4 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 फेब्रुवारी 2022)
चांद्रयान-3 मोहिम ऑगस्ट महिन्यात :
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ( ISRO)आता विविध अवकाश मोहिमांसाठी सज्ज झाली आहे.
तर गेल्या दोन वर्षात करोना, करोना निर्बंध आणि टाळेबंदीमुळे इस्त्रोच्या अनेक मोहिमा या लांबणीवर पडल्या होत्या.
तेव्हा 2022 मध्ये इस्रो तब्बल 19 मोहिमा हाती घेत आहे.
तर सध्या सुरु असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे बहुचर्चित चांद्रयान-३ ( Chandrayaan-3)मोहिम ही याच वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्षात येणार असल्याचं उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे.
2019 च्या जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत चांद्रयान-2 मोहिम पार पडली होती.
याचबरोबर वर्षभरात इस्रोच्या तब्बल 19 मोहिमा पार पाडल्या जाणार असून यामध्ये 8 उपग्रह प्रक्षेपण मोहिमा, 7 विविध प्रकारच्या अवकाश यानाबाबत मोहिमा आणि 4 तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक संदर्भात मोहिमा असणार आहेत.
तर या मोहिमांमध्ये RISAT-1A या उपग्रहाचे पुढील काही दिवसात PSLV या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण होणार आहे.
बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक सोहळ्यात मशालवाहक म्हणून गलवान खोऱ्यातील भारताबरोबरच्या संघर्षात सहभागी असलेल्या सैनिकाचा समावेश केल्याने भारताने आक्षेप नोंदवला आहे़.
ऑलिम्पिकच्या उद्धाटन आणि समारोपाच्या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणाही भारताने केली़.
बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक आज सुरू होत आहे़.
जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय जवानांबरोबरच्या संघर्षात सहभागी असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कमांडरचा समावेश या सोहळ्यासाठीच्या मशालवाहकांमध्ये करण्यात आला़.
ऑलिम्पिक सोहळ्याच्या या राजकीयीकरणावर भारताने आक्षेप घेतला़ या सोहळ्यांमध्ये भारताचे राजदूत सहभागी होणार नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले़.
त्यानंतर ‘प्रसार भारती’ने ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याचे दूरदर्शनवर प्रक्षेपण करणार नसल्याचे जाहीर केले़
बुलेट ट्रेनचं‘या’ ठिकाणी होणार पहिलं स्टेशन :
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम जोरात सुरू आहे. बुलेट ट्रेनसाठी तयार करण्यात आलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गादरम्यान बांधले जाणारे सुरत हे पहिले स्थानक असेल.
तसेच चार स्थानकांवर (वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच) कामाला वेग आला आहे आणि ते डिसेंबर 2024 पर्यंत तयार होतील.
तर या चार स्थानकांपैकी सुरत हे तयार होणारे पहिले स्थानक असेल.
रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चार स्थानकांव्यतिरिक्त, 237 किमी लांबीचा एक पूल देखील बांधला जाईल.
तर हा एक विशिष्ट प्रकारचा पूल आहे, ज्यामध्ये उंच आणि लांब रेल्वे लाईन किंवा रस्त्याला आधार देणाऱ्या कमानी आणि खांब असतात.
भारतीय राजदूतांच्या मूल्यमापनासाठी आता असतील हे नवे निकष :
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 400 अब्ज डॉलर्स व्यापारी माल निर्यातीचे लक्ष्य गाठून, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) परदेशातील सर्व मिशन्सना केवळ 3T च्या आधारावर सर्व अधिकाऱ्यांचे मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले आहेत.
तर ट्रेड, टेक्नॉलॉजी आणि टूरिझम हे तीन T आहेत.
भारताने आधीच 334 अब्ज डॉलरची व्यापारी निर्यात पार केली आहे, जी वार्षिक आधारावर आतापर्यंतची सर्वोच्च आहे.
तसेच कोणत्याही 12 महिन्यांच्या कालावधीतील मागील कामगिरीच्या तुलनेत ते जास्त आहे.
मिशन फोकस 3Ts वर असताना, MEA ने परदेशात असाइनमेंटच्या निकषांमध्ये बदल करण्याचे देखील ठरवले आहे ज्यात ते सेवा देत आहेत किंवा सेवा देणार आहेत त्या संबंधित देशाच्या भाषा भाषिकांना आणि तज्ञांना प्राधान्य दिले आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका आणि आराखडा जाहीर :
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका आणि आराखडा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केला.
अहमदाबाद येथे बलाढ्य मुंबई, गतविजेते सौराष्ट्र, ओदिशा आणि गोवा यांचा समावेश असलेल्या ड-गटाचे सामने होतील.
महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर प्रदेश आणि आसाम या संघांचा ग-गटात समावेश करण्यात आला आहे.
रणजी स्पर्धेच्या गटसाखळीचा पहिला टप्पा 10 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत होणार आहे.
तर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामानंतर बाद फेरीचा दुसरा टप्पा 30 मे ते 26 जून या दरम्यान होईल.
दिनविशेष:
4 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला होता.
सन 1944 मध्ये चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच केली होती.
श्रीलंका देशालासन 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
सन 2004 मध्ये मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.