Current Affairs (चालू घडामोडी)

30 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

PPE किट्स

30 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 मे 2020)

रिलायन्सने करुन दाखवलं चीनपेक्षा स्वस्त आणि दर्जेदार PPE किट्स :

  • रिलायन्स इंडस्ट्रीजनं चीनपेक्षा तीन पण कमी किंमतीत ही पीपीई किट्स तयार करण्यास सुरूवात केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सिल्व्हासा येथील प्रकल्पात दररोज 1 लाख पीपीई किट्स तयार करण्यात येत आहेत.
  • तर डॉक्टर्स, परिचारिका, अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यासोबतच डॉक्टरांनादेखील या पीपीई किट्सची आवश्यकता आहे.
  • चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या पीपीई किट्सची किंमत 2 हजार रूपयांपेक्षा अधिक होती.
  • तर रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी अलोक इंडस्ट्रीजनं तयार केलेल्या पीपीई किट्सची किंमत केवळ 650 रूपये इतकी आहे.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजनं करोनाच्या टेस्टिंग किटमध्येही स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
  • तसेच काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चच्या मदतीनं रिलायन्सनं हे स्वदेशी टेस्टिंग किट तयार केलं आहे.
  • तर हे किटदेखील चीनच्या टेस्टिंग किट्सपेक्षा अनेक पटींनी स्वस्त असून 45 मिनिटं ते एक तासाच्या आत रुग्णाचा संपूर्ण माहिती मिळते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 मे 2020)

फेसबुकपाठोपाठ गुगलही भारतीय टेलिकॉम क्षेत्रात घेणार उडी :

  • काही दिवसांपूर्वी फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आणखी काही कंपन्यांनीदेखील जिओमध्ये गुंतवणूक केली होती.
  • तर आता गुगलनंदेखील भारतातील टेलिकॉम क्षेत्रात सर दाखवला आहे. एजीआरच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन आयडिया या कंपनीत गुगल गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  • गुगल ही कंपनी व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीचा काही हिस्सा विकत घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  • तसेच गुगल व्होडाफोन आयडिया या कंपनीतील 5 टक्के हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने WHO सोबतचे तोडले सर्व संबंध :

  • सध्या जगभरातल करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत. तर
  • दुसरीकडे या संकटाला चीन जबाबदार असल्याचं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर हल्लाबोल केला होता.
  • तर त्यातच जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातची बाहुली असल्याचं म्हणत त्यांनी संघटनेसोबत सर्व संबंध तोडण्याचाही इशारा दिला होता.
  • दरम्यान, शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेसोबत असलेले सर्व संबंध तोडत असल्याची घोषणा केली.
  • तसेच ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी करोना व्हायरसच्या संकटात योग्यरित्या काम न केल्याचा ठपका ठेवत जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा निर्णय घेतला होता.
  • तर जोवर करोनाचा प्रसार कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेची समिक्षा केली जात नाही तोवर हा निधी थांबवण्यात येणार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते. तसंच त्यांनी जागति आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता.

छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन :

  • छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अजित जोगी 74 वर्षांचे होते.
  • तर राजकारणात येण्यापूर्वी अजित जोगी यांनी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसंच ते तहसीलदार या पदावर कार्यरत होते.
  • 1988 च्या जवळपास त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती येण्यापूर्वी त्यांनी खासदार म्हणूनही काम केलं आहे.
  • तसेच छत्तीसगढच्या निर्मितीनंतर त्यांनी 2000-2003 या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली होती.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट एकटा क्रिकेटपटू :

  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
  • तर 2020 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या फोर्ब्सच्या 100 खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीला स्थान मिळालं आहे.
  • तसेच या यादीत विराट कोहली हा एकटाच क्रिकेटपटू आहे. विराटचं वार्षिक उत्पन्न हे 26 Million अमेरिकन डॉलर्स एवढं असून यातील 24 Million अमेरिकन डॉलर्स एवढं उत्पन्न विराटला जाहीरातींमधून मिळतं.
  • तर महत्वाची गोष्ट म्हणजे 2018 साली जाहीर करण्यात आलेल्या यादीत विराट 83 व्या स्थानावर होता. यानंतर 2019 साली विराटची या यादीत घसरण होऊन ते 100 व्या स्थानावर फेकला गेला होता.
  • मात्र नवीन वर्षात विराटने चांगली कमाी करत थेट 66 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
  • क्रिकेट व्यतिरीक्त विराट अनेक ब्रँडच्या जाहीराती करतो. ज्यामध्ये PUMA, Audi India, Hero MotoCorp, Philips India, Himalaya, Vicks, Volini अशा नामांकित ब्रँडचा समावेश आहे.

दिनविशेष :

  • इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म 30 मे 1894 मध्ये झाला.
  • अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म 30 मे 1916 रोजी झाला.
  • मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात 30 मे 1934 मध्ये झाली.
  • 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.
  • पु.ल. देशपांडे यांना 30 मे 1993 रोजी ‘त्रिदल‘ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 मे 2020)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago