Current Affairs (चालू घडामोडी)

3 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

अरविंद कृष्णा

3 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 फेब्रुवरी 2020)

IBM च्या CEO पदीही भारतीय :

  • जगप्रसिद्ध आयबीएमच्या (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) विशेष कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तसेच अनेक वर्षांपासून सीईओ असणाऱ्या व्हर्जिनिया रोमेटी यांच्याकडून अरविंद सहा एप्रिल रोजी कार्यभार स्वीकारतील.
  • तर 62 वर्षीय रोमेटी या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. 40 वर्षांपासून कंपनीच्या सेवेमध्ये असणाऱ्या रोमेटी या 2020 च्या शेवटी निवृत्त होणार असल्याचंही कंपनीने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
  • अरविंद सध्या आयबीएमच्या क्लाऊड आणि कग्नेटीव्ह विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. क्लाऊड तंत्रज्ञान आणि डेटासंदर्भातील कामे या विभागांकडून पाहिली जातात. आयबीएम क्लाऊड, आयबीएम सिक्युरिटी, कग्नेटीव्ह अॅप्लिकेशन्स, आयबीएम रिसर्च अशा चार मुख्य शाखांचे नेतृत्व अरविंद करत आहेत.
  • त्याआधी ते आयबीएमच्या सिस्टीम्स आणि टेक्नोलॉजीच्या डेव्हलपमेंट आणि निर्मिती विभागामध्ये महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होते.

कर्णधार विराटच्या नावावर अनोखा विक्रम :

  • नवीन वर्षात आपला पहिला परदेश दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाने इतिहासाची नोंद केली आहे.
  • तर न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात 7 धावांनी विजय मिळवत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. न्यूझीलंडच्या भूमीवर अशी कामगिरी करण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
  • भारताने विजयासाठी दिलेलं 164 धावांचं आव्हान यजमान संघाला पेलवलं नाही. रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अर्धशतक झळकावत चांगले प्रयत्न केले, मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत न्यूझीलंडची विजयाची संधी हिरावून घेतली.
  • तसेच अंतिम सामन्यात भारतीय संघाने विराट कोहलीला विश्रांती देत रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवलं. मात्र रोहितही फलंदाजीदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे गोलंदाजीदरम्यान लोकेश राहुलने कर्णधारपदाची भूमिका निभावली.
  • 5-0 या मालिकाविजयासह कर्णधार विराट कोहलीच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.
  • आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा दोन देशांमधील मालिका जिंकण्याचा विक्रम विराटच्या नावे जमा झालेला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु-प्लेसिसचा विक्रम मोडीत काढला.

रोहित शर्माने नोंदवले 3 अनोखे विक्रम :

  • कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-20 सामन्यात 163 धावांपर्यंत मजल मारली आहे.
  • रोहित शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेताना 60 धावांची खेळी केली. मात्र पोटरीचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला उपचारांसाठी मैदान सोडावं लागलं.
  • मात्र या अर्धशतकी खेळीदरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा पूर्ण करत दिग्गज भारतीय खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं.
  • आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधलं रोहित शर्माचं हे 25 वं अर्धशतक ठरलं. यादरम्यान रोहितने आपला कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं.
  • याचसोबत न्यूझीलंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित पहिल्या स्थानी पोहचला आहे.

जसप्रीत बुमराहने रचला विश्वविक्रम :

  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विश्वविक्रम रचल्याचे पाहायला मिळाले.
  • भारताच्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात करता आली नाही. कारण न्यूझीलंड आपले पहिले तीन फलंदाज फक्त 17 धावांत गमावले. यामध्ये बुमराहचा महत्वाचा वाटा होता. कारण बुमराहने ज्याप्रकारे भारताला सुरुवात करून दिली ती यावेळी महत्वाची ठरली.
  • तर या सामन्यात सैनीबरोबर जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत सर्वाधिक तीन बळी मिळवले. बुमराहने या सामन्यात पहिलेच षटक निर्धाव टाकत भारताला यश मिळवून दिले. त्यामुळे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकण्याचा विश्वविक्रम आता बुमराहच्या नावावर जडला गेला आहे.
  • आतापर्यंत बुमराहने आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सात षटके निर्धाव टाकले आहेत. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराच्या नावावर होता, त्याने सहा निर्धाव षटके टाकली होती.

दिनविशेष:

  • स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास 1783 मध्ये मान्यता दिली.
  • 1870 मध्ये अमेरिकेच्या संविधानातील 15 वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
  • भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे 1925 मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
  • 1966 मध्ये सोव्हिएत रशियाने लूना-9 हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.
  • वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्म 1821 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Shital Burkule

Shital is very passionate content writer and likes to write about more stuff related to news about education.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago