28 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
28 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 मे 2020)
तेजस लढाऊ विमान हवाई दलाच्या स्क्वाड्रन क्रमांक 18 मध्ये सामील :
तमिळनाडूतील कोइम्बतूर शहराच्या सीमेवरील सुलुर येथील हवाई दल स्थानकावर झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय हवाई दलाने ‘तेजस’ हे पहिले हलके लढाऊ विमान ‘फ्लाइंग बुलेट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या 18 क्रमांकाच्या स्क्वाड्रनमध्ये सामील केले.
तर बंगळूरु येथील हिंदुस्तान एअरॉनॉटिकल लि. (एचएएल) ने तेजस एमके-1 हे विमान तयार केले आहे.
तसेच भदौरिया यांनी पहिल्या तेजस एमके-1 लढाऊ विमानाची प्रतीकात्मक चावी 18 स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन मनीष तोलानी यांना सोपवली. यापूर्वी भदौरिया यांनी या एक सीटर विमानाचे उड्डाण केले.
तेजस हे स्वदेशात निर्मित चौथ्या पिढीचे विना शेपटीचे डेल्टा विंग विमान आहे.
तर यापूर्वी सुलुर येथीलच 45 स्क्वाड्रनला सोपवण्यात आल्यानंतर, हे विमान मिळणारे क्र. 18 स्क्वाड्रन हे दुसरे ठरले आहे.
तसेच हे विमान फ्लाय-बाय-वायर फ्लाइट कंट्रोल सिस्टीम, इंटिग्रेटेड डिजिटल अॅव्हिऑनिक्स आणि मल्टी-मोड रडार यांनी सज्ज आहे.
चौथ्या पिढीच्या ध्वनीतीत लढाऊ विमानांच्या गटातील हे सर्वात कमी वजनाचे आणि लहान विमान आहे.
1965 साली स्थापन झालेली 18 क्रमांकाची स्क्वाड्रन यापूर्वी मिग-27 विमानांचे उड्डाण करीत असे.
राजस्थानच्या कृषी विभागाने पिकांवरील टोळधाडीचे नियंत्रण करण्यासाठी ड्रोन विमानांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
तर जयपूर जिल्ह्य़ात ड्रोनच्या मदतीने कीटकनाशकांची फवारणी टोळधाडीवर करण्यात येत आहे.
कृषी आयुक्त ओम प्रकाश यांनी सांगितले की, आम्ही भाडय़ाने ड्रोन विमान घेतले असून त्याच्या मदतीने कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. पुढील काही दिवसात आणखी काही ड्रोन भाडय़ाने घेऊन टोळधाडीचा मुकाबला केला जाईल.
फक्त दोनशे रुपयात करोनाची चाचणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट; ‘सीएसआयआर’चा रिलायन्ससोबत करार
‘सीएसआयआर’चा रिलायन्ससोबत करार :
देशात करोनाचा प्रसार अजूनही थांबल्याची चिन्ह नाहीत. दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये करोनाचा प्रसार होतच असून, चाचणी करणं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं नाही.
तर करोनाच्या चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये 4500 शुल्क आकारलं जातं. मात्र, आता लवकरच कमी पैशात करोनाचं निदान करणं शक्य होणार आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) रिलायन्सच्या मदतीनं करोनाचं निदान करणारी किट विकसित करणार आहे. यासाठी दोघांमध्ये करारही झाला आहे.
करोनाचं निदान करणाऱ्या आरटी-लॅम्प कोविड-19 टेस्ट किटविषयी (Reverse Transcriptase- loop Mediated Isothermal Amplification)परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे यांनी ‘एएनआय’ला माहिती दिली.
तसेच कोविड-19 आरटी-लॅम्प चाचणी न्युक्लिक अॅसिड आधारित आहे. रुग्णांच्या घशातील अथवा नाकातील स्वॅबचा नमुना घेऊन ही चाचणी केली जाते. कृत्रिम टेम्प्लेटचा वापर करून ही चाचणी विकसित करण्यात आली आहे आणि तिचं प्रात्यक्षिकही यशस्वीरित्या झालं आहे, असं मांडे यांनी सांगितलं.
तर आरटी-लॅम्प टेस्ट ही खूप स्वस्त आहे. कारण त्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी काहीच खर्च नाही. त्याचबरोबर ती जलदगतीनं करता येते. वेगवेगळ्या भागातही करोनाच्या निदानासाठी या चाचणीचा वापर करता येऊ शकतो. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही तातडीनं घेऊन जाऊन शकतो, असं ते म्हणाले.
दिनविशेष :
क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला.
फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीची स्थापना 28 मे 1937 मध्ये झाली.
28 मे 1952 रोजी ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
75 व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे 28 मे 1958 रोजी सत्कार करण्यात आला.
पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना 28 मे 1964 रोजी झाली.
Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.