2 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
2 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 डिसेंबर 2020)
चीनचे यान यशस्वीरित्या चंद्रावर :
- चीनचे यंत्रमानव म्हणजे रोबोटयुक्त चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर अपेक्षित ठिकाणी मंगळवारी उतरले. चँग इ-5 हे यान यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्याचे चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
- चीनच्या अवकाश कार्यक्रमातील हे मोठे यश असून त्यातून मानवाला यापुढील काळात चंद्रावर उतरवण्यात चीनला यश येऊ शकते.
- चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान गेल्या मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले होते. हे यान लाँग मार्च 5 या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आले होते.
- चँग इ 5 ही अतिशय गुंतागुंतीची चांद्र मोहीम असून त्यात अवकाश इतिहासावर भर देण्यात आला आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जगात प्रथमच चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याची मोहीम राबवली जात आहे.
- अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवले होते. रशियाने खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या. ही अवकाशयाने चंद्रावर जाऊन परत आली होती.
- चीनची मोहीम गुंतागुंतीची आहे कारण त्यात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर त्याचे लँडर व अॅसेंडर हे भाग चंद्रावर उतरले असून तेथील खडकांचे जास्तीत जास्त नमुने गोळा करणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
ब्राह्मोसची नौदलासाठी यशस्वी चाचणी :
- ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या नौदलासाठीच्या आवृत्तीची चाचणी बंगालच्या उपसागरात मंगळवारी यशस्वी झाली आहे.
- लष्कराच्या तीनही सेनादलांसाठी या क्षेपणास्त्राच्या चाचण्या सुरू आहेत. सहा आठवडय़ांपूर्वी अशीच चाचणी नौदलासाठी अरबी समुद्रात घेण्यात आली होती.
- ब्राह्मोस एरोस्पेस या भारत-रशिया यांच्या संयुक्त प्रकल्पात हे स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.
- 24 नोव्हेंबरला त्याची जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी चाचणी 2.8 मॅक वेगाने (ध्वनीच्या तीन पट वेगाने) यशस्वी झाली होती.
दिनविशेष :
- 2 डिसेंबर – जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन
- 2 डिसेंबर 1402 मध्ये लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.
- 2 डिसेंबर 1942 मध्ये एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला