24 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
24 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 जानेवारी 2020)
अमेरिकेत येणाऱ्या गर्भवती महिलांना आता व्हिसा नाही :
- अन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना आता अमेरिकेचा व्हिसा देण्यात येणार नाही. ट्रम्प प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
- तर अन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना टेंपररी व्हिजिटर (बी1-बी2) व्हिजा येणार नाही. अमेरिकेतील ‘बर्थ टूरिझम’ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- तसेच नव्या नियमांचा संबंध आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशीही आहे. तसंच ‘बर्थ टूरिझम’द्वारे होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करणंदेखील यात समाविष्ट असल्याचं ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं.
- नव्या नियमांनुसार गर्भवती महिलांना प्रवासी व्हिसावर अमेरिकेत प्रवास करणं कठीण होणार आहे. गर्भवती महिलांना अमेरिकेत जायचं असल्यास त्यांना अमेरिकेत जाण्याचं कारण काऊन्सिलर अधिकाऱ्याला पटवून द्यावं लागणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
कंपन्यांच्या ‘सीएसआर’ खर्चात 18 टक्के वाढ :
- राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये सामाजिक दायीत्व उपक्रम अर्थात ‘सीएसआर’वर 11,961 कोटी रुपये खर्च केले, जे आधीच्या वर्षांच्या तुलनेत 18 टक्के अधिक होते.
- 2017-18 मध्ये याच कंपन्यांनी 10,179 कोटी रुपये खर्च केले होते. उल्लेखनीय म्हणजे या रकमेपैकी 4,440 कोटी रुपये हे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणावर कंपन्यांकडून खर्च करण्यात आले आहेत.
- तसेच एनएसई आणि प्राइम डेटाबेस यांनी संयुक्तपणे स्थापित केलेल्या ‘एनएसई इन्फोबेस डॉट कॉम’ या कंपनीने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, एनएसईवर सूचिबद्ध कंपन्यांकडून मागील पाच वर्षांत, सामाजिक उपक्रमांवरील खर्चात वार्षिक सरासरी 17 टक्के दराने दमदार वाढ होत आली आहे.
- तर विविध सामाजिक उपक्रमांवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या अव्वल 10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, इंडियन ऑइल, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस, इन्फोसिस, टाटा स्टील, आयटीसी, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. या 10 कंपन्यांचा एकूण खर्चात 36 टक्के वाटा असल्याचे ‘एनएसई इन्फोबेस’चा अहवाल सांगतो.
पॅन-आधार लिंक नसेल तरी ‘नो टेंशन’:
- केंद्र सरकारने आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. यासाठी अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतर आता 31 मार्च 2020 पर्यंत आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत सरकारने दिली आहे.
- पण, याबाबत गुजरात उच्च न्यायालयाने अजूनही पॅन-आधार लिंक न केलेल्यांसाठी दिलासादायक निर्णय दिला आहे. ‘आधारकार्डशी लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द करत येणार नाही’ असा निर्णय कोर्टाने दिला आहे.
- तसेच एखाद्या व्यक्तीने आपले आधारकार्ड पॅनसोबत लिंक केले नसेल तरी त्याला आयकर परतावा भरण्यापासून किंवा व्यवहार करण्यापासून रोखू शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
- सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत आधार अॅक्टच्या वैधतेबाबत अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत सरकार कोणाचंही पॅन कार्ड अवैध ठरवू शकत नाही किंवा त्या व्यक्तीला डिफॉल्टर घोषीत करु शकत नाही. असंही कोर्टाने स्पष्ट केलं. एका याचिकेच्या सुनावणीवेळी हायकोर्टाने हा निर्णय दिला.
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धात थीम, वॉवरिका यांचे विजय :
- ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम आणि स्वित्र्झलडचा स्टॅनिस्लास वॉवरिंका यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत संघर्षपूर्ण विजयाची नोंद करून पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली.
- तर त्याशिवाय राफेल नदाल, अॅलेक्झांडर झ्वेरेव्ह, सिमोना हॅलेप आणि अँजेलिक कर्बर यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर सहज मात करून विजयी घोडदौड कायम राखली.
- मेलबर्न एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत पाचव्या मानांकित थीमने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स बोल्टला 6-2, 5-7, 6-7 (5-7), 6-1, 6-2 असे पराभूत केले.
दिनविशेष:
- 24 जानेवारी – शारीरिक शिक्षण दिन
- 24 जानेवारी – राष्ट्रीय बालिका दिवस
- सन 1857 मध्ये दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.
- एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान 24 जानेवारी सन 1966 मध्ये युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले होते.
- सन 1976 मध्ये ‘बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे 1 ऑगस्ट 1977 रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL) असे करण्यात आले.
- सन 1984 मध्ये कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा