4 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
4 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2020)
टिकटॉकला 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.
टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय एखाद्या अमेरिकन कंपनीने 15 सप्टेंबरपर्यंत विकत घेतला नाही, तर त्यानंतर टिकटॉकवर अमेरिकेत बंदी घातली जाईल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘मायक्रोसॉफ्ट’ला टिकटॉकच्या खरेदीमध्ये रस आहे.
बाइटडान्सकडे टिकटॉकची मूळ मालकी आहे. टिकटॉक अॅपचा 30 टक्के नाही तर 100 टक्के व्यवसाय खरेदी करावा अशी डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आहे.
या विषयासंदर्भात आपण मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासोबत चर्चा केल्याचे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.
भारताच्या औषध महानियंत्रकांनी पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, टप्पा 2 व 3 मधील महत्त्वाच्या चाचण्या करण्याची परवानगी सिरमला देण्यात आल्याचे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी जाहीर केले आहे.
एका व्यक्तीला दोन डोस चार आठवडय़ांच्या अंतराने देण्यात येणार असून पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस 29 व्या दिवशी द्यावा लागेल.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने टप्पा 1 व 2 मधील जे निष्कर्ष जाहीर केले आहेत त्यांची माहिती शुक्रवारी केंद्रीय औषध नियंत्रण संघटनेसमोर मांडण्यात आली. त्यानंतर टप्पा 2 व टप्पा 23 च्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली.
नासाचे दोन अवकाशवीर रविवारी सुरक्षितपणे पृथ्वीवर:
अमेरिकेतील उद्योगपती इलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या ड्रॅगन (आता एंडेव्हर) अवकाशकुपीच्या माध्यमातून अवकाशात गेलेले नासाचे दोन अवकाशवीर रविवारी सुरक्षितपणे पृथ्वीवर आले.
नासाने त्यांच्या अवकाशवीरांना अवकाश स्थानकात नेण्याआणण्याचे कंत्राट आता स्पेस एक्स कंपनीला दिले आहे.
बोईंग कंपनीला ही संधी देण्यात आली होती पण त्यांना तसे अवकाशवाहन तयार करण्यात तातडीने यश मिळवता आले नाही.
ही अवकाशकुपी दोन महिन्यांपूर्वी फ्लोरिडातून सोडण्यात आली होती व ती अवकाशस्थानकाजवळ गेल्यानंतर तेथेच होती.नंतर या अवकाशवीरांचे वास्तव्य पूर्ण झाल्यानंतर त्याच कुपीत बसून ते परत आले. याचा अर्थ यात खूप मोठय़ा प्रमाणावर पैशांची बचतही झाली आहे.
स्पेस एक्स कंपनीने अवकाशवीरांना आणण्यासाठी परिचारिका व डॉक्टरांचा समावेश असलेले खास जहाज तयार ठेवले होते.
रशियाने करोना विरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी:
रशियाने करोना व्हायरसविरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली होती.
रशियाने येत्या ऑक्टोंबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
10 तारखेपर्यंत लसीची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीचा पहिला डोस देण्यात येईल अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली.
गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून रजिस्ट्रेशनसाठी पेपरवर्क सुरु आहे असे रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्कोव यांनी सांगितले.
‘बीसीसीआय’च्या कोव्हिड कृती दलाची स्थापना:
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोव्हिड कृती दलाची स्थापना केली असून त्यामध्ये माजी कर्णधार राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला आहे.
द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख आहे. द्रविडकडे कोव्हिड कृती दलाचा प्रमुख म्हणून जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
‘एनसीए’चा प्रमुख म्हणून द्रविडसह वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता अधिकारी यांचा समावेश आहे.
दिनविशेष :
कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845 मध्ये झाला.
पतंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1863 मध्ये झाला.
साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना.सी. फडके यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 मध्ये झाला.
सन 1956 मध्ये भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सन 2001 मध्ये 4 ऑगस्ट रोजी स्थापन झाली.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.