Current Affairs (चालू घडामोडी)

29 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

29 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 डिसेंबर 2018)

भूतानच्या पंचवार्षिक योजनेसाठी भारताकडून अर्थसहाय्य:

  • भारताने भूतानला 4500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून, त्या देशाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ही मदत करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे भूतानी समपदस्थ लोटे त्सेरिंग यांनी व्दिपक्षीय चर्चा केली.
  • पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, की भूतानबरोबर जलविद्युत सहकार्य हा महत्त्वाचा भाग असून, तो दोन्ही देशांतील व्दिपक्षीय संबंधांचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मंगदेच्छू प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येईल.
  • त्सेरिंग यांचे पहिल्या परदेश भेटीवर आगमन झाले. त्यांनी गेल्या महिन्यात भूतानचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. मोदी यांनी सांगितले, की भारत हा भूतानचा विश्वासू मित्र असून तेथे महत्त्वाची भूमिका पार पाडील यात शंका नाही.
  • भारताने त्यांच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी 4500 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. भूतानने या वर्षी नवी पंचवार्षिक योजना सुरू केली असून, तिची मुदत 2022 पर्यंत आहे.
  • दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्सेरग यांची सकाळी भेट घेतली. त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले. त्सेरिंग यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीवर राजघाट येथे पुष्पचक्र वाहिले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2018)

जागतिक शिखर परिषदेमध्ये पाकिस्तानचा समावेश:

  • यंदाच्या वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेमध्ये पाकिस्तानील व्यावसायिकांची शिष्टमंडळे सहभागी होणार आहेत. 2013 नंतर प्रथमच पाकिस्तानातील व्यावसायिकांचे शिष्टमंडळ या परिषदेमध्ये दिसणार आहे.
  • दिनांक 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान गुजरातमध्ये ही परिषद होणार आहे. जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना गुजरातकडे आकर्षित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनीच गुजरातचे मुख्यमंत्री असताना वायब्रंट गुजरातची संकल्पना मांडली होती.
  • पाकिस्तानच्या वेगवेगळया भागातून व्यावसायिकांची सात शिष्टमंडळे या परिषदेमध्ये सहभागी होऊ शकतात असे इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे. इतक्या मोठया संख्येने पाकिस्तानी उद्योगपती वायब्रंट गुजरात परिषदेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
  • विविध देशांच्या वाणिज्य आणि व्यापारी मंडळांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या 52 शिष्टमंडळांनी आंतरराष्ट्रीय चेंबरच्या जागतिक परिषदेमध्ये सहभागी होणार असल्याचे कळवले आहे. वायब्रंट गुजरात परिषदेतील हा एक कार्यक्रम आहे.

शिवचरित्राचा आता हिंदूी अनुवाद होणार:

  • ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ‘शिवाजी : हिज लाइफ अँड टाइम्स‘ या शिवचरित्रावरील मूळ इंग्रजी ग्रंथाचा हिंदूी अनुवाद केला जाणार आहे. अनुवादाचा हा प्रकल्प हाती घेण्याचा संकल्प भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने केला आहे.
  • भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी भांडारकर संस्थेला अशा स्वरूपाचा प्रस्तावा दिला असून या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आपल्या खासदार निधीतून अर्थसाह्य़ करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
  • शताब्दी पार केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये नुकत्याच भरविण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला खासदार राकेश सिन्हा यांनी आवर्जून भेट दिली. संस्थेच्या वाटचालीची माहिती घेऊन सिन्हा यांनी प्राच्यविद्या क्षेत्रातील संस्थेच्या मूलभूत संशोधनपर कार्याचा गौरव केला.
  • ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ‘शिवाजी : हिज लाइफ अँड टाइम्स’ या मूळ इंग्रजी ग्रंथाचा हिंदूी अनुवाद करण्याचा प्रकल्प भांडारकर संस्थेने हाती घ्यावा, असा प्रस्ताव संस्थेचे विश्वस्त आणि शिपिंग बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्याकडे दिला.

इस्त्रोचे गगनयान अवकाशात झेपावणार:

  • इस्त्रोच्या मिशन गगनयानला केंद्र सरकारचा हिरवा कंदिल मिळाला असून लवकरच भारतीय अंतराळवीर या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. या मोहिमेंतर्गत 3 भारतीय अंतराळवीर अवकाशात सात दिवस मुक्काम करणार आहेत.
  • ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 10 हजार कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.
  • केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या दिड ते दोन महिन्यात हे मिशन सुरू होणार आहे. जगातील इतर देशही सॅटेलाइट लॉन्च करण्यासाटी इस्रोची मदत घेत आहेत.
  • या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी भारताने रशिया आणि फ्रान्सबरोबर करार केला आहे. ही गगनयान मोहीम यशस्वी होण्यासाठी अंतराळात जाणाऱ्या एका व्यक्तीच्या कमीत कमी चाचण्या घेण्यात येणार आहेत.
  • तसेच या शिवाय 2022 पर्यंत गगनयान अंतराळात पाठवणार असल्याचे इस्रोचे प्रमुख सिवन यांनी आधीच सांगितलं आहे. त्याआधी 2020 आणि 2021 मध्ये दोन मानवरहित यानही अवकाशात पाठवण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेची घोषणा केली होती, त्याला आता मूर्त रुप येणार आहे.

दिनविशेष:

  • काँग्रेसचे पहिले अध्यक्षव्योमकेशचंद्र बॅनर्जी‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1844 मध्ये झाला होता.
  • मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 29 डिसेंबर 1900 मध्ये झाला होता.
  • प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शकरामानंद सागर‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 रोजी झाला होता.
  • सन 1930 मध्ये सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला होता.
  • सन 1959 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही Nanotechnology ची सुरुवात मानली जाते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 डिसेंबर 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago