27 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
27 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 सप्टेंबर 2022)
चंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव :
- महान क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग यांचे नाव चंडीगड विमानतळाला देण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली.
- आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.
- 28 सप्टेंबर रोजी शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी होणार आहे. त्या दिवशी ‘अमृत महोत्सव’चा महत्त्वाचा दिवस येत आहे.
- या जयंतीदिनापूर्वी या महान क्रांतिकारकाला अभिवादन म्हणून,चंडीगड विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
गुलाम नबी आझाद यांच्याकडून ‘डेमोक्रॅटिक आझाद पार्टी’ची घोषणा :
- काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या नवीन पक्षाची घोषणा सोमवारी केली.
- ‘डेमोक्रॅटिक आझाद पार्टी’ असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असेल.
- हा पक्ष लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक असेल.
- महात्मा गांधीजींच्या आदर्शाचे अनुकरण करणारी या पक्षाची विचारधारा असेल.
विराट कोहली अव्वलस्थानी :
- भारतीय संघाचा आधारस्तंभ आणि प्रमुख फलंदाज विराट कोहलीने कालच्या सामन्यातील खेळीने ऑस्ट्रेलियन एका दिग्गज फलंदाजाला मागे टाकले आहे.
- विराट आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका देशाविरुद्ध सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे.
- त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला आहे.
- भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
- भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने ही कामगिरी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध टी20 सामने खेळताना केली आहे.
- त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 सामने खेळताना एकूण 8 वेळा 50 किंवा त्यापेक्षा मोठी खेळी केली आहे. हा एक विश्वविक्रम ठरला आहे.
बीसीसीआयला लवकरच मिळणार नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष :
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयने निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.
- निवडणुकीसोबतच वार्षिक सर्वसाधारण सभेचेही आयोजन करण्यात येणार आहे.
- बीसीसीआय 18 ऑक्टोबरला निवडणूक घेणार आहे. हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सर्व पदांसाठी असेल.
- सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. तर जय शहा हे सचिवपदावर आहेत. या दोघांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे.
टीम इंडियाने मोडला ‘हा’ विक्रम :
- पहिला सामना पराभवच पत्करावा लागल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींची निराशा झाली होती मात्र त्यापाठोपाठ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही सामन्यात विजय प्राप्त करून भारताने मालिका जिंकली आहे.
- रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची चमकदार कामगिरी त्यांना या वर्षातील सर्वात महत्त्वाचा विजय मिळवून गेली.
- एकीकडे ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच आता रोहित ब्रिगेडने पाकिस्तानलाही मोठा दणका दिला आहे.
- टी 20 खेळप्रकारात टीम इंडिया आता जगात भारी संघ ठरला आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध या विजयासह भारताने एका वर्षात T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विश्वविक्रम मोडला आहे.
- रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या T20I मधील विजय हा भारताचा 2022 मधील T20I मधील 21 वा विजय होता.
- आतापर्यंत हा विजय पाकिस्तानच्या नावे होता. पाकिस्तानने 2021 सालात तब्बल 20 टी-20 सामने जिंकले होते.
- आता 21 वा विजय मिळवत भारत यंदाच्या सर्वाधिक टी 20 सामने जिंकणार संघ बनला आहे.
दिनविशेष:
- 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन आहे.
- सन 1825 मध्ये द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
- 27 सप्टेंबर 1925 रोजी डॉ. केशव हेडगेवार व्दारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना करण्यात आली.
- भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म 27 सप्टेंबर 1953 मध्ये झाला.