर पुणे येथे अब्दुल कय्यूम यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते. अनुष्का चाटे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

दिनविशेष:

  • सन 1681 मध्ये छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला होता.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सन 1941 मध्ये देशाबाहेर प्रयाण.
  • पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते सन 1955 मध्ये उद्घाटन झाले होते.
  • सन 2008 मध्ये टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.