23 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (23 मे 2022)
श्रीलंकेत आणीबाणी मागे :
- श्रीलंकेत दोन आठवडय़ांपासून लागू केलेली आणीबाणी शुक्रवारी मध्यरात्री हटवण्यात आली.
- देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारल्याने हा निर्णय घेण्यात आला.
- देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे जीवनावश्यक वस्तू्ंच्या तीव्र टंचाईमुळे प्रचंड जनक्षोभ उसळल्याने
- सरकारविरोधी निदर्शने होत असल्याने आणीबाणी देशभर लागू करण्यात आली होती.
- तर अध्यक्ष गोतबया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. वा
भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांचा तृणमूलमध्ये प्रवेश :
- भाजपचे खासदार अर्जुन सिंह हे तृणमूल काँग्रेसमध्ये परतले असून हे भाजपसाठी नुकसानकारक असल्याचे भाजप नेत्यांनी मान्य केले आहे.
- पश्चिम बंगालमधील ताग उद्योगाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत सिंह यांनी केंद्राला लक्ष्य केले होते.
- केंद्राच्या ताग उद्योगाबाबतच्या धोरणांवर टीका करतानाच अर्जुन सिंह यांनी आपण भाजपमध्ये मुक्तपणे काम करू शकत नसल्याची तक्रारही केली होती.
- त्यांनी रविवारी कोलकात्यात तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कॅमॅक पथावरील कार्यालयात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
- तसेच यात बराकपूर आणि उत्तर 24 परगणा भागातील नेत्यांचा समावेश होता.
‘फिफा’,‘एएफसी’ शिष्टमंडळाचा जूनमध्ये भारतात आढावा दौरा :
- सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीकडून सध्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा दैनंदिन कारभार पाहिला जात आहे.
- ‘फिफा’ आणि आशियाई फुटबॉल महासंघाचे (एएफसी) संयुक्त शिष्टमंडळ संघटनात्मक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भारतात येणार आहे.
- ‘फिफा’ आणि ‘एएफसी’ शिष्टमंडळाचा भारत दौरा जूनमध्ये असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फुटबॉल संघटनेची सद्य:स्थिती समजून घेणे, हा मुख्य उद्देश आहे.
सुपरबेट बुद्धिबळ स्पर्धात आनंदला विजेतेपद :
- माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने एक फेरी बाकी असतानाच शनिवारी सुपरबेट पोलंड बुद्धिबळ स्पर्धेतील जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
- आनंदने सहा सामने जिंकले, तर दोन बरोबरीत सोडवत जलद प्रकारात वर्चस्व गाजवले.
- सहाव्या फेरीअंती पाच विजय आणि एक बरोबरी स्वीकारणाऱ्या भारताच्या आनंदने सातव्या फेरीत रोमानियाच्या डेव्हिड गॅव्हरिलेस्क्यूला 25 चालींत नामोहरम केले.
- जलद बुद्धिबळ स्पर्धा नऊ फेऱ्यांची असून, त्यानंतर होणाऱ्या अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेत प्रत्येक स्पर्धक एकमेकांशी दोनदा सामना करतील.
दिनविशेष :
- 23 मे 1737 मध्ये पोर्तुगीजांकडून जिकाल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
- सिरील डेमियनला अकॉड्रीयनया या वाघाचे पेटंट 23 मे 1829 मध्ये मिळाले.
- पछिंम जर्मनी हे राष्ट्र 23 मे 1949 मध्ये अस्तित्वात आले.
- आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक 23 मे 1956 रोजी मंजूर झाले.
- बचेन्द्री पाल यांनी 23 मे 1984 रोजी दुपारी 1.09 वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
- जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती सन 1995 मध्ये 23 मे रोजी प्रकाशीत केली गेली.