Current Affairs (चालू घडामोडी)

4 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जागतिक बॅँक

4 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 एप्रिल 2020)

जागतिक बॅँकेने दिले एक अब्ज डॉलर :

  • कोरोना व्हायरसचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीचे साहाय्य म्हणून जागतिक बॅँकेने भारताला 1 अब्ज अमेरिकन डॉलरची मदत जाहीर केली आहे.
  • जगामध्ये होत असलेला या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक बॅँकेने 1.9 अब्ज डॉलरच्या साहाय्याची घोषणा केली, त्यातील सर्वात मोठा वाटा भारताला मिळाला आहे.
  • कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी जगातील देशांना मदत व्हावी या हेतूने जागतिक बॅँकेने तातडीची मदत देण्यास प्रारंभ केला आहे.
  • पहिल्या टप्प्यात 25 देशांना 1.9 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत देण्यात येणार आहे. त्यामध्ये भारताचा समावेश असून, यापैकी सर्वाधिक मदत भारताला मिळाली आहे.
  • जगभरातील 40 देशांना कोरोनाविरूद्धची लढाई वेगाने लढण्यासाठी जागतिक बॅँक मदत देणार आहे.
  • भारताला मिळणाऱ्या 1 अब्ज डॉलरच्या मदतीतून विविध सोयी व सुविधा कोरोनाच्या रुग्णांना उपलब्ध होणार आहेत.
  • तर या मदतीमधून रुग्णांचे स्क्रीनिंग, ट्रेसिंग, प्रयोगशाळांमधील तपासणी याशिवाय वैयक्तिक सुरक्षिततेची उपकरणे पुरविणे आणि विशेष विलगीकरण कक्षांची निर्मिती करण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 एप्रिल 2020)

एमटीएनएलचं बिल भरण्यास 20 एप्रिलपर्यंत मुदतवाढ :

  • महानगर टेलीफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) च्या ग्राहकांना लँडलाइन व मोबाइलचे मार्च महिन्याचे बिल भरण्यास 20 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी बिल भरण्यासाठी बाहेर निघू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • वर्क फ्रॉम होमद्वारे काम करणाऱ्या नागरिकांना इंटरनेट जास्त प्रमाणात लागत असल्याने एमटीएनएलने सर्व पोस्टपेड मोबाइल धारक व ब्रॉडबँड ग्राहकांना इंटरनेट वापराची मर्यादा वाढवून दिली आहे. ग्राहकांना रिचार्ज अथवा नवीन योजनेबाबत वेबसाइटच्या माध्यमातून माहिती व सेवा पुरवली जात आहे.

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाची व्हॉट्स अ‍ॅपवर कोविड-19 हेल्पलाइन सुरू :

  • नागरिकांच्या मनात कोरोना विषाणूसंदर्भात अनेक प्रश्न आहेत. सोशल मीडियावर फॉरवर्ड होणा-या चुकीच्या माहितीमुळे अनेकांमध्ये भीतीचेवातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामन्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सोशल मीडियाचेच माध्यम निवडले असून, व्हॉट्स अ‍ॅपवर स्टेट कोविड हेल्पलाइन सुरू केली आहे.
  • तर ही सेवा विनामूल्य असून, सध्या पसरलेल्या कोविड-19 साथीबद्दल अचूक, विश्वासार्ह व अद्ययावत माहिती मिळवण्याचा केंद्रीय स्रोत म्हणून ही हेल्पलाइन काम करणार आहे.
  • व्हॉट्स अ‍ॅपवरील ही कोविड महाराष्ट्र हेल्पलाइन वापरण्यासाठी केवळ +91 20 2612 7394 हा क्रमांक आपल्या फोन कॉण्टॅक्ट्समध्ये सेव्ह करावा आणि मग असा मेसेज या क्रमांकावर पाठवावा. ही हेल्पलाइन सेवा सुरू होईल.
  • तसेच ही सेवा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांत उपलब्ध होणार आहे. कोविड हेल्पलाइन महाराष्ट्र ही एक स्वयंचलित चॅटबोटसेवा असून, याद्वारे नागरिकांच्या कोरोना विषाणूसंदभार्तील प्रश्नांना सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 24 तासांच्या आत खात्रीशीर उत्तरे दिली जात आहेत.

एअर इंडियाची तिकिट विक्री 30 एप्रिल पर्यंत बंद :

  • सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं 30 एप्रिल पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली.
  • सध्या देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील काय निर्णय होईल याकडे आमचं लक्ष आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.
  • तसेच विमान कंपन्या 14 एप्रिल नंतर कोणत्याही तारखेची तिकिट विक्री सुरू करू शकतात.

रविवारी दिवे लावण्याचे पंतप्रधानांचे आवाहन :

  • करोनाच्या महासाथीविरोधात देशावासीयांना पुन्हा एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरचित्रवाणी संदेशाद्वारे केले.
  • रविवारी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी लोकांनी आपापल्या घरातील दिवे बंद करावेत व मेणबत्ती, मोबाइलचा दिवा वा बॅटरीचा दिवा लावून दिव्यांचा झगमगाट करावा. हा प्रकाश म्हणजे करोनामुळे पसरलेल्या अंधकाराविरोधातील लढाई असल्याचे मोदी म्हणाले.
  • तर करोनाविरोधातील हा नवा सामुदायिक उपक्रम राबवताना लोकांनी घरातून बाहेर पडू नये. आपापल्या घरात-बाल्कनीत दिवे उजळावेत, अशी सूचनाही मोदींनी केली. 22 मार्च रोजी जनता संचारबंदीत पाच मिनिटे थाळी वाजवण्याचे आवाहन मोदींनी केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनाला लोकांनी रस्त्यावर उतरून प्रतिसाद दिला होता.

दिनविशेष:

  • सन 1882 मध्ये ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या.
  • ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचा जन्म 4 एप्रिल 1902 मध्ये झाला होता.
  • पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा 12 देशांनी 1949 मध्ये नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.
  • सन 1968 मध्ये जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांची हत्या केली.
  • लता मंगेशकर यांना 1990 यावर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 एप्रिल 2020)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

View Comments

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago