26 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी:
सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी

26 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 ऑक्टोबर 2020)

‘व्होकल फॉर लोकल’चा संकल्प लक्षात ठेवा – पंतप्रधान मोदी:

  • विजयादशमी म्हणजेच दसऱ्या निमित्त देशवासीयींना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आजच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला.
  • विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचे त्यांनी सुरूवातीस सांगितले.
  • तसेच, सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा, असं त्यांनी देशवासीयांना आवाहन केलं आहे.
  • मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल, तेव्हा व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना, आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे.”
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2020)

कृषी क्षेत्र बळकट करण्यासाठी केंद्राचा पुढाकार -पंतप्रधान मोदी:

  • शेतकऱ्यांना कुठलाही त्रास सोसावा लागू नये म्हणून कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आमचे सरकार पुढाकार घेत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
  • केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचे अनेक गट व राजकीय पक्ष विरोध करत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी आणि त्यांचा उत्पादन खर्च तसेच त्रास कमी करण्यासाठी बदलत्या काळासोबत आम्हाला आमचे प्रयत्नही वाढवावे लागतील’, असे मोदी म्हणाले.
  • ‘शेतकऱ्यांना शेतमाल देशात कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य देणे असो, किंवा कृषी उत्पादकांच्या हजारो संघटना उभारणे असो; सिंचन प्रकल्प पूर्ण करणे असो, अथवा पीक विमा योजनेतील सुधारणा असो, या सर्वाचा उद्देश कृषी क्षेत्राला बळकटी देणे हा आहे.
  • जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यात त्रास होऊ नये. त्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सतत राबवले जात आहेत.

गरज पडल्यास आम्ही सीमापार जाऊन युद्ध करु – अजित डोवाल यांचा इशारा:

  • भारताला डिवचणाऱ्या देशांना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी कडक इशारा दिला.
  • देशाच्या स्वाभिमानासाठी गरज पडल्यास आम्ही सीमापार जाऊन युद्ध करु शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
  • ऋषीकेश येथे गंगेच्या काठी असलेल्या परमार्थ निकेतन आश्रमाला भेट दिल्यानंतर डोवाल यांच्या हस्ते गंगा पूजन झालं, यावेळी ते बोलत होते.
  • डोवाल म्हणाले, “इतिहास साक्षी आहे की भारताने कधीही कोणावर हल्ला केला नाही.
  • मात्र, देशाच्या स्वाभिमानासाठी गरज पडल्यास सीमाचं नव्हे तर सीमापार जाऊनही आम्ही युद्ध करु शकतो.
  • नवा भारत वेगळ्या विचारांचा आहे. स्वार्थासाठी आम्ही कोणाला डिवचणार नाही मात्र, स्वाभिमानाच्या रक्षणासाठी कोणाला सोडणारही नाही.”
  • “आपण जगातील मोठ-मोठ्या संस्कृतींचे पतन झालेले पाहिले आहे.
  • तसेच नव्या संस्कृतींना विकसित होतानाही पाहिले आहे. मात्र, भारतीय संस्कृती संपूर्ण जगात वेगळी आहे.
  • शेकडो वर्षांपासून परदेशी आक्रमणं आणि गुलामी सोसल्यानंतरही कोणतीही बाहेरची संस्कृती या देशावर प्रभाव टाकू शकली नाही,” अशा शब्दांत त्यांनी भारतीय संस्कृतीचा गौरव केला.

सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी:

  • देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेली दहा वष्रे सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
  • महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीनंतर निवड समिती विजयवीराची भूमिका पार पाडू शकणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाचा शोध घेत आहे.
  • मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्यकुमारने ‘आयपीएल’मध्ये 10 सामन्यांत एकूण 243 धावा केल्या आहेत.
    त्यामुळेच त्याच्या नावाला पंसती मिळण्याची शक्यता आहे.
  • 2012 मध्ये सूर्यकुमारचे नाव सर्वप्रथम निवड समितीच्या चर्चेत आले होते. पण ती संधी हुकल्यानंतर भारत ‘अ’ संघात त्याने अनेकदा प्रतिनिधित्व केले. वर्षांच्या पूर्वार्धात भारत ‘अ’ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यातही खेळला होता.
  • मार्च महिन्यात न होऊ शकलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठीही त्याचे नाव चर्चेत आले.
  • पण निवड समितीने त्याला संघात स्थान दिले नाही. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या महासंघाची निवड होणार असून सूर्यकुमारची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत.

दिनविशेष:

  • 26 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय इंटरसेक्स जागृकता दिन म्हणून पाळला जातो.
  • संत नामदेव यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये झाला.
  • जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन सन 1863 रोजी लंडनमध्ये सुरु झाले.
  • सन 1947 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
  • राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही.व्ही. रानडे यांना सन 1999 मध्ये केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.