3 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जागतिक अपंग दिन
जागतिक अपंग दिन

3 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 डिसेंबर 2020)

भारत सरकारचा विकिपीडियाला नकाशा हटवण्याचा आदेश :

  • ऑनलाइन एनसायक्लोपीडिया विकिपीडियाच्या साईटवरील नकाशामध्ये अक्साई चीनला चीनमध्ये दाखवण्यात आले आहे. भारत सरकारने यावर आक्षेप घेतला आहे.
  • सरकारने विकिपीडियाला तो नकाशा हटवण्यास सांगितले आहे. सरकारने विकिपीडियाला पाठवलेल्या पत्रामध्ये अत्यंत कठोर शब्दांचा वापर केला आहे.
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने आयटी कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत विकिपीडियाला तो नकाशा हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
  • भारत-भूतान संबंधावरील विकिपीडियाच्या पानावर जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. एका टि्वटर युझरने विकिपीडियाच्या या चुकीकडे लक्ष वेधले. त्याने सरकारकडे कारवाई करण्याचीही विनंती केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 डिसेंबर 2020)

ईडीसह अन्य तपास यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही’:

  • चौकशी करणाऱ्या, तसेच अटकेचे अधिकार असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्यासह इतर तपास यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच रेकॉर्डिग उपकरणे बसवावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला दिले.
  • याशिवाय, प्रत्येक पोलीस ठाणे, सर्व आगमन व निर्गमन मार्ग, मुख्य द्वार, कोठडय़ा आणि स्वागत कक्षासह सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कुठलाही भाग कक्षेतून सुटणार नाही हे सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांनी निश्चित करावे, असे न्या. रोहिंटन नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले.
  • मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ नये यासाठी देशातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2018 साली दिला होता.

ब्रिटननंतर आता रशियातही पुढील आठवड्यात होणार करोनाच्या लशीकरणाला सुरुवात :

  • ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात लशीकरणाला सुरुवात होणार असल्याचे जगभरात जाहीर करण्यात आल्यानंतर आता रशियातही पुढच्या आठवड्यात ऐच्छिक लशीकरणाला सुरुवात करण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी दिले आहेत.
  • पुतीन यांनी संबंधित विभागाला आदेश देताना म्हटलं की, “देशात पुढील आठवड्यात करोना प्रतिबंधासाठी सार्वजनिकरित्या ऐच्छिक लशीकरणाला सुरुवात करा.” ब्रिटन लशीकरणाला सुरुवात करणारा पहिला देश ठरल्यानंतर आता रशिया लशीकरण करणारा दुसऱा देश ठरला आहे.
  • पुतीन यांनी म्हटलं की रशिया पुढील काही दिवसांत करोनाची लस ‘स्पुटनिक व्ही’ चे 20 लाख डोस तयार करणार आहे.
  • रशियाने गेल्या महिन्यांत जाहिर केलं होतं की, ‘स्पुटिनिक व्ही’ अंतरिम चाचणीनंतर करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी 92 टक्के प्रभावी ठरली आहे.

दिनविशेष:

  • 3 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक अपंग दिन‘ आहे.
  • सन 1870 मध्ये बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
  • जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1882 मध्ये झाला.
  • भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 मध्ये झाला.
  • 3 डिसेंबर 1951 हा दिवस कवियत्री ‘बहिणाबाई चौधरी’ यांचा स्मृतीदिन आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.