30 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
30 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 सप्टेंबर 2022)
आज देशाला मिळणार तिसरी ‘वंदे भारत ट्रेन’:
- भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आता गुजरातच्या गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.
- पंतप्रधान मोदी आज या नवीन सुधारित ट्रेनला हिरावा झेंडा दाखवणार आहेत.
- काही दिवसांपूर्वीच या मार्गावर या ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.
- यामुळे आता देशाला तिसरी वंदे भारत ट्रेन आज प्राप्त होणार आहे.
- वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एकूण 1 हजार 128 प्रवासी बसण्याची क्षमता आहे.
- पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली.
- त्याचवेळी दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा मार्गावर चालवण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
संस्कृतच्या प्रमाणित भाषांतरासाठी एक लाख वाक्यसमूह :
- गूगलच्या विविध भाषा अनुवादित करण्याच्या सुविधेमध्ये (गूगल ट्रान्सलेट)आता संस्कृतचे प्रमाणित भाषांतर होऊ शकेल.
- ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदे’च्या (आयसीसीआर) पुढाकाराने प्रायोगिक तत्त्वावर संस्कृत भाषांतराचा प्रयोग सुरू असून आतापर्यंत ‘गूगल ट्रान्सलेट’साठी संस्कृतची एक लाख वाक्यसमूह तयार केली आहेत.
- त्यामध्ये दैनंदिन वापरातील शब्द व वाक्यांचा वापर करण्यात आला आहे.
- त्यामुळे संस्कृतचा अन्य भाषांमध्ये व अन्य भाषांचा संस्कृतमध्ये उत्तम अनुवाद केला जाऊ शकतो.
- संस्कृत भाषांतरासाठी ‘गूगल ट्रान्सलेट’ सुविधेचा सर्वाधिक वापर केला असला तरी, प्रमाणित व रोजच्या वापरातील शब्दांचा वापर अधिक महत्त्वाचा आहे.
- संस्कृत भाषा जागतिक स्तरावर नेण्यासाठी अनुवादाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गाडीमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य :
- केंद्र सरकारने प्रवासी कारसाठी सहा-एअरबॅग अनिवार्य नियमाची अंमलबजावणी पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलले आहे.
- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज याबाबत घोषणा केली.
- जागतिक पुरवठा साखळीतील समस्यांमुळे सहा एरअर बॅग निर्देश पुढे ढकलण्यात आला असल्याचे सांगण्यात आले असून, त्यामुळे हा नियम आता 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे.
- यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने आठ आसनी वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज बसवणे बंधनकारक केले होते.
- हा आदेश 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार होता.
एचएस प्रणोय जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुन्हा पहिल्या 15 मध्ये :
- भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने आज दोन स्थानांची सुधारणा करत ताज्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 15 वे स्थान मिळविले आहे.
- जागतिक अजिंक्यपद आणि जपान ओपन सुपर 750 या स्पर्धांत प्रणोयने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती, त्याचा फायदा झाला आहे.
- भारताचा नवा आशास्थान असलेला लक्ष्य सेन भारतीयांमधील सर्वात चांगले स्थान असलेला खेळाडू ठरला आहे.
- पुरुषांच्या क्रमवारीत तो नवव्या; तर किदांबी श्रीकांत 11 व्या स्थानावर आहे.
कर्णधार रोहित शर्माने रचला नवा विक्रम :
- भेदक गोलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारतानं पहिल्या टी20सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव केला.
- या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 नं आघाडी घेतलीय.
- टी20 मालिकेतील या विजयामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने माजी कर्णधार एमएस धोनी याचा मोठा विक्रम मोडला आहे.
- तो भारताचा टी20 प्रकारातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरत आहे.
- एकाच वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकणारा भारतीय कर्णधार हा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे.
- हा विक्रम करताना त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला मागे टाकले आहे.
दिनविशेष :
- 30 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन
- ब्रिटनची पहिली ट्राम सेवा 30 सप्टेंबर 1860 मध्ये सुरु झाली.
- थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर 30 सप्टेंबर 1882 मध्ये सुरु झाले.
- 30 सप्टेंबर 1895 मध्ये फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.
- हुव्हर धरणाचे बांधकाम 30 सप्टेंबर 1935 मध्ये पूर्ण झाले.
- पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात 30 सप्टेंबर 1947 मध्ये प्रवेश.
- 30 सप्टेंबर 1966 मध्ये बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.