23 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

सतीश आळेकर

23 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 सप्टेंबर 2022)

सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक :

  • नाटय़क्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक पद्यश्री सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले.
  • गौरवपदक, 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • या पुरस्काराचे वितरण 5 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे.
  • अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा गुरुवारी सांगलीत केली.
  • आद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाटय़क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हे गौरवपदक देण्यात येते.
  • अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर ही संस्था गेल्या 80 वर्षांपासून नाटय़क्षेत्रात कार्यरत आहे.
  • त्यांना पद्यश्री पुरस्कारासह राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कारासह नाटय़क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.

कास पठारावर ‘ई-बस’, ‘बायोटॉयलेट’ सुविधा सुरू :

  • जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यटन प्रदूषणमुक्त अन् पर्यावरणपूरक व्हावे म्हणून ‘ई-बस’ व ‘बायोटॉयलेट’ सुविधांचे बुधवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून दूरचित्रप्रणालीद्वारे लोकार्पण झाले.
  • कास पठार नैसर्गिक रीत्या अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर आहे.
  • राज्य शासनाच्या नवीन महाबळेश्वरच्या योजनेतून कास पठारच्या विकासाला प्राधान्य राहणार आहे.
  • वॉक वे तसेच दर्शन गच्ची (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा करणे, सुरक्षा वाढविणे तसेच घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही होईल असे लोढा यांनी सांगितले.

भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका भारताचा ऐतिहासिक मालिका विजय :

  • कर्णधार हरमनप्रीत कौरचे आक्रमक शतक आणि नंतर रेणुका सिंगच्या गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 88 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
  • 23 वर्षांनंतर भारताचा इंग्लंडविरुद्ध हा पहिला मालिका विजय ठरला.
  • पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने हरमनप्रीतच्या आक्रमक शतकामुळे 5 बाद 333 अशी मोठी धावसंख्या उभारली.
  • यानंतर भारताने इंग्लंडला 44.5 षटकांत 245 धावसंख्येवर रोखले.
  • भारताने 1999 मध्ये इंग्लंडविरुद्ध 2-1 अशी मालिका जिंकली होती.

दिनविशेष :

  • 23 सप्टेंबर 1803 मध्ये दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.
  • अर्बेन ली व्हेरिअर यांनी 23 सप्टेंबर 1846 मध्ये नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
  • महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना 23 सप्टेंबर 1884 मध्ये स्थापन केली.
  • कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना 23 सप्टेंबर 1908 मध्ये झाली.
  • 23 सप्टेंबर 1932 मध्ये हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
  • सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा 23 सप्टेंबर 1983 मध्ये संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago