28 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
28 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 जुलै 2020)
इटोलिझुमाब प्रभावी नाही कोविड दलाचे प्रतिकूल मत:
- बायोकॉन कंपनीने सोरायसिसवर तयार केलेले इटोलिझुमाब हे औषध आपत्कालीन करोना वैद्यकीय उपचारात समाविष्ट करण्याइतके प्रभावी नाही असे मत कोविड १९ विशेष समिती सदस्यांनी व्यक्त केले असून या औषधाबाबत प्रतिकूल मत दिले आहे.
- बायोकॉनच्या प्रमुख किरण शॉ मुझुमदार यांनी या औषधाच्या उपयुक्ततेबाबत अधिक माहिती समितीला सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. या औषधाच्या उपचारासाठी 40 हजार रु. खर्च येतो.
- इटोलिझुमाब हे औषध म्हणजे मोनोक्लोनल प्रतिपिंडाचा प्रकार असून ते बायोकॉनने सेंटर फॉर मॉल्यिकुलर इम्युनॉलॉजी या क्युबातील संस्थेच्या मदतीने तयार केले आहे.
- 12 जुलैला या औषधाचा वापर कोविड रुग्णांवर आपत्कालीन परिस्थिीतीत करण्यास भारताच्या औषध महानियंत्रकांनी मान्यता दिली होती पण आता कोविड विशेष समितीने या औषधाचा समावेश करोना वैद्यकीय व्यवस्थापनात करू नये अशी सूचना केली आहे.
- एक हजार रुग्णात या औषधाचे चांगले परिणाम दिसून आले असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
Must Read (नक्की वाचा):
29 सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये पहिली डिबेट:
- सध्या जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं असून अमेरिकेला याचा सर्वाधिक फटकादेखील बसला आहे. असं असलं तरी अमेरिकेत मात्र राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.
- निवडणुकीसाठी पहिली डिबेट 29 सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सनं सोमवारी याबाबत माहिती दिली.
- “क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहेत,” अशी माहितीही यावेळी देण्यात आली. 29 सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्षे जो बायडेन यांच्यादरम्यान थेट डिबेट होणरा आहे.
पाच राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे निगाले:
- पाच राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे येण्यास निघाला असून ही विमाने करारानुसार देण्यात येत आहेत.
- बहुउद्देशी असलेले हे लढाऊ विमान असून बुधवारी ही विमाने अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर येणार आहेत.
राफेल विमानांच्या खरेदीचा करार भारताने पाच वर्षांपूर्वी केला होता. - भारतीय हवाई दलाला फ्रान्सची दसॉल्ट कंपनी 36 विमाने देणार असून त्यासाठी 59 हजार कोटींचा करार झाला होता.
- फ्रान्सनमधील बोर्डक्स विमानतळावरून या विमानांनी उड्डाण केले असून ती संयुक्त अरब अमिरातीत एक थांबा घेऊन सात हजार कि.मीचे अंतर कापून भारतात येणार आहेत.
भारत सरकारने चीनचे अजून 47 अॅप्स केले Ban:
- चीनशी संबंधित कंपन्यांवर भारत सरकारने दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे.
- ‘इंडियाटुडे’च्या वृत्तानुसार, 59 चिनी अॅप्स बॅन केल्यानंतर भारत सरकारने अजून 47 चिनी अॅप्स बॅन केले आहेत.
- नव्याने बॅन करण्यात आलेल्या अॅप्समध्ये बहुतांश ‘क्लोनिंग’ अॅपचा समावेश आहे.
युव्हेंटसचे सलग नववे विजेतेपद- सेरी-ए फु टबॉल स्पर्धा :
- ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अप्रतिम कामगिरीमुळे युव्हेंटसने सलग नवव्यांदा सेरी-ए फु टबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
- युव्हेंटसने रविवारी सॅम्पडोरियाचा 2-0 असा पाडाव करत दोन सामन्यांआधीच जेतेपदावर मोहोर उमटवली.
- पाच वेळा ‘बलॉन डीऑर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या रोनाल्डोने करोनाच्या विश्रांतीनंतर सलग 11 सामन्यांत गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर के ला. त्याचबरोबर इटलीतील दुसऱ्या मोसमात 30 सामन्यांत 30 गोलचा टप्पा त्याने ओलांडला.
- रोनाल्डोला आता सेरी-ए स्पर्धेत युव्हेंटसतर्फे सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी एका गोलची गरज आहे. 1933-34मध्ये फे लिस बोरेल यांनी हा विक्रम नोंदवला होता.
दिनविशेष :
- 28 जुलै हा ‘जागतिक हेपटायटीस दिन‘ म्हणून पाळला जातो.
- हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक ‘बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग‘ यांचा जन्म 28 जुलै 1925 मध्ये झाला.
- सन 1998 मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन झाले.
- आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना सन 2001 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झाले.