2 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
2 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 सप्टेंबर 2020)
लस विकसित करण्यासाठी मदत नाही करणार – अमेरिका:
करोना व्हायरसचा फैलाव रोखणारी लस विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटितपणे जे प्रयत्न सुरु आहेत, त्यात सहभागी होणार नाही असे ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले.
लस विकसित करण्यासाठी आणि वितरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करणार नाही अशी ट्रम्प प्रशासनाची भूमिका आहे.
अशा प्रकल्पात काम करताना जागतिक आरोग्य संघटनांसारख्या संस्थांमुळे काही गोष्टी कराव्याच लागतील.
इच्छेविरुद्ध अशा गोष्टी करणे मान्य नसल्यामुळे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करण्यास नकार दिला आहे.
WHO करोनावरील लस विकसित करण्याच्या प्रकल्पात 150 पेक्षा जास्त देश सहभागी असून हा गट WHO शी जोडलेला आहे. नुसार, विविध देशांची सरकारे लस उत्पादक कंपन्यांसोबत व्यक्तीगत पातळीवर करार करत आहेत.
चारू सिन्हा आता श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या महानिरीक्षक:
श्रीगरमधील दहशतवाद्यी कारवायांच्या बिमोड करण्यासाठी आता सीआरपीएफने प्रथमच एका महिला अधिकाऱ्याकडे दहशतवाद विरोधी अभियानाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.
सन 1996 च्या बॅचमधील तेलंगण केडरच्या आयपीएस अधिकारी चारू सिन्हा आता श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या महानिरीक्षक (आयजी) म्हणून काम पाहणार आहेत.
या अगोदर देखील चारू सिन्हा यांना अशाचप्रकारच्या कठीण कामासाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे.
सीआरपीएफच्या आयजी म्हणून त्यांनी बिहारमध्ये नक्षलवाद्या अभियानाचे नेतृत्व करत, नक्षलवाद्याचा बिमोड केला आहे.
त्यांच्या नेतृत्वात नक्षलवादाविरोधात अनेक अभियान यशस्वीरित्या राबवले गेले आहेत. त्यानंतर त्यांची बदली जम्मू येथे बीएसएफच्या आयजी म्हणून झाली.
या ठिकाणी देखील त्यांनी यशस्वीपणे कामगिरी पार पाडली. त्यांच्या कामगिरी पाहून आता त्यांना दहशतवाद्याचा बिमोड करण्यासाठी श्रीनगर सेक्टरच्या आयजी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या अगोदर श्रीनगर सेक्टरच्या आयजी पदाची जबाबदारी एपी माहेश्वरी यांच्याकडे होती.
युएईच्या क्रिकेट बोर्डाकडून IPL संदर्भात महत्त्वाची अपडेट:
बहुप्रतिक्षित IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच केली. युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे.
तर स्पर्धेचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले.
ड्रीम 11ला यंदाचे टायटल स्पॉन्सर्स जाहीर करण्यात आले. 20 ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली.
त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले. त्यानंतर आज एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
दिनविशेष :
2 सप्टेंबर 1916 मध्ये पटणा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन2 सप्टेंबर 1920 मध्ये झाले.
व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून2 सप्टेंबर 1945 मध्ये स्वतंत्र झाला.
2 सप्टेंबर 1946 मध्ये भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक 2 सप्टेंबर 1960 मध्ये झाली.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.