31 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2018)
भारतीय चलनाचा सार्वकालिक नीचांक:
- रुपयातील घसरण अजूनही सरूच आहे. 30 ऑगस्ट रोजी डॉलरच्या तुलनेत रूपया 70.82 या नव्या नीचाकांवर पोहोचला. रुपयातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घसरण आहे. 29 ऑगस्ट रोजी रूपया 70.59 वर बंद झाला होता.
- डॉलरला वाढलेली मागणी आणि परकीय गुंतवणूकदारांचे निधी काढण्याचे प्रमाण वाढल्याने ही घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने रिफायनरी कंपन्यांची डॉलरमध्ये मागणी वाढली आहे. त्याचबरोबर परकीय बाजारात अन्य चलनांच्या तुलनेत डॉलरच्या मजबुतीमुळेही रुपया प्रभावित झाला आहे.
- रुपयाची घसरण अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे. याचा थेट परिणाम सामान्य व्यक्तीच्या खिशावर पडणार आहे. यामुळे फ्रिज, टीव्ही, एसी आणि लॅपटॉपसारख्या ग्राहकोपयोगी आणि इलेक्टॉनिक साहित्याच्या किंमतींमध्ये वाढ होईल. यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागतील.
वाजपेयींच्या मासिक पुण्यतिथीनिमित्त देशभरात ‘काव्यांजली’:
- दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मासिक पुण्यतिथीनिमित्त 16 सप्टेंबर रोजी देशभरात भारतीय जनता पार्टीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी काव्यांजलीचा प्रमुख कार्यक्रम होणार आहे. दिल्लीतील मुख्यालयात पत्रकार परिषदेत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी ही माहिती दिली.
- शाह म्हणाले, 16 सप्टेंबर रोजी देशभरातील 4 हजार जागी हा काव्यांजलीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी लिहीलेल्या कविता त्यांच्या आवाजातील रेकॉर्डिंग ऐकवण्यात येणार आहे. त्याचबरोबर कवी संमेलनाद्वारे वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. यामध्ये विविध कवी अटलजींच्या कवितांचे म्हणतील तसेच त्यांनी अटलजींवर केलेल्या कवितांचे सादरीकरण होईल.
- तसेच शाह यांनी सांगितले की, प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. प्रत्येक वेळी भाजपा कार्यकर्ते हा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा करतात. मात्र, यावेळी 17 ते 25 सप्टेंबर (दीन दयाल जयंती) पर्यंत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. वाजपेयींसाठी ही कार्याजंली असणार आहे.
इंटरपोलमार्फत 28 देशांना पत्र:
- कॉसमॉस बँकेच्या सायबर हल्ल्यासंदर्भात इंटरपोलमार्फत एसआयटीकडून 28 देशांना पत्रे देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या 78 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात मदत करण्याचे आवाहन या पत्रांमध्ये करण्यात आले आहे.
- कॉसमॉस बँकेच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या सव्र्हरवर हॅकर्सनी हल्ला चढवत ‘रूपे डेबिट कार्ड‘ आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम काढली होती. यातील 13 कोटी रुपयांची रक्कम हॅनसेंग बँकेच्या खात्यात जमा केली होती आणि 78 कोटी रुपये काही देशांमधील बँकांमध्ये जमा झाले होते.
- तसेच 28 देशांच्या यादीत संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, रशिया, ब्रिटन आदी देशांचा समावेश आहे. एटीम कार्ड क्लोन करून पैसे चोरी करण्यात आले आहेत.
- ‘प्रामुख्याने 78 कोटी रुपये कसे मिळवायचे हा प्रश्न आहे. ज्यात आम्हाला थोडी कसरत करावी लागणार आहे. इंटरपोलच्या मदतीने आम्ही पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारतातील अडीच कोटी रुपयांच्या संदर्भात आम्ही पहिल्या दिवसापासून वसुली करायला सुरुवात केली आहे’, असे कॉसमॉस बँकेसंदर्भात स्थापन केलेल्या एसआयटीच्या मुख्य व सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग यांनी सांगितले.
सौर प्रकल्पांसाठी वीजखरेदी करार:
- ऊर्जा आणि विशेषतः कृषीक्षेत्रासाठी राबविल्या गेलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महानिर्मितीच्या 500 मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात गती मिळणार आहे.
- तसेच यानुसार पहिल्या टप्प्यात 200 मेगावॉट क्षमतेचे, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 300 मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प मार्गी लावण्यात महानिर्मितीला यश मिळाले आहे. हे सर्व प्रकल्प विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र येथे उभारण्यात येणार आहेत.
- पहिल्या टप्प्यातील 200 मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यासाठी निविदा प्रक्रियेतून निवडलेल्या विकसकांना काम देण्यात आले आहे. यानुसार महानिर्मिती व संबंधित विकसक यांच्यात (पीपीए) या सर्व प्रकल्पांसाठीचे वीज खरेदी करार झाले आहेत.
भारतात लवकरच येणार उबरची फ्लाईंग टॅक्सी:
- देशात हवेत उडणारी टॅक्सी या संकल्पनेला आता मूर्त रुप येणार असल्याचे नक्की झाले आहे. येत्या काही वर्षात भारतात या फ्लाईंग टॅक्सी दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
- अमेरीकन कंपनी असलेल्या उबरच्या उबर एलिवेट या कंपनीने 2013 पर्यंत जगातील 5 देशांमध्ये ही सुविधा सुरु करणार असल्याचे सांगितले असून त्यामध्ये भारताचा समावेश आहे.
- भारताबरोबरच जपान, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील या देशांचीही या सेवेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याआधी लॉस एंजेलिस आणि दलास याठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. कंपनीने नुकतीच नागरी उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांच्याशी याबाबत बोलणी केली.
- भारतात सुरुवातीला दिल्ली आणि मुंबईमध्ये ही सेवा सुरु होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे घाईच्या वेळेला अगदी कमी वेळात हवेतून एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे प्रवाशांना शक्य होणार आहे. ही इलेक्ट्रीक टॅक्सी प्रतितास 300 किलोमीटर या वेगाने उडू शकेल. हजार ते दोन हजार फूटांवर उडणाऱ्या या टॅक्सीचा हॅलिकॉप्टरपेक्षा कमी आवाज होईल.
- अंतराळ कायद्याअंतर्गत उबरने या प्रकल्पासाठी नासासोबत करार केला आहे. त्याअंतर्गत शहरी भागात हवाई टॅक्सी संदर्भातील संशोधन, प्रगती आणि चाचणीसंदर्भातील आव्हानांवर काम केल जात असल्याचे नासाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दिनविशेष:
- 31 ऑगस्ट हा दिवस बालस्वातंत्रदिन आहे.
- मृत्युंजय कादंबरीचे लेखक प्रसिद्ध साहित्यिक ‘शिवाजी सावंत‘ यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 मध्ये झाला.
- सन 1947 मध्ये 31 ऑगस्ट रोजी भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
- पांडुरंगशास्त्री आठवले यांना सन 1996 मध्ये मॅगसेसे पुरस्कार प्रदान झाले.
- राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते सन 1970 मध्ये कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा