20 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (20 ऑक्टोबर 2021)
उत्तर कोरियाकडून आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी :
- उत्तर कोरियाने पाणबुडीवरून सोडण्याचे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले असून त्या देशाच्या लष्करी क्षमतेचा हा परमोच्च बिंदू मानला जात आहे.
- उत्तर कोरियाने कमी पल्ल्याचे एक क्षेपणास्त्र स्निपो या पूर्वेकडील बंदराच्या दिशेने सोडले. या क्षेपणास्त्र चाचणीचा अभ्यास आता अमेरिका व दक्षिण कोरिया करीत आहे.
- दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे की, समुद्रावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले असले, तरी ते पाणबुडीतून सोडले असे ठामपणे म्हणता येणार नाही पण तशी शक्यता नाकारता येत नाही.
- जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी सांगितले की, त्यांच्या देशाने प्राथमिक विश्लेषण केले असून दोन आंतरखंडीय क्षेपणास्त्रे सोडण्यात आली आहेत.
- जपानच्या तटरक्षक दलाने म्हटले आहे की, सागरी सुरक्षा सल्ला जारी करण्यात आला असून क्षेपणास्त्र नेमके कुठे पडले हे समजलेले नाही.
- स्निपो येथे मोठे संरक्षण उद्योग केंद्र असून उत्तर कोरियाने तेथे पाणबुडी निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे.
- अलिकडच्या काही काळात स्निपो येथे आंतरखंडीय क्षेपणास्त्रे तयार केली जातात व ती पाणबुडीतून सोडण्यास अनुकूल असतात.
- उत्तर कोरियाने यापूर्वी कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी ऑक्टोबर 2019 मध्ये केली होती.
चीनमध्ये नव्या कायद्याची तयारी :
- चीनमध्ये मुलांच्या वाईट सवयी आणि गुन्ह्यांना आता पालकांच्या संस्काराला जबाबदार धरलं जाणार आहे.
- तसेच यासाठी पालकांना विशिष्ट प्रकारची शिक्षाही दिली जाणार आहे.
- चीन सरकारने याबाबत एक कायद्याचा मसुदा तयार केला आहे. लवकरच या प्रस्तावित विधेयकाला मंजूरी देऊन त्याचं कायद्यात रुपांतर करण्याचा चीनचा प्रयत्न आहे.
- त्यामुळे आपल्या पाल्यांबाबत पालकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
- पालकांनी योग्य वळण न लावल्यानं आणि योग्य काळजी न घेतल्यानंच त्या मुलानं ती चुकीची कृती किंवा गुन्हा केला असा अर्थ काढला जाणार आहे.
- तसेच यात दोषी सिद्ध झाल्यास संबंधित पालकांना चीनच्या शिक्षण मंत्रालयानं विकसित केलेल्या “कुटुंब शिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमा”ला सामोरं जावं लागेल.
अमरिंदर सिंग यांची नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा :
- पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर जवळपास महिन्याभराने अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली.
- शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढला तर भाजपशी युती करणार असल्याचेही अमरिंदर यांनी जाहीर केले.
- तर पंजाबमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत.
- सत्ताधारी कॉग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल, भाजप यांच्यासह अमरिंदर यांच्या नव्या पक्षामुळे पंजाबची निवडणूक पंचरंगी होईल.
जागतिक बॉक्सिंग स्पर्धेपासून मानाचा पट्टा, पांढरे ग्लोव्हज :
- बेलगे्रड येथे होणाऱ्या आगामी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेपासून मानाचा पट्टा आणि परंपरागत लाल-निळ्या ग्लोव्हजऐवजी पांढरे ग्लोव्हज वापरण्यात येणार आहे, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडून (एआयबीए) करण्यात आली आहे.
- जागतिक बॉक्सिंग स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून बेलग्रेड (सर्बिया) येथे सुरू होणार असून विजेत्या आणि उपविजेत्या बॉक्सिंगपटूंना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके दिली जातील.
- त्यामुळे बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्याला मानाचा पट्टा, पदक आणि रोख पारितोषिक असे तिहेरी इनाम लाभणार आहे.
- तसेच 26 लाख डॉलर रकमेची रोख पोरितोषिके देण्यात येणार असल्याचे ‘एआयबीए’ने आधीच जाहीर केले आहे.
- याशिवाय सहभागी क्रीडापटूंना क्रीडा साहित्यावर त्यांच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
हरभजन सिंगला मिळाला ‘मोठा’ सन्मान :
- मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC)सन्मान म्हणून 18 आंतरराष्ट्रीय खेळाडूंना (महिला आणि पुरुष) आजीवन सदस्यत्व दिले आहे.
- तर या 18 खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे दोन भारतीय खेळाडू आहेत.
- तसेच माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांना मेरीलेबोन क्रिकेट क्लबने आजीवन सदस्यत्व दिले आहे.
- याशिवाय इंग्लंडच्या चार, दक्षिण आफ्रिकाच्या चार, वेस्ट इंडीजच्या तीन, ऑस्ट्रेलियाच्या दोन आणि श्रीलंका, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्या प्रत्येकी एक खेळाडूंचा या यादीत समावेश आहे.
- इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये माजी कर्णधार सर अॅलिस्टर कुक, इयान बेल, मार्कस ट्रेस्कोथिक आणि माजी महिला यष्टीरक्षक सारा टेलर यांचा समावेश आहे.
- दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये हाशिम आमला, हर्शेल गिब्स, जॅक कॅलिस आणि मॉर्ने मॉर्केल यांचा या सन्माननीय यादीत समावेश करण्यात आला आहे.
- डेमियन मार्टिन आणि महिला फलंदाज अॅलेक्स ब्लॅकवेल यांची ऑस्ट्रेलियासाठी निवड झाली आहे.
दिनविशेष:
- 20 ऑक्टोबर हा जागतिकऑस्टियोपोरोसिस दिन तसेच जागतिक सांख्यिकी दिन म्हणून पाळला जातो.
- कृ.भा. बाबर यांनी सन 1950 मध्ये समाजशिक्षणमाला स्थापन केली.
- चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे सन 1962 मध्ये चीन-भारत युद्धास सुरवात.
- सन 1969 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना झाली.
- हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना सन 1970 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर.