22 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
22 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 जून 2020)
अर्सेनलला ब्रायटनकडून 1-2 अशी हार पत्करावी लागली-इंग्लिश प्रीमियर लीग:
- करोनानंतर इंग्लिश प्रीमियर लीगला सुरुवात झाल्यानंतर अर्सेनलला अद्याप सूर गवसलेला नाही.
- गेल्या तीन दिवसांत सलग दुसऱ्या पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले आहे.
- तर शनिवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात अर्सेनलला ब्रायटनकडून 1-2 अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे त्यांची गुणतालिकेत 10व्या स्थानी घसरण झाली आहे.
- तसेच प्रशिक्षक मायके ल अर्टेटा यांना खेळाडूंच्या दुखापतींच्या समस्येवर उपाय शोधून काढावा लागणार आहे.
- अन्यथा चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरणे त्यांना कठीण जाणार आहे. बेर्नाड लेनो हा अर्सेनलचा या मोसमातील सर्वोत्तम खेळाडू उजव्या पायाच्या घोटय़ावर पडल्यामुळे त्याला दुखापत झाली.
- तर निकोलस पेपे याने 68व्या मिनिटाला अर्सेनलचे खाते खोलले, पण त्यानंतर त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही.
- लुइस डंक (75व्या मिनिटाला) आणि नील मॉपे याने अखेरच्या क्षणी गोल करत ब्रायटनला विजय मिळवून दिला. दोन दिवसांपूर्वी अर्सेनलला मँचेस्टर सिटीकडून 0-3 असे पराभूत व्हावे लागले होते.
- बॉर्नेमाऊथला क्रिस्टल पॅलेस संघाकडून 0-2 अशी हार पत्करावी लागल्यामुळे पुढील वर्षीच्या प्रीमियर लीगमधून त्यांच्यावर बाहेर पडण्याची नामुष्की ओढवणार आहे.
- लुका मिलिवोजेव्हिक याने 12व्या मिनिटाला 25 यार्डावरून फ्री-किकवर गोल केल्यानंतर 23व्या मिनिटाला जॉर्डन अयेवने गोल करत क्रिस्टल पॅलेसला विजय मिळवून दिला.
Must Read (नक्की वाचा):
देशात करोनाच्या रुग्णांचा नवा उच्चांक नोंदविण्यात आला:
- देशात करोनाच्या रुग्णांचा नवा उच्चांक रविवारी नोंदविण्यात आला. गेल्या 24 तासांत करोनाचे 15 हजार 413 रुग्ण आढळले.
- यामुळे आठ दिवसांपूर्वी तीन लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतातील रुग्णसंख्या 4 लाख 10 हजार 469 झाली आहे.
- उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 50 हजारांहून अधिक आहे.
- तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 55.49 टक्क्यांवर पोहोचले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 2 लाख 27 हजार 755 झाली असून, गेल्या 24 तासांमध्ये 13 हजार 925 रुग्ण बरे झाले.
- देशभरात एक लाख 69 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- करोनामुळे आतापर्यंत 13 हजार 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 306 रुग्ण दगावले.
- देशातील मृतांचे प्रमाण 3.2 टक्के आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 90 हजार 730 चाचण्या घेण्यात आल्या.
- आतापर्यंत एकूण 66,7,226 नमुना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
अमेरिकेनंतर ब्राझिल ठरतोय करोनाचा नवा हॉस्पॉट:
- जगाला लागलेलं करोना व्हायरसचं ग्रहण सुटायचं नाव घेईना. अमेरिकेनंतर आणखी एका देशात करोनाच्या मृत्यूचा तांडव सुरू आहे.
- अमेरिकेत करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या एक लाखांच्यापुढे गेली आहे. अमेरिकेनंतर ब्राझिलची परिस्थिती चिंताजनक आहे.
- ब्राझिलमध्ये करोनाचं थैमान अजूनही कमी झालेलं नाही. एएफपीनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझिलमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये सर्वाधिक करोना महामारीचा प्रादुर्भाव झाला आहे.
- तर मागील 24 तासांत ब्राझिलमध्ये 1022 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- तसेच ब्राझिलमध्ये आतापर्यंत 50 हजार 629 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- गेल्या 24 तासांत ब्राझिलमध्ये 34 हजार नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
- तसेच देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 90 हजार झाली आहे.
- ब्राझिलच्याआधी सर्वाधिक मृत्यू अमेरिेकेत झाले आहेत. अमेरिकेत एक लाख 22 हजार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचे दीर्घ आजाराने निधन:
- रणजी ट्रॉफी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी टिपणारे लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचं रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले.
- राजेंद्र गोयल 77 वर्षांचे होते. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात त्यांनी सर्वाधिक 637 बळी टिपले.
- तर इतर कोणत्याही खेळाडूला अद्याप 600 बळींचा टप्पा गाठता आलेला नाही.
- गोयल यांनी रणजी क्रिकेट गाजवले, पण दुर्दैवाने त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही.
- गोयल यांनी रणजीच्या एका हंगामात 25 पेक्षा जास्त बळी टिपण्याचा कारनामा 15 वेळा केला.
- तसेच हरयाणाच्या गोयल यांनी 157 सामने खेळले. तर 55 धावांत 8 बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यांनी 59 वेळा एका डावात 5 बळी तर 18 वेळा एका सामन्यात 10 बळी टिपण्याची किमया साधली.
- त्यांनी आपल्या रणजी कारकिर्दीत 1,037 धावाही केल्या. ते पतियाळा, पंजाब आणि दिल्ली या संघांकडून क्रिकेट खेळले.
दिनविशेष :
- 22 जून सन 1757 मध्ये प्लासीची लढाई सुरू झाली.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन 22 जून 1940 रोजी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
- महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण 22 जून 1994 मध्ये जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्यात महिलांना 30 टक्के आरक्षण.
- अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे 194 दिवस 18 तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून 22 जून 2007 रोजी त्या पृथ्वीवर परत आले.