24 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
24 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 सप्टेंबर 2022)
दिलीप तिर्की ‘हॉकी इंडिया’च्या अध्यक्षपदी :
- भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्कीची ‘हॉकी इंडिया’ संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
- ‘हॉकी इंडिया’च्या अध्यक्षपदासाठी प्रतिस्पर्धी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर शुक्रवारी तिर्कीची निवड निश्चित झाली.
- संपूर्ण कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली असून, याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) मान्यता दिली आहे.
- ‘हॉकी इंडिया’चे अध्यक्षपद भूषविणारा तिर्की हा पहिला हॉकीपटू ठरणार आहे.
- अध्यक्षपदासाठी माघार घेतल्यानंतर भोलानाथ सिंग यांची ‘हॉकी इंडिया’च्या सरचिटणीसपदी वर्णी लागली.
Must Read (नक्की वाचा):
रोहित शर्माची अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी :
- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नागपूरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये आठ षटकांमध्ये 91 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात एका विश्वविक्रमाला गवसणी घातली.
- हेजलवूडच्या पहिल्याच षटकात दोन खणखणीत षटकार खेचक रोहित शर्माने सर्वाधिक षटकार लगावण्याचा अनोखा विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला.
- रोहित आता टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावाणारा खेळाडू ठरला आहे.
- हिटमॅन नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय कर्णधारने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या तीन षटकांमध्ये चार षटकार लगावले.
- यामुळे त्याने मारलेल्या षटकारांची संख्या 176 इतकी झाली. ही मालिका सुरु होण्यापूर्वी रोहितच्या नावावर 171 षटकार आणि 323 चौकार होते.
- पहिल्या टी-20 सामन्यात रोहितने एक षटकार मारुन न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टीलच्या 172 षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
- दुसऱ्या सामन्यात पहिल्या दोन षटकांमध्ये तीन षटकार लगावत रोहितने सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ची नवी कार्यकारिणी जाहीर :
- देशभरातील वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांच्या प्रकाशकांची शिखर संस्था असलेल्या ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
- तेलुगू माध्यमसमूह ‘साक्षी’चे के राजा प्रसाद रेड्डी यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
- मोहित जैन (इकोनॉमिक टाईम्स) यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.
- संस्थेच्या 83वी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 2022-23 या वर्षांसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली.
- ‘आज समाज’चे राकेश शर्मा यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
- ‘अमर उजाला’चे तन्मय महेश्वरी हे मानद खजिनदार तर मेरी पॉल या संस्थेच्या महासचिव असतील.
दिनविशेष:
- भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1861 मध्ये झाला.
- महात्मा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
- सन 1932 मध्ये पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.
- 24 सप्टेंबर 1948 रोजी होंडा मोटार कंपनीची स्थापना झाली.
- सन 1960 मध्ये अणुशक्तीवर चालणाऱ्या यू.एस.एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
- माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली 2007 या वर्षी भारताने टी-20 विश्वकप जिंकला.