27 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
27 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 जानेवारी 2020)
5500 बेवारस मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार त्यांचा ‘पद्मश्री’नं झाला गौरव :
- बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मोहम्मद शरीफ यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.
- भारत सरकारकडून शनिवारी संध्याकाळी यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये अयोध्येतील मोहम्मद शरीफ यांच्या नावाचाही समावेश आहे.
- शरीफ हे गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही धार्मिक भेदभावाविना बेवारस मृतदेहांवर अत्यंसंस्कार करीत आहेत.
- त्यांच्या या माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या कामाची आज देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.
- देशात अनेकदा धार्मिक कारणांवरुन संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हे सर्व निरर्थक असल्याचा विचार करायला लावणारं मोहम्मद शरीफ हे व्यक्तीमत्व आहे. कोणाच्याही धर्मापेक्षा माणूस त्यांच्यासाठी महत्वाचा आहे.
- तर त्यांच्यासाठी मरणानंतरही माणसाचा सन्मान महत्वाचा असल्याने त्यांनी स्वतःला या कामात गुंतवूण घेतलं आहे.
- अखेर त्यांच्या या निरंतर सेवेची दखल घेऊन सरकारनेही त्यांना देशातील मानाच्या नागरी पुरस्कारानं गौरविलं आहे.
- तसेच आजवर 3000 हिंदू मृतदेहांवर तर 2500 मुस्लिमांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
17,000 फूट उंचावर जवानांनी फडकावला तिरंगा :
- इंडो-तिबेटिअन बॉर्डर पोलीस जवानांनी (आयटीबीपी) प्रजासत्ताक दिनानिमित्त 17,000 फुट उंचीवर ध्वजारोहण केले. त्यांचा हो फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
- तर सध्या या ठिकाणचे तापमान हे उणे 20 डिग्री इतके आहे. अशा बिकट वातावरणातही त्यांच्यामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जराही कमी झालेला दिसत नाही. पाढऱ्या पोशाखात असलेल्या अकरा जवानांनी थेट बर्फावर संचलन केले.
- तसेच प्रत्येकाच्या हाती त्यांनी गन होतीच. शिवाय पहिल्या जवानाच्या हाती उंच तिरंगा होता.
ऑक्सफर्ड शब्दकोशात ‘चाळ’ आणि ‘डब्या’चा समावेश :
- इंग्रजी संभाषणातील वापर आणि प्रचलित शब्द या निकषांवर जगभरातील नव्या अर्थपूर्ण शब्दांना सामावून घेणाऱ्या ‘ऑक्सफर्ड लर्नर्स डिक्शनरी’मध्ये आता भारतात बोलल्या जाणाऱ्या आणखी 26 शब्दांना स्थान देण्यात आले आहे.
- विशेष म्हणजे यात मराठमोळे डब्बा (जेवणाचा), चाळ (वसती) हे शब्द आणि शादी, हरताळ, आधार (आधार कार्ड) यांचा समावेश आहे.
- ऑक्सफर्ड शब्दकोशाची ही अद्यायावत दहावी आवृत्ती शुक्रवारी प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीत 384 भारतीय (भारतीय इंग्रजी) शब्दांचा समावेश आहे.
- तर यावेळी एकूण एक हजार नव्या शब्दांना या कोशाने सामावून घेतले आहे. त्यात चॅटबॉट, फेक न्यूज आणि मायक्रोप्लास्टीक या शब्दांचा समावेश आहे.
- ऑक्सफर्ड लर्नर्स डिक्शनरीचे संकेतस्थळ आणि अॅप यांच्या माध्यमातून वाचकांशी झालेल्या संवादातून ही नवी आवृत्ती साकारली आहे. या संकतस्थळावर दृकचित्र माध्यमातून स्वाध्याय, संवाद, अभ्यास यांच्याबरोबरच अद्ययावत आय-रायटर आणि आय-स्पीकर साधनांची सुविधा आहे.
- नव्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये अंतर्भूत केलेल्या 26 नव्या भारतीय शब्दांपैकी 22 शब्दांना मुद्रित आवृत्तीमध्ये स्थान दिले आहे.
- या शब्दकोशातील अन्य भारतीय शब्दांत, आंटि (एयूएनटीआयइ) (आन्टी- एयूएनटीवाय या इंग्रजी शब्दाचे भारतीय रूप), बस स्टॅन्ड, टय़ूब लाइट, व्हेज आणि व्हिडिओग्राफ यांचा समावेश आहे.
- तसेच ऑक्सफर्ड शब्दकोशाला 77 वर्षे होत असून त्याचा श्रीगणेशा 1942 मध्ये जपानमध्ये झाला. या कोशाचे कर्ते अल्बर्ट सिडने यांचा उद्देश हा जगभरातील भाषा अभ्यासकांना इंग्रजी वापरातील शब्दांचा अर्थ समजावा हा होता.
प्रजासत्ताक दिनी राजपथावर घडले संस्कृती, सामर्थ्याचे दर्शन :
- भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. राजधानी दिल्लीत यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
- तर दरम्यान, राजपथावर विविध चित्ररथांच्या माध्यमातून देशाच्या सामर्थ्याचे आणि संस्कृतीचे दर्शन घडले.
- प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळपासूनच विविध राज्यांच्या मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहणासह सुरक्षा दलांच्या परेड आणि सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतरही दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे.
- विशेषतः भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी यंदाही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी राजपथावर लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्यावतीने चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. त्याचबरोबर देशाकडे असलेल्या शस्त्र-अस्त्रांचे दर्शनही घडवण्यात आले.
जेटली, स्वराज, फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण :
- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी केंद्र सरकारने पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे नागरी पुरस्कार जाहीर केले.
- पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला, तर माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला.
- तसेच महाराष्ट्रातील 13 मान्यवरांना नागरी पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांत उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण, तर पोपटराव पवार, बीजमाता राहिबाई पोपेरे आणि मुस्लीम सत्यशोधक कार्यकर्ते सय्यदभाई यांच्यासह 12 जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले आहेत.
- तर एकूण 141 जणांना नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यांत सात जणांना पद्मविभूषण, 16 जणांना पद्मभूषण आणि 118 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले.
- पुरस्कार विजेत्यांमध्ये 34 महिलांचा समावेश आहे. तर 18 मान्यवर परदेशी किंवा अनिवासी भारतीय आहेत. त्याचबरोबर 12 मान्यवरांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
लोकेश राहुलची अनोख्या विक्रमाची नोंद :
- टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुल सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात राहुलने नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
- लोकेश राहुलने 50 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५७ धावा केल्या. या अर्धशतकी खेळाच्या जोरावर राहुलने अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
- तर न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल आता पहिल्या स्थानी आहे.
- तसेच याचसोबत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सलग 3 अर्धशतकं झळकावणाऱ्यांच्या यादीतही राहुलने आपलं स्थान पक्क केलंय.
अनोखी कामगिरी करणारा पहिला आशियाई संघ :
- सलामीवीर लोकेश राहुलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात विजयाची नोंद केली आहे.
- न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 133 धावांचं आव्हान भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. 7 गडी राखत भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह भारतीय संघाने अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
- तर ऑकलंडच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग तिसरा टी-20 विजय ठरला. अशी कामगिरी करणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला आहे.
दिनविशेष :
- 1967 : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.
- 1938 :जगाती ल सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (53.900 किमी) जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला करण्यात आला.
- 2009 : भारताचे 8 वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1910)
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा