23 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली:
‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली

23 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 ऑक्टोबर 2020)

केंद्र सरकार खर्च करणार 50 हजार कोटी रुपये:

  • भारताने आता करोनाच्या लस उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी यासाठी केंद्र सरकारने सुमारे 50 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • प्रत्येक नागरिकासाठी या लशीचा खर्च 6 ते 7 डॉलर म्हणजेच 500 रुपयांपेक्षा जास्त असणार आहे.
  • त्यामुळे सरकारने 130 कोटी जनतेसाठी 7 बिलियन डॉलर म्हणजेच 50 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसीचे संचालक रामानन लक्ष्मीनारायण यांचं म्हणण आहे की, “भारत करोनाच्या लशीचा मोठा खरेदीदार असून विक्रेताही आहे. त्यामुळे लस निर्मितीची किंमत कमीही होऊ शकते.”
  • भारत सरकारला देशातील सर्व नागरिकांना करोनाची लस देण्यासाठी सुमारे 80,000 कोटी रुपयांची गरज लागेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2020)

‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली:

  • नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे.
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पावणे सात वाजता पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • चार किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र खांद्यावरुन डागता येते. भारतीय लष्करामध्ये या क्षेपणास्त्राचा लवकरच समावेश केला जाईल.
  • हेलिकॉप्टरमधून डागल्या जाणाऱ्या रणगाडाविरोधी मिसाइलची चाचणी केल्यानंतर आज नाग क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
  • 19 ऑक्टोबरला बालासोर टेस्ट रेंजवर स्टँड ऑफ अँटी टँक मिसाइलची चाचणी करण्यात आली होती.
  • या क्षेपणास्त्राद्वारे 10 किलोमीटर अंतरावरील रणगाडा उडवता येऊ शकतो.

जेईई मुख्य परीक्षा आता आणखी काही प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार:

  • पुढील वर्षी होणारी जेईई मुख्य परीक्षा आता आणखी काही प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.
  • संयुक्त प्रवेश मंडळाने (जेएबी) नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) हा निर्णय घेतला आहे.
  • अभियांत्रिकीसाठीची जेईई मुख्य परीक्षा (प्रवेश परीक्षा) सध्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांमध्येच घेतली जाते.
  • ज्या राज्यांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले जाते तिथे जेईई परीक्षा प्रादेशिक भाषेत घेण्यात येईल.”

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : बायर्न म्युनिकची धडाक्यात सुरुवात:

  • बायर्न म्युनिकने गतविजेतेपद आपल्याकडेच राखण्याच्या दिशेने धडाक्यात सुरुवात केली.
  • बुधवारी मध्यरात्री रंगलेल्या चॅम्पियन्स लीगच्या सलामीच्या सामन्यात त्यांनी अ‍ॅटलेटिको माद्रिदचा ४-० असा धुव्वा उडवला.
  • मंगळवारी बायर्न म्युनिकचा पहिला फुटबॉलपटू करोनाग्रस्त आढळून आल्यानंतर या सामन्याविषयी अनिश्चितता होती.
  • पण बायर्नने या स्पर्धेतील सलग 12वा विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली.
  • किंग्सले कोमानने 28व्या व 72व्या मिनिटाला गोल करत विजयात महत्त्वाचा हातभार लावला.

दिनविशेष:

  • कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1778 मध्ये झाला.
  • सन 1890 मध्ये हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
  • श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1923 मध्ये झाला.
  • सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना सन 1997 मध्ये प्रदान झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.