Current Affairs (चालू घडामोडी)

30 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

30 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 एप्रिल 2019)

देशात चौथ्या टप्प्यात 64 टक्के मतदान:

  • लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यांमधील 72 मतदारसंघांमध्ये सुमारे 64 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या काही घटना घडल्या, तर काही भागात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवल्याच्या तक्रारी मिळाल्या.
  • 2014 च्या निवडणुकांत ज्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपने 32 पैकी 30 जागा मिळवल्या होत्या, त्या राजस्थानमध्ये (13 जागा) 62 टक्के, उत्तर प्रदेशात (13 जागा) 53.12 टक्के, तर मध्य प्रदेशात (6 जागा) 65.86 टक्के मतदान झाले.
  • पश्चिम बंगालमधील आठ मतदारसंघांत 76.47 टक्के मतदान झाले. बिरभूम मतदारसंघातील नानूर, रामपूरहाट, नलहाटी व सुरी येथे प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये चकमकी उडाल्या व त्यात अनेक लोक जखमी झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 एप्रिल 2019)

भारतीय सैन्याकडून हिममानवच्या पाऊलखुणांचे फोटो प्रसिद्ध:

  • बर्फाळ प्रदेशातील हिममानवाविषयी आपण नेहमीच चर्चा ऐकतो. याविषयीच्या कथाही रंगवून सांगितल्या जातात. मात्र, आता हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या पावलाचे ठसे आढळले असून भारतीय सैन्यानेच ट्विटरद्वारे हे फोटो प्रसिद्ध केले आहे. यामुळे हिममानवाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
  • भारतीय सैन्याच्या पथकाला 9 एप्रिल रोजी मकालू बेस कॅम्प येथे रहस्यमय पावलांचे ठसे आढळले. नेपाळ-चीन सीमेजवळचा हा परिसर आहे. हे ठसे मानवी पावलासारखे दिसत असले तरी त्यांचा आकार 32 x 15 इंच इतका होता.
  • तर या भागातील कोणत्याही प्राण्याच्या पावलांचे ठसे इतके मोठे नसल्याने सैन्याचे पथकही संभ्रमात पडले होते. मात्र, हे ठसे फक्त एकाच पायाचे आहेत. हे हिममानवाच्या पावलांचे ठसे असल्याची शक्यता सैन्याने वर्तवली आहे.

खेलरत्नसाठी बजरंग व विनेश यांच्या नावांची शिफारस:

  • भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) नुकत्याच आशियाई चॅम्पियन ठरलेला बजरंग पूनिया व गेल्या वर्षी आशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेती विनेश फोगाट यांची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
  • डब्ल्यूएफआने बजरंग व विनेश यांची गेल्या दोन वर्षांतील शानदार कामगिरी बघता त्यांच्या नावांची पुरस्कारासाठी शिफारस केली.
  • डब्ल्यूएफआयचे अधिकारी म्हणाले, ‘या दोघांनी अर्ज सादर केले होते. त्यानंतर डब्ल्यूएफआयने त्यांच्या नावांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली.’ जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बजरंगने अलीकडेच शियानमध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
  • विनेश आशियाई चॅम्पियनशिपमध्ये केवळ कांस्यपदक जिंकू शकली, पण ती नव्या गटात 53 किलोमध्ये खेळत होती. ती 2018 मध्ये आशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिला भारतीय महिला मल्ल ठरली.
  • बजरंग व विनेश यांच्या व्यतिरिक्त डब्ल्यूएफआयने राहुल आवारे, हरप्रीत सिंग, दिव्या काकरान व पूजा ढांडा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
  • 25 वर्षीय पूजाने गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य व राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. 21 वर्षीय दिव्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते. राष्ट्रकुल व आशियाई गेम्समध्ये ती तिसऱ्या स्थानी होती.

66व्या कलेशी गाठ घालून देणारा दिग्दर्शक:

  • गेल्या काही वर्षांत तरुण दिग्दर्शक अनेक वेगवेगळे विषय घेऊन मराठी चित्रपट करत आहेत. या दिग्दर्शकांच्या पंक्तीत आणखी एक नाव सामील झालं आहे ते म्हणजे ‘ग्रहणफेम अभिनेता योगेश देशपांडे.
  • अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रातील लेखन-दिग्दर्शनाचा अनुभव असलेल्या योगेशला अभिनेता म्हणून झी मराठी वाहिनीवरील ग्रहण मालिके ने घराघरांत पोहोचवले होते. आता योगेश ’66 सदाशिव’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे.
  • 65 वी कला म्हणून मान्यता मिळालेल्या जाहिरात क्षेत्रातील अनुभवाचा आधार घेऊन योगेशने एक कथा लिहिली. ज्यात तो लोकांना 66व्या कलेची ओळख करून देणार आहे.

दिनविशेष:

  • 30 एप्रिल हा दिवसआंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन म्हणून साजरा केला जातो.
  • भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक ‘धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके’ यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी झाला होता.
  • माणिक बांडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये झाला.
  • वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापना सन 1936 मध्ये केली.
  • सन 1977 मध्ये 9 राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
  • कलकत्त्यात 1982 या वर्षी बिजान सेतु हत्याकांड घडले होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 मे 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago