Current Affairs (चालू घडामोडी)

18 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

18 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 फेब्रुवारी 2019)

पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये नो एन्ट्री:

  • काश्‍मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आली.
  • तसेच यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय इंडियन फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन डायरेक्‍टर्स असोसिएशनने (आयएफटीडीए) जाहीर केला.
  • तसेच, पंजाबचे सांस्कृतिकमंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे.
  • दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दादासाहेब फाळके चित्रनगरी बंद ठेवण्यात आली होती. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण दोन तास बंद ठेवले. क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, सुरेश रैना, माजी क्रिकेटपटू महंमद कैफ यांनीही जाहिरातींचे चित्रीकरण बंद ठेवून आदरांजली सभेत सहभाग घेतला.
  • सिद्धू यांची सोनी वाहिनीने ‘द कपिल शर्मा शो’मधून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर आता संघटनेनेही त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी कलाकार, गायक असलेला एकही चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष, सिनेनिर्माता अशोक पंडित यांनी दिला.
  • आदरांजली सभेसाठी चित्रनगरी दुपारी 2 ते 4 या वेळेत बंद ठेवण्यात आली होती. जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशी शपथ या वेळी घेण्यात आली.

‘ESIC’च्या परीक्षार्थींना राज्याबाहेरची परीक्षा केंद्रे:

  • कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) विभागाच्या वतीने विविध पदांसाठी येत्या 26 फेब्रुवारी रोजी परीक्षा होत आहे. मात्र अनेक उमेदवारांना परीक्षेसाठी महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.
  • प्रशासनाच्या असंवेदनशील कारभारामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच याबाबत ईएसआयसीकडून कुठलेही सहकार्य केले जात नाही, असे राज्याबाहेरील केंद्र मिळालेल्या परीक्षार्थींनी सांगितले.
  • ईएसआयसीच्या डेंटल हायजिनिस्ट, ईसीजी टेक्निशियन, लॅब असिस्टंट, ओटी असिस्टंट, आॅक्युपेशनल थेरपिस्ट, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट आणि स्टाफ नर्स या पदांसाठी परीक्षा होत आहे. एकूण 159 पदांसाठी 26 फेब्रुवारी रोजी परीक्षा होत आहे. त्यासाठी उमेदवारांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.
  • परीक्षेसाठी उमेदवारांना तीन केंद्रे निवडीचे पर्याय दिले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांनी मुंबई, पुणे आणि नाशिक ही शहरे निवडली होती. परंतु, प्रवेशपत्र (हॉल तिकीट) मिळाल्यानंतर उमेदवारांना थेट राज्याबाहेरील परीक्षा केंद्र मिळाल्याचे निदर्शनास आले.

आता विमानतळावर मिळणार ई-बोर्डिंग पास:

  • विमानतळावर प्रवाशांना सुरक्षा कक्ष व बोर्डिंग एरियामध्ये प्रवेशासाठी आता ई-बोर्डिंग पास मिळणार आहेत. दोन्ही ठिकाणी ई-गेट बसविले जाणार असून पासवरील बारकोड स्कॅन केल्यानंतरच या गेटमधून प्रवाशांना प्रवेश मिळेल.
  • प्रायोगिक तत्त्वावर देशात पहिल्यांदा हा प्रयोग पुणे विमानतळावर राबविणार आहे. याबाबत विमानतळ संचालक अजयकुमार यांनी दुजोरा दिला.
  • पुणे विमानतळावरून प्रवाशांची संख्या वाढत आहे. पुढील काही महिन्यांत हा आकडा वार्षिक 1 कोटीच्या पुढे जाणार आहे. प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा वाढविण्यासाठीही विमानतळ प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
  • तर याअंतर्गत आता ई-बोर्डिंग पासची चाचणी घेण्यासाठी ‘दि ब्युरो आॅफ सिव्ही एव्हिएशन’ (बीसीएएस)ने मान्यता दिली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे.
  • तसेच त्यानंतर पुढील 45 दिवस चाचणी सुरू राहील. याचा अहवाल ‘बीसीएएस’ला सादर केल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. बनावट तिकिटाच्या आधारे प्रवास करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ)वरील ताणही कमी होणार आहे.

रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार:

  • आगामी लोकसभा निवडणुकीतून सुपरस्टार रजनीकांत यांनी माघार घेतली आहे. रजनीकांत यांच्यासह त्यांचा पक्ष रजनी मक्कल मंदारमचाही निवडणुकीत सहभाग नसेल.
  • अभिनेते रजनीकांत यांनी प्रसिद्धीपत्रक काढूनच तशी घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत माझा किंवा माझ्या पक्षाचा कोणालाही पाठिंबा नसणार नाही. चाहते आणि कार्यतर्त्यांनी आपल्या राजकीय पक्षाचं चिन्हं, झेंडा, फलक अशा कोणत्याही वस्तूचा वापर हा इतर पक्षाच्या प्रचारासाठी न करण्याता सल्लाही त्यांनी दिला.
  • लोकसभा ऐवजी तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांवर आमचं लक्ष असेल असे रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. रजनीकांत यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते नाराज झाले आहेत.
  • अभिनेते रजनीकांत यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी पक्षाच्या नावाची घोषणा करत, राजकारणाच एन्ट्री घेतली होती. ‘रजनी मक्कल मन्दरम‘ असे रजनीकांत यांच्या पक्षाचे नाव आहे.

भारतीय महिलांचे सांघिक विजेतेपद:

  • पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत महिला गटाचे सांघिक विजेतेपद अपेक्षेप्रमाणे भारताने पटकावले. व्दितीय स्थानी सिंगापूरला आणि तृतीय स्थानी मलेशियाला समाधान मानावे लागले. भारताच्या दीपक शिंदे आणि हिमानी परब यांना सर्वोत्तम मल्लखांबपटू म्हणून गौरवण्यात आले.
  • शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या या स्पर्धेत भारताच्या महिला मल्लखांबपटूंनी त्यांच्या कौशल्याचे दर्शन घडवताना 244.73 गुणांसह सांघिक जेतेपदावर नाव कोरले.
  • पुरुषांमध्ये पुरेसे संघच नसल्याचे कारण देत सांघिक विजेतेपद रद्द करण्यात आले. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी प्रत्येक खेळाडूला दोरी आणि पुरलेला मल्लखांब अशा दोन साधनांवर दोन लहान आणि दोन मोठे असे चार संच करणे अनिवार्य होते. महिला आणि पुरुष वयोगटातून निवडल्या गेलेल्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये चुरस रंगली.

दिनविशेष:

  • पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी झाला.
  • स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 मध्ये झाला होता.
  • क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1883 मध्ये झाला.
  • 1979 या वर्षी सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.
  • सन 1998 मध्ये ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago