17 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे

17 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 सप्टेंबर 2020)

‘स्पुटनिक 5’ ही लस भारताच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीसमवेत करार:

  • ‘रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड’ या संस्थेने करोनावरील ‘स्पुटनिक 5’ ही लस भारताच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजला वितरणासाठी देण्याचे ठरवले आहे.
  • केंद्रीय औषध नियंत्रकांच्या परवानगीशिवाय रेड्डीज लॅबोरेटरिजला चाचण्या करता येणार नाहीत.
  • रशियाची स्पुटनिक 5 ही सर्दीच्या अ‍ॅडेनोव्हायरस विषाणूपासून बनवलेली लस नक्कीच सुरक्षित आहे, असे आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरील दिमित्रीव यांनी सांगितले.
  • रेड्डी लॅबोरेटरीजचे सह अध्यक्ष जी.व्ही प्रसाद यांनी सांगितले, की आम्ही या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करणार आहोत.
  • त्यातून कोविड विरोधात विश्वासार्ह असा पर्याय उपलब्ध होणार आहे. निती आयोगाचे सदस्य व्ही.के पॉल यांनी रशियन लसीच्या चाचण्या भारतात करण्यास अनुकूलता दर्शवली होती. त्यात 2-4 कंपन्यांनी स्वारस्य दाखवले.

फेसबुकने शेंझेन झेनुआ टेक्नॉलॉजीला बंदी घातली:

  • विद्वान, संशोधक, विचारगट आणि माध्यम संस्था यांच्यासह समाजावर प्रभाव टाकणारे किमान 200 लोक, तसेच महत्त्वाची राजनैतिक पदे भूषवलेले भारतीय विदेश सेवेचे 40 विद्यमान व सेवानिवृत्त अधिकारी यांची नावे चीनच्या झेनुआ डाटा या कंपनीने तयार केलेल्या ओव्हरसीज की इन्फर्मेशन डाटाबेसमध्ये समाविष्ट होती.
  • विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला यांच्यापासून यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिलेले भारताचे इस्रायलमधील राजदूत संजीव सिंगला यांच्यापर्यंतचे अधिकाऱ्यांवर या चिनी कंपनीने पाळत ठेवली होती.
  • याशिवाय या कंपनीने हेरगिरी केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. गुरुमूर्ती आणि संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त निरीक्षण पथकाचे सदस्य ए. गोपीनाथन यांचा समावेश आहे.
  • या कंपनीचे व्यवहार बेकायदेशीर नसले, तरी फेसबुकने शेंझेन झेनुआ डाटा टेक्नॉलॉजीला आपल्या व्यासपीठावर बंदी घातली आहे.

एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे:

  • सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
  • कंपनीवर 60 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच या कंपनीचे खासगीकरण किंवा ती बंद करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.
  • पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2011-12 पासून आतापर्यंत केंद्र सरकारने एअर इंडियामध्ये 30 हजार 520 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

धोनीचं नेतृत्व कोब्रासारखं- माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूचं मत:

  • भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतीय संघाचे यशस्वीरित्या नेतृत्व केले.
  • मधल्या फळीतील काही खेळाडूंना सलामीवीर म्हणून संधी देणे, फिरकी गोलंदाजीने डावाची सुरूवात करणे असे काही दमदार निर्णय घेत त्याने आपली कारकिर्द घडवली.
  • IPLमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतानाही त्याने संघाला तीन विजेतेपदं मिळवून दिली.
  • त्यामुळेच अनेक क्रिकेट जाणकारांनी धोनीच्या नेतृत्वकौशल्याचे कौतुक केले. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डीन जोन्स याने धोनीबद्दल वक्तव्य केलं आहे.
  • धोनी हा एखाद्या कोब्रा सापासारखा आहे. तो समोरच्या खेळाडूकडून चूक होण्याची शांतपणे वाट पाहतो आणि चूक झाली की मग कोब्रासारखा पटकन प्रतिस्पर्ध्याला संपवून टाकतो”, असं ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना डीन जोन्स म्हणाला.

दिनविशेष :

  • 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिदिन म्हणून पाळला जातो.
  • स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 मध्ये झाला.
  • महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म 17 सप्टेंबर 1882 मध्ये झाला.
  • सन 1948 मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन.
Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago