29 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
29 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 सप्टेंबर 2022)
लेफ्ट. जन. अनिल चौहान संरक्षण दलप्रमुख :
- निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- लेफ्ट. जन. चौहान हे देशाचे दुसरे सीडीएस असतील. यासोबतच केंद्राच्या संरक्षणविषय विभागाचे ते सचिवही असतील.
- जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नऊ महिने सीडीएस हे पद रिक्त होते.
- बुधवारी केंद्र सरकारने लष्करात तब्बल 40 वर्षांचा अनुभव असलेल्या लेफ्ट. जन. चौहान यांची नियुक्ती जाहीर केली.
- काश्मीर खोरे आणि इशान्येकडील राज्यांमधील फुटिरतावाद्यांविरोधात अनेक मोहिमांचे चौहान यांनी नेतृत्व केले आहे.
- लष्कराच्या पूर्व आघाडीचे मुख्याधिकारी म्हणून ते मे 2021मध्ये निवृत्त झाले.
Must Read (नक्की वाचा):
आर वेंकटरामनी भारताचे नवे अॅटर्नी जनरल :
- ज्येष्ठ वकील आर वेंकटरामनी यांची तीन वर्षांसाठी भारताचे नवे अॅटर्नी जनरल (महान्यायवादी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- विद्यमान अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.
- 1 ऑक्टोबर 2022 पासून ते आपला पदभार स्वीकारतील, असे या ट्वीटमध्ये रिजिजू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
- विद्यमान अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल हे 91 वर्षांचे असून त्यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ :
- दसरा-दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने बुधवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला.
- 1 जुलै 2022 पासून, पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही भत्तावाढ लागू होईल.
- 41.85 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69.76 लाख निवृत्ती वेतनधारकांना त्याचा लाभ होईल.
‘पीएफआय’वर बंदी :
- ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने बुधवारी पाच वर्षांची बंदी घातली.
- आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.
- केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा ‘पीएफआय’वरील बंदीबाबत निवेदन प्रसृत केले.
- त्यात ‘पीएफआय’सह तिच्याशी संबंधित 8 संघटनांवरही बंदी घालण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
रेशन कार्ड धारकांना ‘या’ महिन्यापर्यंत मिळणार मोफत धान्य :
- पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत तीन महिने वाढवण्यात आली आहे.
- त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य मिळणार आहे.
- त्यामुळे 80 करोड नागरिकांना याचा लाभ घेता येईल.
- ग्रामीण भागाला 75 टक्के तर शहरी भागाला 50 टक्के मोफत धान्य दिलं जाणार आहे.
अयोध्येतील चौकाला लता मंगेशकर यांचं नाव:
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 92व्या जयंतीनिमित्त आज अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं आहे.
- त्याशिवाय या चौकात एक 40 फूट आणि 14 टन वजनाच्या वीणेची मूर्ती ठेवण्यात आली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मूर्तीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं.
- यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.
चित्त्यांच्या सरंक्षणासाठी ‘स्निफर डॉग’ करणार तैनात :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नामीबीया देशातून 8 चित्ते भारतात आणण्यात आली आहे.
- या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलं आहे.
- या चित्त्याचं संरक्षण करण्यासाठी आता श्वान पथक तैनात करण्यात येणार आहे.
- यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) च्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात ‘जर्मन शेफर्डस’ जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे.
- हे केंद्र हरियाणातील पंचकुला येथे आहे.
- या कुत्र्यांना वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर इंडिया आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.
भारताची दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून मात :
- पुनरागमनवीर अर्शदीप सिंग, दीपक चहर आणि हर्षल पटेल या वेगवान त्रिकुटाच्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने पहिल्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी व 20 चेंडू राखून मात केली.
- अखेर त्यांनी चाचपडत 20 षटकांत 8 बाद 106 धावांपर्यंत मजल मारली.
- भारताने हे लक्ष्य 16.4 षटकांत गाठत विजयी सलामी दिली.
दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांची आयसीसी क्रमवारीत झेप :
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 143 धावांची खेळी करणारी महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत चार गुणांची झेप घेत पाचवे स्थान मिळवले आहे.
- हरमनप्रीतच्या भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत 3-0 असा व्हाईटवॉश देणाचा पराक्रम प्रथमच केला.
- या खेळीसह हरमनप्रीतने अनेक विक्रम मोडले आणि आता आयसीसी नेही तिच्या या खेळीची दखल घेत आज जाहीर केलेल्या महिलांच्या एकदिवसीय खेळाडू क्रमवारीत हरमनप्रीतचे प्रगती झाली आहे.
- सलामीवीर स्मृती मंधाना व दीप्ती शर्मा यांनीही ताज्या क्रमावारीत आगेकूच केली आहे.
- मंधानाने इंग्लंड दौऱ्यावर दोन सामन्यात अनुक्रमे 40 व 50 धावा केल्या त्याच्या जोरावर ती एक स्थानाच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
- टी20 च्या मध्ये फलंदाजांमध्ये मंधाना दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दिनविशेष :
- 29 सप्टेंबर हा दिवस ‘जागातिक हृदय दिन‘ आहे.
- सन 1917 मध्ये मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.
- ‘बिर्ला तारांगण‘ हे आशियातील पहिले तारांगण सन 1963 मध्ये कोलकाता येथे सुरू झाले.
- सन 2012 मध्ये ‘अल्तमस कबीर‘ हे भारताचे 39वे सरन्यायाधीश झाले.