Education News

2 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चीनचे यान यशस्वीरित्या चंद्रावर

2 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 डिसेंबर 2020)

चीनचे यान यशस्वीरित्या चंद्रावर :

  • चीनचे यंत्रमानव म्हणजे रोबोटयुक्त चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर अपेक्षित ठिकाणी मंगळवारी उतरले. चँग इ-5 हे यान यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्याचे चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
  • चीनच्या अवकाश कार्यक्रमातील हे मोठे यश असून त्यातून मानवाला यापुढील काळात चंद्रावर उतरवण्यात चीनला यश येऊ शकते.
  • चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान गेल्या मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले होते. हे यान लाँग मार्च 5 या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आले होते.
  • चँग इ 5 ही अतिशय गुंतागुंतीची चांद्र मोहीम असून त्यात अवकाश इतिहासावर भर देण्यात आला आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जगात प्रथमच चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याची मोहीम राबवली जात आहे.
  • अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवले होते. रशियाने खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या. ही अवकाशयाने चंद्रावर जाऊन परत आली होती.
  • चीनची मोहीम गुंतागुंतीची आहे कारण त्यात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर त्याचे लँडर व अ‍ॅसेंडर हे भाग चंद्रावर उतरले असून तेथील खडकांचे जास्तीत जास्त नमुने गोळा करणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 डिसेंबर 2020)

ब्राह्मोसची नौदलासाठी यशस्वी चाचणी :

  • ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या नौदलासाठीच्या आवृत्तीची चाचणी बंगालच्या उपसागरात मंगळवारी यशस्वी झाली आहे.
  • लष्कराच्या तीनही सेनादलांसाठी या क्षेपणास्त्राच्या चाचण्या सुरू आहेत. सहा आठवडय़ांपूर्वी अशीच चाचणी नौदलासाठी अरबी समुद्रात घेण्यात आली होती.
  • ब्राह्मोस एरोस्पेस या भारत-रशिया यांच्या संयुक्त प्रकल्पात हे स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.
  • 24 नोव्हेंबरला त्याची जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी चाचणी 2.8 मॅक वेगाने (ध्वनीच्या तीन पट वेगाने) यशस्वी झाली होती.

दिनविशेष :

  • 2 डिसेंबर जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन
  • 2 डिसेंबर 1402 मध्ये लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.
  • 2 डिसेंबर 1942 मध्ये एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 डिसेंबर 2020)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago