24 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2021)
पायाभूत सुविधांचे परिचालन, व्यवस्थापन खासगी क्षेत्रांकडे :
केंद्र सरकारच्या मालकीच्या पायाभूत मालमत्तांच्या सुविधांचे परिचालन आणि व्यवस्थापन खासगी क्षेत्राच्या हाती देऊन त्यायोगे पुढील पाच वर्षांत सहा लाख कोटी रुपये उभारण्याचा महत्त्वाकांक्षी ‘नॅशनल मॉनेटायझेशन पाइपलाइन’(एनएमपी) कार्यक्रम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी जाहीर केला.
केंद्र सरकारच्या आठ मंत्रालयांच्या अखत्यारीतील रस्ते, रेल्वे, वीज आदी क्षेत्रांतील चलनीकरण होऊ घातलेले प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत.
तर चालू स्थितीत असलेल्या या पायाभूत प्रकल्पांद्वारे ‘जास्तीतजास्त मूल्यप्राप्ती’असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
तसेच सरसकट जमिनीची विक्री यातून केली जाणार नाही, अशी पुस्तीही अर्थमंत्र्यांनी खुलासेवार निवेदन करताना जोडली.
तर या सर्व मालमत्तांची मालकी सरकारकडे राहणार असून, त्या ठरावीक कालावधीसाठी खासगी क्षेत्रामार्फत चालविल्या जातील आणि पुन्हा सरकारकडे येतील, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही भारतीय लष्करातील किमान 28 महिला अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीपर्यंत लष्करी सेवेत कायम राहण्याची संधी म्हणजेच ‘परमनंट कमिशन’ नाकारण्यात आले आहे. तर त्याविरोधात काही महिला अधिकारी लष्करी दलांच्या लवादाकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत.
तसेच किमान 28 महिला अधिकाऱ्यांना परमनंट कमिशन नाकारण्यात आले असून त्यातील किमान सात महिला तरी या आदेशाला आव्हान देणार आहेत.
महिलांना ‘परमनंट कमिशन’ मिळावे यासाठी त्यांनी अनेकदा कायदेशीर लढा दिला असून सर्वोच्च न्यायालयाने दोन वेळा यात हस्तक्षेप केला होता.
प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीत देशातील पहिल्या ‘स्मॉग टावर’ची उभारणी :
दिल्लीला प्रदूषणाने आपल्या विळख्यात घेतलं आहे. यासाठी भारतातील पहिल्या स्मॉग टॉवरची उभारणी दिल्लीत करण्यात आली आहे.
स्मॉग टॉवरच्या माध्यमातून दिल्लीतील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते स्मॉग टॉवरचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
दिल्लीतील कनॉट प्लेस भागातील बाबा खडक सिंह मार्गावर यांची उभारणी करण्यात आली आहे. या टॉवरमुळे दिल्लीत प्रदूषण कमी करण्यास तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.
तर हा टॉवर प्रदूषित हवा आत घेणार आणि स्वच्छ हवा बाहेर सोडणार आहे.
तसेच टॉवरच्या माध्यमातून जवळपास 1 चौरस किलोमीटर क्षेत्रातील प्रदूषित हवा खेचण्याची क्षमता आहे. तर स्वच्छ हवा 10 मीटर उंचीवर सोडणार आहे.
भारतीय लष्करात पाच महिला अधिकाऱ्यांची कर्नल पदावर पदोन्नती :
भारतीय लष्करात 26 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांच्या कर्नल पदावर पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर एका निवड मंडळाने हा निर्णय दिला आहे.
कॉर्प्स ऑफ सिग्नल, इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) आणि कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्समध्ये सेवा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर मान्यता देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तसेच पूर्वी, कर्नल पदावर पदोन्नती केवळ आर्मी मेडिकल कॉर्प्स (एएमसी), जज अॅडव्होकेट जनरल (जेएजी) आणि आर्मी एज्युकेशन कोर (एईसी) मधील महिला अधिकाऱ्यांना लागू होती.
भारतीय लष्कराच्या विविध शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीचे मार्ग वाढवून लष्करात त्यांच्यासाठी करिअरच्या संधी वाढण्यासाठी हा महत्वाचा निर्णय आहे.
कर्नल पदासाठी निवडलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांमध्ये सिग्नल कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल सोनी आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल आणि कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समधून लेफ्टनंट कर्नल रीनु खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर यांचा समावेश आहे.
दिनविशेष :
24 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन‘ आहे.
सन 1690 मध्ये 24 ऑगस्ट रोजी कोलकाता शहराची स्थापना झाली.
सन 1875 मध्ये कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.
स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म 24 ऑगस्ट 1888 मध्ये झाला.
विक्रमवीर भारतीय जलतरणपटू ‘मिहिर सेन‘ यांनी सन 1966 मध्ये जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
सन 1995 मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज 95 ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.