31 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 जानेवारी 2019)
धर्मसंसदेची घोषणा मोठी घोषणा:
- शंकराचार्य स्वरुपानंद यांनी प्रयागराज येथे बोलवलेल्या धर्मसंसदेत राम मंदिरासंबंधी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
- येत्या 21 फेब्रुवारीपासून अयोध्येत साधू-संत राम मंदिराचे निर्माणकार्य सुरु करतील असा प्रस्ताव धर्मसंसदेत मंजूर करण्यात आला आहे. राम मंदिर बांधण्यासााठी साधू-संत अयोध्येकडे कूच करतील असे या धर्मसंसदेत ठरले आहे.
- धर्मसंसदेव्यतिरिक्त अन्य साधू-संतांकडून या प्रस्तावाला प्रतिसाद मिळणार की, नाही ते आताच स्पष्ट झालेले नाही.
- अयोध्या खटल्याची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्याने न्यायव्यवस्था आणि सरकारबद्दल साधू-संतांमध्ये नाराजीची भावना आहे.
दिपीका पदुकोणची ‘मामि’च्या अध्यक्षपदी निवड:
- मुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी अभिनेत्री दिपीका पदुकोणची निवड करण्यात आली आहे.
- तर यापूर्वी अभिनेता आमिर खान यांची पत्नी किरण राव ही ‘मामि’ची अध्यक्ष होती. त्यानंतर आता दिपीका या पदाची जबाबदारी पार पाडणार आहे.
- किरण राव सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे तिला अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. किरणच्या राजीनाम्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या सदस्य मंडळाची बैठक पार पडली.
- तसेच या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांसाठी वोटिंग करण्यात आली. यामध्ये दिपीका सर्वाधिक मत मिळवून विजयी झाली. दिपीकाची या पदी निवड झाल्यानंतर किरणने तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
‘एक होतं पाणी’ चित्रपटला विशेष ज्युरी पुरस्कार:
- विषयांचे नावीन्य आणि मार्मिक आशयप्रधान मराठी चित्रपटांनी साऱ्यांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करून घेतल्या आहेत.
- रसिक-प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या कथा आणि त्याची साजेशी मांडणी असणारे मराठी चित्रपट सर्व स्तरांवर नावाजले जाताना दिसत आहेत.
- अशाच एका मराठी चित्रपटाची चर्चा सध्या आहे. हा चित्रपट म्हणजेच ‘एक होतं पाणी’ होय. तत्कालीन ज्वलंत विषय मांडणाऱ्या या चित्रपटाने 6व्या नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार पटकावला आहे.
- ‘न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज’ व ‘काव्या ड्रीम मुव्हीज’ प्रस्तुत ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाने अलीकडेच अंबरनाथ चित्रपट महोत्सवामध्ये बाजी मारली.
- एका ज्वलंत सामाजिक विषयाला हात घालणाऱ्या ‘एक होतं पाणी’ मध्ये असून एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
- पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाणी वाचवले तर आणि तरच आपली सृष्टी वाचेल असा संदेश यातून देण्यात आला आहे.
नोटाबंदी, रेरा कायद्यामुळे युवकांचे घराचे स्वप्न साकार:
- नोटाबंदीमुळे घरांच्या किमती कमी झाल्या असून, त्यामुळे युवकांना घरे घेणे परवडू लागले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
- जर मागील सरकारच्या गतीने आम्ही काम केले असते तर आता जेवढी स्वस्त घरे आम्ही बांधली आहेत, ती बांधायला 25 वर्षे लागली असती, असेही ते म्हणाले. सुरत विमानतळाच्या विस्तारित इमारतीचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते.
- मोदी म्हणाले, की नोटाबंदीचा काय फायदा झाला असे मला विचारण्यात येते, हा प्रश्न तुम्ही युवकांना विचारा, कारण ते आता घरांच्या किमती कमी झाल्याने घरे विकत घेऊ शकतात. बांधकाम व्यवसायात काळा पैसा वापरला जात होता, पण नोटाबंदी व रेरा कायद्याने आम्ही त्याला लगाम घातला आहे.
- तसेच हवाई वाहतूक मंत्रालयाच्या उडान (उडे देश का आम नागरिक) योजनेचे कौतुक करताना त्यांनी सांगितले, की आता विमान प्रवास करणे सामान्यांच्या आवाक्यात आले आहे. त्यामुळे देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्राचा विकास होईल.
क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित बायोपिक:
- भारताच्या इतिहासामध्ये 25 जून 1983 ही तारीख सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.
- तर त्यामुळे 1983च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून या चित्रपटातील आणखी एका भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे.
- कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आतापर्यंत रणवीर सिंह मुख्य भूमिकेमध्ये झळकणार असल्याचे साऱ्यांनाच ठावूक होते. त्यानंतर आता आणखी एका भूमिकेचा खुलासा झाला आहे.
- या चित्रपटामध्ये भारताचा माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा केला आहे.
दिनविशेष:
- सन 1911 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात 31 जानेवारी 1920 रोजी झाली.
- सोविएत रशियाने सन 1929 मध्ये लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले होते.
- सन 1949 यावर्षी बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
- राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 31 जानेवारी सन 1950 रोजी संसदेपुढे पहिले भाषण केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा