रशियाकडून 21 मिग-29 लढाऊ विमाने खरेदी करण्यात येणार:
सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी 38 हजार 900 कोटी रुपये खर्चून 33 लढाऊ जेट विमाने, अनेक क्षेपणास्त्र यंत्रणा आणि इतर लष्करी साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी मंजुरी दिली.
रशियाकडून 21 मिग-29 लढाऊ विमाने खरेदी करण्यात येणार.
सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडून 12 एसयू-30 एमकेआय (सुखोई) विमाने खरेदी केली जाणार आहेत.
तर 248 ‘अॅस्ट्रा’ क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे.
खासगी प्रवासी रेल्वेसेवा 2023 मध्ये प्रत्यक्षात येईल:
देशातील 109 मार्गावरील प्रवासी रेल्वेसेवा खासगी कंपन्यांकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव कार्यान्वित झाला असून ही खासगी सेवा एप्रिल 2023 मध्ये प्रत्यक्षात येईल, अशी माहिती रेल्वेमंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी गुरुवारी दिली.
‘मेड इन इंडिया’ धोरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याने देशी खासगी कंपन्यांना अग्रक्रम असेल.
रेल्वे मंत्रालयाने बुधवारी 109 रेल्वेमार्गावर 151 रेल्वे गाडय़ांच्या व्यवस्थापनासाठी खासगी कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत.
या प्रकल्पामध्ये 30 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या रेल्वे 16 डब्यांच्या असतील व कमाल 160 किमी वेगाने धावतील.
ज्येष्ठ माजी कॅरमपटू आणि आंतरराष्ट्रीय पंच जनार्दन संगम यांचे यांचे निधन:
ज्येष्ठ माजी कॅरमपटू आणि आंतरराष्ट्रीय पंच जनार्दन संगम यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.
संगम यांनी खेळाडू म्हणून नेव्हल डॉकयार्डचे प्रतिनिधित्व केले.
अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रमुख पंचांची भूमिका बजावणाऱ्या संगम यांनी तांत्रिक अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
1992 ते 2019 या 27 वर्षांच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या कार्यकारिणीवर संयुक्त सचिव पद सांभाळले.
तसेच संघटनेचे माजी सचिव म्हणूनही ते कार्यरत होते. त्याशिवाय कॅरमच्या प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रे आणि क्रीडा वाहिन्यांद्वारे त्यांनी अमूल्य योगदान दिले.
33 लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे:
एकीकडे पूर्व लडाख सीमेवर चीनशी तणातणी सुरू असतानाच भारताने आता रशियाकडून लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
33 लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी (12 सुखोई-30 एमकेआयएस आणि 21 मिग-29) संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे.
याशिवाय सध्या भारताकडे असलेले 59 मिग-29 लढाऊ विमानांचे अपग्रेडेशनही करण्यात येणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी संविधानात केलेल्या बदलांना रशियातील मतदारांनी मान्यता दिली.
दिनविशेष :
सन 1850 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
महात्मा फुले यांनी 3 जुलै 1852 मध्ये दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ सन 1855 मध्ये झाला.
3 जुलै 1884 मध्ये डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.
सन 2006 मध्ये एक्स.पी. 14 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.