4 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs
4 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 डिसेंबर 2020)
रणजीतसिंह डिसले यांना लंडनचा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार :
- युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्याकडून दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार गुरुवारी जाहीर झाला.
- जगातील 140 देशांतील शिक्षकांतून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांची निवड करण्यात आली.
- तर सात कोटी रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची घोषणा केली. असा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
- जगभरातील 140 देशांतील 12 हजारांहून शिक्षकांच्या नामांकनातून डिसले गुरुजी अंतिम विजेता ठरले.
- पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडाकरिता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशीलतेला चालना मिळणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
मुखपट्टीविना फिरणाऱ्यांना समुदाय सेवेच्या शिक्षेस स्थगिती :
- सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीविना फिरताना आढळलेल्यांना कोविड-19 रुग्णसेवा केंद्रांत समुदाय सेवेसाठी पाठवण्याचे निर्देश देणाऱ्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.
- तर हा आदेश ‘कायदेशीर अधिकार नसताना’ देण्यात आल्याचा आरोप करून गुजरात सरकारने त्याविरुद्ध केलेल्या अपिलाची न्या. अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी व एम.आर. शहा यांच्या खंडपीठाने नोंद घेतली.
- तसेच उच्च न्यायालयाचा हा आदेश कठोर असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर याचे गंभीर परिणाम होतील, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला होता. त्याचीही नोंद खंडपीठाने घेतली.
मलेरिया रोखण्यात भारताला यश :
- जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल प्रसिद्ध केला असून भारतातील मलेरिया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षण त्यात नोंदवण्यात आले आहे.
- मलेरियाचे अस्तित्व असलेल्या देशांपैकी त्याचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरलेला भारत हा एकमेव देश ठरला आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह जगातील 11 देशांमध्ये मलेरियाच्या दृष्टीने जोखमीच्या प्रदेशांवर लक्ष केंद्रित केले होते. त्या देशांतील रुग्णसंख्येच्या गणितीय प्रारूपाच्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
- 2000 ते 2019 या कालावधीत भारतातील मलेरिया रुग्णांची संख्या तब्बल 72 टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. मलेरियामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही 74 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात नमूद केले आहे.
रजनीकांत यांची राजकीय पक्षाची घोषणा :
- तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
- रजनीकांत यांनी ट्वीट करत 31 डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली.
- तसंच त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी महिन्यापासून कार्यरत होईल असंही यावेळी सांगण्यात आलं.
- यापूर्वी सोमवारी त्यांनी आपला पक्ष रजनी मक्कल मंदरमच्या जिल्हा सचिवांची भेट घेतली होती. तसंच लवकरच आपला राजकीय पक्ष सुरू करण्याबाबत माहिती देणार असल्याचं म्हटलं होतं.
दिनविशेष:
- 4 डिसेंबर हा दिवस ‘भारतीय नौसेना दिन‘ आहे.
- भारताचे माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांचा जन्म 4 डिसेंबर 1910 मध्ये झाला होता.
- भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म 4 डिसेंबर 1919 मध्ये झाला.
- सन 1924 मध्ये गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
- भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची सन 1948 मध्ये नेमणूक झाली होती.