Current Affairs (चालू घडामोडी)

23 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

23 January 2020 Current Affairs In Marathi

23 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 जानेवारी 2020)

‘गगनयान’च्या पूर्वतयारीसाठी डिसेंबरमध्ये निर्मनुष्य अवकाश मोहीम :

  • भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेची पूर्वतयारी म्हणून या वर्षी डिसेंबरमध्ये पहिली निर्मनुष्य अवकाश मोहीम हाती घेतली जात असून तशीच दुसरी मोहीम जून 2021 मध्ये होणार आहे.
  • तर त्यानंतर 2021 मध्ये भारताचे अवकाशवीर गगनयानातून अवकाशात पाठवले जातील, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी दिली.
  • तसेच गगनयान मोहीम तीन टप्प्यांची आहे. त्यात डिसेंबर 2020 व जून 2021 मध्ये निर्मनुष्य म्हणजे मानवरहित अवकाश मोहिमा होतील. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये भारताचे अवकाशवीर अंतराळात जातील.
  • अवकाशात भारतीयांचे अस्तित्व या मोहिमातून सिद्ध होणार आहे. मानवी अवकाश कार्यक्रमाची ही भारतासाठी नवी सुरुवात आहे. गगनयान मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून निवड झालेल्या भारतीय अवकाशवीरांना बेंगळुरू येथील केंद्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • भारताच्या अवकाशवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी व्योममित्र (अवकाशमित्र) नावाच्या स्त्री अर्धयंत्रमानवास (याला पाय नसतात) गगनयानातून पाठवले जाणार आहे. पहिला अवकाशवीर युरी गागारिन याला रशियाने अवकाशात पाठवले त्याआधी इव्हान इव्हानोविच हा यंत्रमानव त्यावेळीही चाचणीसाठी पाठवण्यात आला होता.
  • तर हा स्त्री यंत्रमानव बुधवारी मानवी अवकाश मोहिमांवरील परिसंवादात सादर करण्यात आला. व्योम याचा अर्थ अवकाश असा असल्याने व्योममित्रचा अर्थ अवकाश मित्र असा आहे.
  • तसेच या यंत्रमानव महिलेने तिचा परिचय उपस्थितांना करून देताना सांगितले की, मी व्योममित्र, यंत्रमानव, गगनयानच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेत मी अवकाश प्रवास करणार आहे.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा :

  • महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद मिळवण्याचा मान महाराष्ट्राने पटकावला.
  • महाराष्ट्राने 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्यपदकांसह एकूण 256 पदकांची कमाई करत विजेतेपद मिळवले.
    तर हरयाणा 200 पदकांसह दुसऱ्या स्थानी तर दिल्ली 122 पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.
  • नवीनचंद्र बाडरेली स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्यात महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला.
  • तसेच महाराष्ट्राने यंदा 20 क्रीडाप्रकारांपैकी 19 खेळांमध्ये सहभाग नोंदवला होता.

महाराष्ट्राच्या अथर्व आणि देवेशला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’:

  • कला व संस्कृती क्षेत्रातील योगदानासाठी अथर्व लोहार, तर गणितातील सृजनात्मक कार्यासाठी देवेश भैय्या या महाराष्ट्रातील दोन बालकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • तर पदक, एक लाख रुपये, व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • सातारा जिल्ह्यातील फलटणच्या व सध्या अंबरनाथमध्ये राहणाऱ्या 11 वर्षांच्या अथर्वला बाल तबलावादक म्हणून कला व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार दिला. थायलंडच्या तबलावादन स्पर्धेत अथर्वने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
  • तसेच गणितज्ज्ञ देवेश भैय्या या 13 वर्षांच्या बालकाने गणितात योगदान दिले आहे. देवेश जळगावमधील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे.
  • मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनच्या होमी भाभा ज्युनियर सायन्टिस्ट परीक्षेत आणि साऊथईस्ट एशियन मॅथेमॅटिकल आॅलिम्पियाडमधे सादर केलेल्या शोध प्रबंधासाठी देवेशला सुवर्ण पदक मिळाले आहे. इग्नायटेड माइंडलॅब परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळविणारा देवेश हा पहिला भारतीय बनला आहे.

राजे परमार ‘पालघर श्री’चा मानकरी :

  • पालघर आणि ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स फिटनेस असोसिएशन, रांगडे जिम्नॅशिअम आणि बहुजन विकास आघाडी (युवा आघाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपारा पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात नुकतीच राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा झाली होती.
  • तर एकूण आठ वजनी गटात झालेल्या या स्पर्धेतील मानाचा ‘मॅन फिजिक्स पालघर श्री 2020’ हा किताब बी फिटच्या राजे परमार याने पटकावला.
  • तसेच ‘मास्टर पालघर श्री’चा किताब भांबले जिमच्या चिराग पाटील याने जिंकला. दिव्यांग शरीरसौष्ठवपटूंच्या गटात योगेश मेहेर (टोटल फिटनेस) हा दिव्यांग ‘पालघर श्री’चा मानकरी ठरला.

दिनविशेष:

  • सन 1708 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली होती.
  • डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही सन 1849 मध्ये वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर बनल्या.
  • ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये झाला होता.
  • उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचा जन्म 23 जानेवारी 1915 मध्ये झाला.
  • हिंदुहृदयसम्राट ‘बाळासाहेब ठाकरे’ यांचा जन्म 23 जानेवारी 1926 मध्ये झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Shital Burkule

Shital is very passionate content writer and likes to write about more stuff related to news about education.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago