25 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
25 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 जानेवारी 2020)
मार्केटिंग प्रमुखपदी अविनाश पंत यांची नियुक्ती :
- सोशल मीडियाची दिग्गज कंपनी फेसबुक भारतात मार्केटिंगवर अधिक भर देणार असल्याचं दिसतंय. कारण, कंपनीने अविनाश पंत यांची फेसबुक इंडियाचे मार्केटिंग प्रमुख (विपणन संचालक) म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे.
- तर अविनाश पंत यांची विपणन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- तसेच विपणन संचालक हे नवं पद असेल आणि फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅपसह फेसबुकच्या मालकिच्या सर्व अॅप्सवरील मार्केटिंगच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल.
- पंत यांच्याकडे 22 वर्षांचा अनुभव असल्याची माहिती फेसबुकने दिली. पंत यांच्याकडे यापूर्वी नाइकी, कोकाकोला, दी वॉल्ट डिज्नी कंपनी आणि रेडबुल यांसारख्या कंपन्यांसोबत काम करण्याचा मोठा अनुभव आहे.
Must Read (नक्की वाचा):
देशभरातील प्रशिक्षणार्थींसाठी पुण्यात सुसज्ज प्रशिक्षण केंद्र :
- पुण्यातील बिनतारी संदेश विभागाच्या मुख्यालयात देशातील प्रशिक्षणार्थींना एकाच वेळी प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याचे पोलीस बिनतारी संदेश विभागाचे संचालक रितेशकुमार यांनी सांगितले.
- तर पाषाण येथील पोलीस बिनतारी संदेश विभागाच्या 206 तांत्रिक सहायक पोलीस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल पदाच्या प्रशिक्षणार्थींचा दीक्षान्त संचलन सोहळा गुरुवारी पार पडला. त्यावेळी रितेशकुमार यांनी ही घोषणा केली.
- पोलीस आयुक्त डॉ. के़. वेंकटेशम हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या वेळी पोलीस उपमहानिरीक्षक राजेंद्र डहाळे, पोलीस उपअधीक्षक अनिल भोपे तसेच बिनतारी संदेश विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- अखिल भारतीय पोलीस महासंचालक/पोलीस महानिरीक्षक यांची परिषद पुण्यात 6 ते 8 डिसेंबर घेण्यात आली होती. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते.
- या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रात देशभरातील विविध राज्यांतील बिनतारी संदेश विभागातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांच्यासाठी विविध कोर्स सुरू करण्यात येणार आहेत.
- ई-लर्निंगच्या माध्यमातून ते प्रशिक्षणही घेऊ शकणार आहेत. त्यात प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येईल. येत्या 2 वर्षांत हे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मनोदय आहे.
पहिल्या टी-20 सामन्यात घडला अनोखा विक्रम :
- सलामीवीर लोकेश राहुलचं अर्धशतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात विजयाची नोंद केली आहे.
- न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 204 धावांचं आव्हान भारताने 6 गडी राखत पूर्ण केलं.
- तर लोकेश राहुलने या सामन्यात 56 तर विराट कोहलीने 45 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत नाबाद 58 धावा केल्या. पहिल्या सामन्यातील विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडीही घेतली आहे.
- तसेच दरम्यान या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांच्या इतिहासात दोन्ही संघातल्या 5 खेळाडूंनी अर्धशतकी खेळी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
‘किंग कोहली’ अव्वल स्थानावर कायम :
- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचं कसोटी क्रमवारीतलं अव्वल स्थान कायम राहिलेलं आहे.
- आयसीसीने शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत, विराट 928 गुणांसह पहिल्या स्थानी कायम असून, भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीतही सुधारणा होऊन तो आठव्या स्थानी आलेला आहे.
- विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे.
- तर या दौऱ्यात भारतीय संघ 5 टी-20, 3 वन-डे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.
दिनविशेष:
- 25 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ आहे.
- 25 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कायदा करून मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
- मॉस्को विद्यापीठाची स्थापना सन 1755 मध्ये झाली.
- सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या ‘रमाबाई रानडे’ यांचा जन्म 25 जानेवारी 1862 रोजी झाला होता.
- सन 1971 या वर्षी हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे 18वे राज्य बनले.
- आचार्य विनोबा भावे यांना सन 1982 मध्ये भारतरत्न प्रदान.
- मोरारजी देसाई यांना सन 1991 या वर्षी भारतरत्न प्रदान.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा