23 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (23 जुलै 2018)
जीएसटीच्या 28 टक्के कर श्रेणीत आता केवळ 35 वस्तूंचा समावेश :
- वस्तू व सेवा कराच्या सर्वाधिक म्हणजे 28 टक्के दराच्या प्रवर्गात आता केवळ 35 वस्तू राहिल्या आहेत, यात सध्या191 वस्तू होत्या.
- तसेच त्यात अनेक वस्तूंवरील कर कपात केल्याने केवळ वातानुकूलन यंत्रे, डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डर, डिशवॉशर मशीन, वाहने यांसारख्या 35 वस्तूच त्यात राहिल्या आहेत.
- 1 जुलै 2017 रोजी वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी करप्रणाली सुरू झाली, तेव्हा 28 टक्के कराच्या गटात 226 वस्तू होत्या.
धावपटू मोहम्मद अनासला सुवर्णपदक :
- भारताचा धावपटू मोहम्मद अनास याहीयाने झेक रिपब्लीक येथील 400 मी. शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
- 45.24 सेकंदात ही शर्यत पूर्ण करत मोहम्मदने नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला आहे.
- काही महिन्यांपूर्वी गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मोहम्मदने 45.31 अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.
- याव्यतिरीक्त एम. आर. पुवम्मानं देखील महिलांच्या 400 मीटरची शर्यत 53.01 सेकंदात पार करत भारतासाठी सन्मान मिळवला.
- तसेच धावपटू राजीव अरोकिया यानेही 200 मीटरचे अंतर 20.77 सेकंदात पार केले.
भारताच्या लक्ष्य सेनची अंतिम फेरीत बाजी :
- भारताचा तरुण बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे.
- जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेत लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कुनलावत वितीदसरनचा 21-19, 21-18 अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला.
- तब्बल 6 वर्षांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणार लक्ष्य सेन हा पहिला भारतीय बॅडमिंटपटू ठरला आहे.
- या विजयासह लक्ष्य सेनला गौतम ठक्कर आणि पी. व्ही. सिंधू या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे.
- तर ठक्कर आणि सिंधू यांच्यानंतर मानाची आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकणारा लक्ष्य तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
- गौतम ठक्कर यांनी 1965 साली तर पी. व्ही. सिंधूने 2012 साली ही स्पर्धा जिंकली होती.
दिनविशेष :
- 23 जुलै 1840 मध्ये कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.
- हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास 23 जुलै 1986 मध्ये सुरुवात झाली.
- 23 जुलै 1998 मध्ये केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
- 23 जुलै 1856 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला.
- थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा 23 जुलै 1906 मध्ये जन्म झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा