23 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
23 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (23 सप्टेंबर 2022)
सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक :
- नाटय़क्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक पद्यश्री सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले.
- गौरवपदक, 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- या पुरस्काराचे वितरण 5 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे.
- अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा गुरुवारी सांगलीत केली.
- आद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाटय़क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हे गौरवपदक देण्यात येते.
- अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर ही संस्था गेल्या 80 वर्षांपासून नाटय़क्षेत्रात कार्यरत आहे.
- त्यांना पद्यश्री पुरस्कारासह राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कारासह नाटय़क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
कास पठारावर ‘ई-बस’, ‘बायोटॉयलेट’ सुविधा सुरू :
- जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यटन प्रदूषणमुक्त अन् पर्यावरणपूरक व्हावे म्हणून ‘ई-बस’ व ‘बायोटॉयलेट’ सुविधांचे बुधवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून दूरचित्रप्रणालीद्वारे लोकार्पण झाले.
- कास पठार नैसर्गिक रीत्या अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर आहे.
- राज्य शासनाच्या नवीन महाबळेश्वरच्या योजनेतून कास पठारच्या विकासाला प्राधान्य राहणार आहे.
- वॉक वे तसेच दर्शन गच्ची (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा करणे, सुरक्षा वाढविणे तसेच घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही होईल असे लोढा यांनी सांगितले.
भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका भारताचा ऐतिहासिक मालिका विजय :
- कर्णधार हरमनप्रीत कौरचे आक्रमक शतक आणि नंतर रेणुका सिंगच्या गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 88 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
- 23 वर्षांनंतर भारताचा इंग्लंडविरुद्ध हा पहिला मालिका विजय ठरला.
- पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने हरमनप्रीतच्या आक्रमक शतकामुळे 5 बाद 333 अशी मोठी धावसंख्या उभारली.
- यानंतर भारताने इंग्लंडला 44.5 षटकांत 245 धावसंख्येवर रोखले.
- भारताने 1999 मध्ये इंग्लंडविरुद्ध 2-1 अशी मालिका जिंकली होती.
दिनविशेष :
- 23 सप्टेंबर 1803 मध्ये दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.
- अर्बेन ली व्हेरिअर यांनी 23 सप्टेंबर 1846 मध्ये नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
- महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना 23 सप्टेंबर 1884 मध्ये स्थापन केली.
- कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना 23 सप्टेंबर 1908 मध्ये झाली.
- 23 सप्टेंबर 1932 मध्ये हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
- सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा 23 सप्टेंबर 1983 मध्ये संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.