24 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
24 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2020)
US Presidential Election 2020 बॅलेटवर गुजराती, हिंदीसहीत सहा भारतीय भाषा:
- अमेरिकेत भारतीय वंशाचे मतदार मोठ्या संख्ये आहेत. त्यामुळेच भारतीयांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही मोठ्या पक्षांनी प्रयत्न सुरु केलेत.
- याचा प्रत्यय सध्या निवडणुकींच्या बॅलेटकडे पाहिल्यावर येत आहे. अनेक भारतीय भाषांना बॅलेट मतदानपद्धतीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
- यामध्ये हिंदीबरोबरच तेलगु, गुजराती, पंजाबी, तमीळ भाषांनाही स्थान देण्यात आलं आहे.
- मिलन वैष्णव यांनी बॅलेट बॉक्सचा फोटो शेअर केला असून यामध्ये इंग्रजीबरोबरच हिंदी, तेलगु, गुजरातीसहीत एकूण पाच वेगवेगळ्या भाषा दिसत आहेत.
- दुसऱ्या एका युझरने सॅण्टा क्लॅरा कंट्रीमध्ये मतदारांना ईमेलच्या माध्यमातून मत देताना सहा भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
- यामध्ये तामिळ, तेलगु, पंजाबी, हिंदी, गुजराती आणि नेपाळी भाषांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):
अमेरिकेत रेमडेसिविरला अधिकृत मान्यता:
- जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार करोनाच्या गंभीर रुग्णात गुणकारी ठरत नसलेल्या रेमडेसिविर या औषधाला अमेरिकेच्या औषध प्रशासनाने मात्र करोनावरील पहिले अधिकृत औषध म्हणून मान्यता दिली आहे.
- याआधी त्याला आपत्कालीन उपचारांसाठी मान्यता दिली होती.
- या औषधाची निर्मिती करणाऱ्या कॅलिफोर्नियाच्या गिलीड सायन्सेस इन्कार्पोरेशन या संस्थेने म्हटले आहे, की रेमडेसिविर औषधामुळे करोना रुग्ण15 दिवसात बरे होण्याऐवजी दहा दिवसात बरे होऊ लागले.
- या औषधाचे दुसरे नाव वेकलुरी असून ते औषध 12 वर्षांवरील किमान 40 किलोपेक्षा जास्त वजनाच्या व रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेल्या करोना रुग्णांवर उपयोगाचे आहे.
- पन्नास देशांत रेमडेसिविरला करोनावरील तात्पुरते औषध म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्स चा दणदणीत विजय साजरा- IPL 2020:
- चेन्नईविरूद्धच्या सामन्यात इशान किशनने केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या बळावर मुंबईने दणदणीत विजय साजरा केला.
- जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांनी गुडघे टेकत फक्त 114 धावा केल्या होत्या.
- किशनने नाबाद 68 तर डी कॉकने नाबाद 46 धावा केल्या आणि मुंबईला 10 गडी राखून विजय मिळवून दिला.
- IPLच्या इतिहासात पहिल्यांदा चेन्नईचा संघ प्ले-ऑफ्ससाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे मुंबईविरूद्धच्या पराभवामुळे चेन्नईला दुहेरी दणका बसला.
दिनविशेष:
- 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन, जागतिक विकास माहिती दिन तसेच जागतिक पोलियो दिन आहे.
- सन 1605 मध्ये मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.
- विल्यम लसेल यांनी सन 1851 मध्ये उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
- सन 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
- भारतामध्ये प्रथमच भुयारी रेल्वे सन 1984 मध्ये कोलकाता येथे सुरू झाली.