27 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 डिसेंबर 2021)
केंद्राच्या सर्वोत्तम प्रशासन यादीत गुजरात अव्वल स्थानी :
देशातील सर्व राज्यांमध्ये प्रशासनाच्या गुणवत्तेनुसार त्यांची यादी दरवर्षी केंद्र सरकारकडून तयार केली जाते.
तर ही यादी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शनिवारी 25 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली.
तसेच या यादीमध्ये देशातील सर्वोत्तम प्रशासनानुसार राज्यांचा क्रम लावण्यात येतो.
उत्तम प्रशासन दिनाच्या निमित्ताने ही यादी जाहीर करण्यात आली असून त्यानुसार गुजरात राज्यानं एकूण 58 निर्देशांकांमध्ये उत्तम कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.
तर या यादीनुसार गेल्या वर्षभरात जवळपास 20 राज्यांनी त्यांचा GGI अर्थात गुड गव्हर्नन्स इंडेक्स दर्जा सुधारला आहे.
या यादीनुसार गुजरातनं 2019च्या तुलनेत गेल्या वर्षभरात 12.3 टक्क्यांची वाढ नमूद केली आहे.
त्यामध्ये आर्थिक प्रशासन, मनुष्यबळ विकास, सार्वजनिक सोयीसुविधा, समाज कल्याण आणि विकास, न्यायव्यवस्था, सामाजिक सुरक्षा या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
ही यादी बनवण्यासाठी केंद्राकडून एकूण 10 क्षेत्र आणि त्यातील 58 निर्देशांकांची तपासणी केली जाते.
दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी चळवळीचे अध्वर्यू आणि देशातील वांशिक पक्षपाताविरुद्ध दिलेल्या लढय़ासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचे रविवारी निधन झाले.
दक्षिण आफ्रिकेतील सध्या हयात असलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्यांपैकी ते अखेरचे होते.
दक्षिण आफ्रिकेतील धर्मगुरू व कार्यकर्ते असलेले डेस्मंड टुटू यांना वर्णभेदविरुद्ध अिहसक लढा दिल्याबद्दल 1984 साली नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते.
तर त्या राजवटीच्या काळय़ा दिवसांत झालेल्या अत्याचारांचा छडा लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रूथ अँड रिकन्सिलिएशन कमिशनचे ते अध्यक्ष होते.
नागालॅण्डमधून ‘अफ्स्पा’ कायदा मागे घेण्याच्या हालचाली सुरू :
जवानांनी केलेल्या गोळीबारात सहा खाणमजुरांसह 13 नागरिकांचा मृत्यू झाला.
त्यामुळे नागालॅण्डमधून सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) मागे घेण्याची संतप्त मागणी होत असल्याने त्याबाबत केंद्र सरकारने एक समिती नियुक्त केल्याची माहिती नागालॅण्डचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी रविवारी दिली.
तर ही पाचसदस्यीय समिती वादग्रस्त ‘अफ्स्पा’ मागे घेण्याबाबत अभ्यास करून आपल्या शिफारशी 45 दिवसांत सादर करील.
नागालॅण्डचा अस्वस्थ क्षेत्रात केलेला समावेश रद्द करून तेथून ‘अफ्स्पा’ कायदा मागे घ्यायचा की तो यापुढेही लागू ठेवायचा याबाबत ही समिती अहवाल सादर करणार आहे.
दिनविशेष:
उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा 27 डिसेंबर 1797 मध्ये आग्रा येथे जन्म झाला होता.
रेबीज किंवा हाइड्रोंफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ ‘लुई पाश्चार‘ यांचा जन्म 27 डिसेंबर 1822 मध्ये झाला होता.
विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री ‘पंजाबराव देशमुख‘ यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 मध्ये झाला होता.
सन 1945 मध्ये 28 देशांनी एकत्रिक जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले होते.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.