2 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
2 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 ऑगस्ट 2020)
पतहमी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय :
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीच्या (एमएसएमई) कर्ज हमी योजनेचा विस्तार करून या योजनेत डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल यांच्या व्यावसायिक कर्जाचाही समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने शनिवारी घेतला.
यापुढे 250 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपन्यांनाही कर्ज हमीचा लाभ मिळू शकेल.
एमएसएमई कर्ज हमी योजनेच्या विस्ताराची माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, या योजनेत व्यवसायासाठी घेतलेल्या व्यक्तिगत कर्जाचा समावेश करण्यात आला असून पात्रता निकषांत बसणाऱ्या या योजनेचा लाभ मिळेल.
ही योजना डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल इत्यादींच्या व्यावसायिक कर्जासाठीही लागू असेल, असे आर्थिक सेवा खात्याचे सचिव देबाशीष पांडा यांनी स्पष्ट केले.
कर्ज हमी योजनेचा लाभ जास्तीतजास्त कंपन्यांना व्हावा यासाठी 29 फेब्रुवारी पर्यंतच्या कर्ज थकबाकीची मर्यादा 25 कोटींवरून 50 कोटी करण्यात आली आहे. त्यासाठी वार्षिक उलाढालीची अटही 100 कोटींवरून 250 कोटी करण्यात आली आहे.
एखाद्या कंपनीसाठी कमाल कर्ज रक्कम पूर्वी 5 कोटी होती ती आता 10 कोटी करण्यात आली आहे. लघु व मध्यम उद्योगांसाठी सोमवारपासून आणखी काही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पांडा यांनी केले.
माजी सपा नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.
उत्तर प्रदेशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. जुलै 2016 मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले.
2002 आणि 2008 या वर्षांमध्येही ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
भारतात मोबाइल उत्पादन कारखाने सुरु करायला फॉक्सकॉन, पेगाट्रॉन, सॅमसंग तयार :
देशात मोबाइल उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोडक्शन इंसेटिव्ह योजना आणली आहे.
या 41 हजार कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेमध्ये तैवानमधील फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन तसेच शाओमी, सॅमसंग कंपन्यांनी रुची दाखवली आहे. पीएलआय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी या कंपन्यांनी अर्ज केले आहेत.
देशातील लावा, डिक्सॉन इलेक्ट्रॉनिक्स, कार्बन, ऑप्टीमस इन्फ्राकॉम आणि मायक्रोमॅक्स या कंपन्यांनी सुद्धा अप्रत्यक्षपणे रुची दाखवली आहे.
फॉक्सकॉन अॅपल कंपनीसाठी आयफोनची जोडणी करण्याचे काम करते. पूर्व लडाखमध्ये तणाव असल्यामुळे ओपो, विवो या चिनी मोबाइल कंपन्यांनी मात्र जास्त उत्साह दाखवलेला नाही. पीएलआय योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कंपन्यांना भारतीय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूक करुन नोकऱ्यांची निर्मिती करावी लागेल.
दिनविशेष :
सन 1870 मध्ये जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवेची लंडन मध्ये सुरवात झाली.
आध्यात्मिक गुरू ‘जे.पी. वासवानी’ यांचा जन्म 2 ऑगस्ट 1918 मध्ये झाला.
2 ऑगस्ट 1954 मध्ये दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
सन 2001 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.