29 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs
29 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 डिसेंबर 2020)
कर्नाटकमध्ये गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर :
- तीन आठवड्यांपूर्वी राज्याच्या विधानसभेत मंजूरी मिळाल्यानंतर कर्नाटकच्या कॅबिनेटने सोमवारी ‘गोहत्या प्रतिबंध आणि संरक्षण विधेयक 2020’ मंजूर केले.
- तर आता हे विधेयक राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांनी त्यावर मोहोर उठवल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल.
- तसेच या नव्या विधेयकानुसार, गायींची अवैध विक्री, अवैध वाहतूक दंडनीय अपराध असणार आहे.
- जर गायीला एखादा संसर्गजन्य आजार जडला ज्यामुळे इतर गुरांमध्ये त्याचा फैलाव होऊ शकतो, अशाच वेळी त्या गायीची कत्तल केली जाऊ शकते, असं कर्नाटकचे कायदा मंत्री जे. सी. मधूस्वामी यांनी म्हटलं आहे.
- तर या विधेयकातील सेक्शन 1 (2) नुसार, गुरं म्हणजे गाय, गायीचं वासरु आणि बैल तसेच 13 वर्षांखालील म्हैस किंवा रेडा यांचा समावेश आहे.
- या विधेयकानुसार, जर गोहत्या घडून आल्यास गुन्हा दाखल होऊन तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.
- तसेच या शिक्षेसह कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला 50,000 ते 5 लाखांचा दंडही भरावा लागणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
देशातील चालकरहित पहिल्या मेट्रोला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा :
- देशातील पहिली चालकविरहित मेट्रो ट्रेन दिल्लीत सुरु झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला हिरवा झेंडा दाखवला.
- राजधानी दिल्लीत देशातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित चालकविरहित मेट्रो ट्रेन सोमवारपासून सुरु झाली.
- तर दिल्ली मेट्रोच्या मॅजन्टा लाईनवर ही मेट्रो धावणार आहे.
- देशात सन 2014 मध्ये केवळ 248 किमी इतक्या अंतरावर मेट्रो लाईन सुरु होत्या. आज तीनपट जास्त म्हणजेच 700 किमी अंतरावर मेट्रो धावत आहेत.
ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना राज्य सरकारचे अर्थसाहाय्य :
- टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंना सोमवारी राज्य सरकारद्वारे प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला.
- राज्यातील खेळाडूंना पूर्वतयारीसाठी एकूण अडीच कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला.
- तर या खेळाडूंमध्ये नेमबाज राही सरनोबत, नेमबाज तेजस्विनी सावंत, धावपटू अविनाश साबळे तसेच पॅरालिम्पिक नेमबाज स्वरूप उन्हाळकर आणि तिरंदाज प्रवीण जाधव यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले.
ICC पुरस्कारावर धोनी-विराटची छाप :
- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार एम. एस. धोनी यांनी आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे) पुरस्कारावर ठसा उमटवला आहे.
- तर दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार आणि दशकातील सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू असे मानाचे पुरस्कार विराट कोहलीने आपल्या खिशात घातले आहेत.
- तसेच धोनीला दशकातील ‘खेळभावना’पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या स्टिव स्मिथला दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलं आहे.
- तर अफगाणिस्तानच्या राशिद खानची दशकातील सर्वोत्तम टी-20 खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
- दशकातील सर्वोत्तम महिला एकदिवसीय, टी-20 क्रिकेटपटू आणि रेचेल हेयोइ फ्लिंट पुरस्कारावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीनं नाव कोरलं आहे.
करोना आर्थिक मदत योजनेवर ट्रम्प यांची स्वाक्षरी :
- अमेरिकी लोकांना करोना काळात येत असलेल्या अनेक अडचणी पाहून 900 अब्ज डॉलर्सच्या मदतीचा समावेश असलेले 2.3 लाख कोटी डॉलर्सचे खर्च विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
- तर त्यावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर स्वाक्षरी केली, अन्यथा अमेरिकेवर आर्थिक टाळेबंदीची नामुष्की येण्याचा धोका होता. कारण अनेक सेवांवरचा खर्च सरकारने मंजूर करणे गरजेचे असते अन्यथा त्या ठप्प होऊ शकतात.
- ट्रम्प हे 20 जानेवारीला व्हाइट हाऊस सोडणार असून त्यांनी अखेर हे विधेयक मंजूर करण्याचा निर्णय घेतला.
- तसेच ट्रम्प यांनी जे विधेयक मंजूर केले आहे त्यातील 1.4 लाख कोटी डॉलर्स हे सरकारी संस्था चालवण्यासाठी आहेत. त्यामुळे सरकारी संस्थांचा सप्टेंबपर्यंतचा खर्चही भागणार आहे.
दिनविशेष:
- काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ‘व्योमकेशचंद्र बॅनर्जी‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1844 मध्ये झाला होता.
- मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 29 डिसेंबर 1900 मध्ये झाला होता.
- प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ‘रामानंद सागर‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 रोजी झाला होता.
- सन 1930 मध्ये सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला होता.
- सन 1959 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही Nanotechnology ची सुरुवात मानली जाते.