30 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs
30 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 डिसेंबर 2020)
दक्षिण कोरियानं विकसित केलेल्या ‘कृत्रिम सूर्या’चा जागतिक विक्रम :
- दक्षिण कोरियाने विकसित केलेला हा ‘कृत्रिम सूर्य’ म्हणजे एक उपकरण आहे, ज्याला KSTAR (Korea Superconducting Toakamak Advanced Research) असं म्हणतात.
- सूर्य हा अक्षय ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. मात्र, या ऊर्जेचा वापर करताना अनेक अडचणी येतात ज्यामुळे प्रत्येक ठिकाणी किंवा गरजेप्रमाणे याचा वापर करता येत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक विविध प्रयोग करत आहेत.
- तर त्यानुसार, आण्विक आणि न्यूक्लियर ऊर्जेला एक चांगला स्त्रोत मानून सूर्याप्रमाणे पृथ्वीवर न्यूक्लियर फ्युजनद्वारे ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरु केला आहे.
- तसेच या प्रयत्नातूनच दक्षिण कोरियाने कृत्रिम सूर्य बनवला असून या सूर्याने उच्च तापमानाचा प्लाझ्मा 20 सेकंदापर्यंत कायम ठेवण्याचा नवा जागतिक विक्रम केला आहे.
- कारण या कृत्रिम सूर्याचं तापमान 100 मिलियनडिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. याची खऱ्या सूर्याशी तुलना केल्यास सूर्याच्या गाभ्याचे तापमान हे केवळ 15 मिलियन डिग्री सेल्सिअस आहे.
- तर गेल्या महिन्यांत कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ फ्यूजन एनर्जी येथील KSTAR रिसर्च सेंटरने घोषणा केली होती की, सियॉल नॅशनल युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त संशोधनातून
त्यांनी प्लाझ्माचं तापमान 10 कोटी डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक राखण्यात यश मिळवले आहे.
Must Read (नक्की वाचा):
रहाणेचा ठरला मानाचं Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू :
- अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून मात केली.
- कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात नाबाद 27 धावा झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
- तर अजिंक्यच्या या शतकी खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यानिमीत्ताने त्याला मानाचं Johnny Mullagh Medal देण्यात आलं.
- तसेच 2019 साली क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीत सामनावीराचा पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूला माजी क्रिकेटपटू Johnny Mullagh यांच्या सन्मानार्थ मेडल देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला.
जीएसटी विवरणपत्र तिमाही भरण्याचीही मुभा :
- केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विवरणपत्र दरमहाऐवजी तिमाही भरण्यास मुभा दिली आहे.
- तर नववर्षापासून हा निर्णय लागू होणार असून, त्याचा फायदा देशातील 94 लाख (92 टक्के) करदात्यांना होणार आहे. त्यामुळे त्यांचे कारकुनी काम कमी होण्यास मदत होईल.
- तसेच उलाढालीवरील जीएसटी कर दरमहा भरण्याची परवानगी आणि विवरणपत्र तिमाही भरण्याची मुभा सीबीआयसीने दिली आहे.
- यापूर्वी वर्षभरात बारा 3-बी विवरणपत्र भरावी लागत होती. ती संख्या आता चारपर्यंत कमी करण्यात आली आहे.
दिनविशेष :
- ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे 30 डिसेंबर 1906 स्थापना.
- 30 डिसेंबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.
- गांधीवादी कार्यकर्ता आचार्य शंकरराव देव यांचे 30 डिसेंबर रोजी निधन.