28 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
28 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 सप्टेंबर 2022)
आशा पारेख यांना फाळके पुरस्कार :
- ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2020 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
- ‘भारतीय चित्रपट क्षेत्रात मानाचा सर्वोच्च पुरस्कार’ अशी ओळख असलेल्या या पुरस्काराची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी केली.
- शुक्रवारी होणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळय़ात 79 वर्षीय आशा पारेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
- आशा भोसले, हेमा मालिनी, पुनम धिल्लों, उदित नारायण, टी. एस. नागभरण या पाच मान्यवरांच्या समितीने पारेख यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
- वयाच्या दहाव्या वर्षांपासून आशा पारेख यांनी आपल्या कारकीर्दीस प्रारंभ केला.
- सुमारे पन्नास वर्षे अभिनय क्षेत्रातील त्यांची कारकीर्द गाजली. 95 पेक्षा जास्त चित्रपटांत त्यांनी काम केले.
- यापैकी ‘दिल देके देखो’, ‘कटी पतंग’, ‘तिसरी मंजिल’, ‘बहारों के सपने’, ‘प्यार का मौसम’, ‘कारवाँ’ अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.
- 1992 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
- 2019 चा फाळके पुरस्कार रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला होता.
Must Read (नक्की वाचा):
आयपीएलमधील महत्त्वाच्या समित्यांवर राहुल द्रविडची नियुक्ती :
- राहुल द्रविडवरचा विश्वास बीसीसीआयने पुन्हा व्यक्त करत त्याच्यावर आयपीएलमधील प्रमुख समित्यांची जबाबदारी सोपवली आहे.
- आता त्यांचा आयपीएलच्या दोन समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. वि
- आयपीएलच्या तीन समित्यांपैकी दोन समित्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- सौरव गांगुली आणि जय शाह यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता येथे झालेल्या बीसीसीआयच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत द्रविड यांचा लीगच्या आचारसंहिता समिती आणि तांत्रिक समितीत समावेश करण्यात आला.
इटलीत नव-फॅसिस्ट विचाराचे सरकार :
- इटलीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नव-फॅसिस्ट विचारधारेच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाने सर्वाधिक मते मिळवली आहेत.
- त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर देशातील पहिले अतिउजव्या विचारसणीचे सरकार स्थापन होणार असून ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनतील, असे सोमवारी स्पष्ट झाले.
- इटली हा युरोपीय महासंघाचा संस्थापक सदस्य देश आहे.
- शिवाय, युरोपातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था अशीही त्याची ओळख आहे.
विराट कोहलीने एकाच सामन्यात मोडले तीन विक्रम:
- भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा आपल्या मूळ शैलीत दिसला.
- मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात त्याने वेगवान धावा केल्या आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.
- विराटने आपल्या टी20 कारकिर्दीतील 33वे अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
- या सामन्यांमध्ये कोहलीने 48 चेंडूत 63 धावा केल्या आणि सूर्यकुमार यादवबरोबर तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली.
- या दरम्यान त्याने आपल्या मॅच-विनिंग इनिंगमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
- विराटच्या आता 471 सामन्यांच्या 525 डावांमध्ये ५३.६२ च्या सरासरीने 24,078 धावा आहेत.
- यादरम्यान त्याने 71 शतके आणि 125 अर्धशतके झळकावली. याशिवाय विराटने आणखी एक कामगिरी केली.
- त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 16 हजार धावा पूर्ण केल्या आणि सचिननंतर असे करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला.
- विराटने टी20 आंतरराष्ट्रीयमध्येही एक विक्रम केला आहे. त्याने टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 3600 धावा पूर्ण केल्या आणि यानंतर हा आकडा गाठणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
दिनविशेष:
- 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन, आंतरराष्ट्रीय जाणून घेण्याचा हक्क दिन तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन म्हणून पाळला जातो.
- क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 मध्ये झाला होता.
- जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला.
- 28 सप्टेंबर 1967 हा दिवस सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचा स्मृतीदिन आहे.
- ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म 28 सप्टेंबर 1982 मध्ये झाला.